Skip to main content

Posts

Showing posts from October, 2021

वच्‍छलाबाई अपंग सेवा संस्थानच्या वतीने अन्नधान्यच्या कीटचे वाटप.

  किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर) दिनांक 30 आॅक्टोबर 2021 रोजी वत्सलाबाई अपंग सेवा संस्थेच्या वतीने 350 लहान मुलांसाठी अन्नधान्यच्या कीटचे वाटप दै. पुण्य नगरीचे ज्येष्ठ पत्रकार श्री. जयवंत बामणे यांच्या हस्ते गोगटेवाडी, गोरेगाव पूर्व येथे करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण गव्हाणे, अनिता मनानी, सुधीर देवेकर, शांता मावशी, ताई गव्हाणे, दीपक मनानी आणि राजेश मोरे आदी उपस्थित होते.  या वेळी आनंद नगर, तीन डोंगरी, अंधेरी तसेच इतर विभागातील मुले उपस्थित होती.

विद्यार्थ्यांनी कायद्याची माहिती घेऊन जीवनात त्याचा उपयोग करावा -एस. बी. अंभोरे

ता. प्र. किनवट :-  विद्यार्थ्यांनी कायद्याविषयी माहिती घेऊन जीवनामध्ये त्यांचा उपयोग सुखी व समृध्द होण्यासाठी करावे. कायद्याचा अभ्यास सर्वांनी करावे. असे मत बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व तालुका विधी सेवा समिती शाखा किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने आयोजित कायदेविषयक शिबिरात मा.एस.बी.अंभोरे,अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश क. स्तर, किनवट यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष किनवट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नारायणराव सिडाम,  प्रमुख उपस्थिती किनवट शिक्षण संस्थेचे सचिव, शंकरराव चाडावार तालुका विधी सेवा समिती सदस्य के.मुर्ती,प्राचार्य डॉ. एस. के. बेंबरेकर, हे विचारमंचावर उपस्थित होते.  प्रारंभी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  स्वागतगीत शे. सालेहा काजीम व दिव्या अचकुलवार यांनी  सादर केले.  हा कार्यक्रम किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ

पत्रकार गरीबांना चुकुनही जाहिरात मागत नाही, फक्त प्रसिद्ध व्यक्तींनाच मागतात, म्हणून नाही म्हणु नका - पत्रकार सेवा संघ चा इशारा जाहिरात नाही तर बातमी नाही व कुठलेच सहकार्य देखील राहणार नाही - आशिष शेळके, तालुकाध्यक्ष

  किनवट : संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकारांच्या समस्या दुर करण्यासाठी तसेच पत्रकारांच्या सेवेसाठी कार्यरत असणारी संघटना म्हणजेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य ही संघटना आहे. प्रत्येक वेळा व प्रत्येक ठीकाणी पत्रकार सेवा संघ ही पत्रकारांच्या मदतीला धावून येत असते. या संघटनेचे किनवट तालुका अध्यक्ष आशिष शेळके यांनी सर्व लोकप्रतिनिधी, नेते, पुढारी व कार्यकर्ते तसेच शासकीय, निमशासकीय व खाजगी कर्मचाऱ्यांना व उद्योगपतींना इशारा दिला आहे की, जर तुम्ही आम्हाला जाहिरात दिलात तरच आम्ही तुम्हाला प्रसिद्धी देऊ, जर जाहिरात नाही तर बातमी नाही व कुठलेच सहकार्य देखील राहणार नाही.           पत्रकारांशी संवाद साधताना पत्रकार सेवा संघ चे किनवट तालुका अध्यक्ष आशिष शेळके म्हणाले की, पत्रकार सेवा संघ ही संघटना या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे सरांच्या नेतृत्त्वाखाली अहोरात्र पत्रकारांच्या सेवेसाठी काम करत आहे. अशाच काही समस्यांपैकी जाहिरात जमा करणे हे देखील पत्रकारांची मोठी समस्या सध्या दिसत आहे. कारण दिवाळी म्हटलं की प्रत्येक वृत्तपत्राचे संपादक जाहिरात साठी आपल्या सर्व प्रतिनिधीन

गोकुंदा ग्राम पंचायतीच्या हद्दीत सुमार दर्जाचे विद्युत साहीत्य बसविण्याचा सपाटा ; गोकुंदा वासियांची चौकशीची मागणी

किनवट,दि.२९ :  ग्राम पंचायतीवर प्रशासक असल्याचा फायदा उचलत व प्रशासक जास्त लक्ष देऊ शकणार नाही, हे ओळखून गोकुंद्याच्या  ग्रामसेवकांनी अत्यंत घाई गडबडीत अत्यंत सुमार दर्जाचे विद्युत खांब, पथदीवे(आय.एस.आय.) मार्क नसणारे विद्युत साहीत्य बसविण्याचा  सपाटा सुरु केला आहे. हे साहीत्य किती काळ टिकेल,हे लवकरच कळेल.या सुमार दर्जाच्या साहीत्याची सक्षम यंत्रणे मार्फत चौकशी करावी व यात दोषी असणाऱ्या विरुद्ध कडक कार्यवाही करावी,अशी मागणी गोकुंदा ग्रामवासी करीत आहेत.     किनवट चे उपशहर अशी ओळख असलेल्या व तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत असलेल्या गोकुंदा (ता. किनवट) ग्रामपंचायती मधील सर्व वार्डमध्ये पथदिवे व सर्व खांबावरचे पथदिवे लवकरात लवकर लावण्यात यावेत, अशी मागणी जनता माहिती अधिकार समिती, महाराष्ट्र राज्य चे तालुका अध्यक्ष श्री. आशिष यांनी ग्रामसेवक यांची भेट घेऊन नुकतीच  केली होती.           खांबावरती पथदिवे व बल्ब नसल्या कारणाने चोरीचे व लुटमारीचे प्रमाण ही वाढले होते.तसचे आता दिवस ही लवकर मावळत आहे.काही विद्यार्थ्यांना देखील कोचिंग क्लासेस मधून येताना अंधारातच घरी यांव लागत आहे. त्यामुळे पा

टिपू सुलतान ब्रिगेड नांदेड जिल्हा कार्यकर्ता मेळावा संपन्न

नांदेड:  टिपू सुलतान ब्रिगेड नांदेड जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा काल दि. 24 ऑक्टोबर 2021 रोजी नांदेड येथे टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या मेळाव्यात नांदेड जिल्ह्य़ातील (दक्षिण) नांदेड जिल्ह्यातील जिल्हा पदधिकारी, सदस्य, तालुकाध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य उपस्थित होते. या मेळाव्यात जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली, धर्माबाद, उमरी, बिलोली आणि कंधार तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष पदी हिमायतनगर येथील सामाजिक कार्यकर्ते सलाम खुरेशी, जिल्हा संघटक पदी उमरी येथील ब्रिगेडचे जुने व समर्पित कार्यकर्ते फयाज पठाण, जिल्हा मीडिया प्रमुख आणि उमरी तालुका अध्यक्ष पदी बळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि दैनिक समीक्षाचे उमरी तालुका प्रतिनिधी फेरोज पटेल, उमरी तालुका विद्यार्थी ब्रिगेड अध्यक्ष पदी सय्यद सुलेमान तळेगावकर, बिलोली तालुका अध्यक्ष पदी युवा कार्यकर्ते शेख इरफान आणि बिलोली तालुका उपाध्यक्ष पदी अफरोजखान पठाण, धर्माबाद तालुका उपाध्यक्ष पदी मिर्झा इब्राहिम बेग, धर्माबाद तालुका सचि

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाने संधी दिल्यास तसेच अ.ज. आरक्षण सुटल्यास गोकुंदा जि.प. गणावर वर कमळ फुलवणार - जितेंद्र कुलसंगे

  किनवट / गोकुंदा: भाजप पार्टीचे ग्रामिण जिल्हा  उपाध्यक्ष अनु.जमाती जितेंद्र अ. कुलसंगे यांनी येत्या स्थानिक स्वराज्य संस्था २०२२ अनुसुचीत जमाती राखीव सुटल्यास मला पक्षाने संधी द्यावी अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषद प्रेस नोट द्वारी दिली त्यांनी पुढे सांगितले की किनवट / माहुर तालुक्यात पक्षासाठी त्यांनी व त्यांच्या वडीलांनी प्रशासकिय  ३२ वर्षे सेवा दिली तसेच कुलसंगे यांनी भाजप साठी झेंडा खांद्यावर घेऊन काम केले सध्या आरक्षण जाहीर झाले नसल्याने इच्छुक उमेदवार संभ्रमात आहेत व कार्यकर्ते आप-आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरु आहे व जितेंद्र कुलसंगे यांचा जनसंपर्क दांडगा आहे तरी अशोकजी उईके( प्रदेश अध्यक्ष अ .ज.), आमदार भिमराव केराम, खासदार प्रतापजी पाटील चिखलीकर, आदी वरीष्ठांनी पाठीवर थाप ठेवल्यास नक्कीच गोकुंदा गणावर भाजप झेंडा फडकवु अशी माहिती भाजपचे अनु. जमाती ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष म. प्रदेश यांनी बोलुन दाखवीले

सीतेच्या वनवासा पेक्षाही माझा वनवास कमी नव्हता , खासदार हेमंतभाऊ पाटील व गोदावरी समुहाच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटील यांच्या समक्ष भावनावश झाल्या - दिव्यांग सुनिता गुटे - फड

  हिंगोली: आम्हाला पाय नसल्याने कुठे जाता येत नाही खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी सायकल, ट्राय सायकल, इलेक्ट्रिकल सायकल, दिली नसती तर आम्हाला घरामध्येच बसावं लागलं असतं, घरात बसून दुःखी राहत होते, पण भाऊंच्या माध्यमातून ही सायकल मिळाल्यामुळे बाहेरचं जग पहायला मिळेल, या उपक्रम सेवाभाव विचारातुन, आम्हाला भरपूर आनंद होत आहे, घरात राहून कंटाळवाणं वाटायचं, नको ते विचार मनात यायचे, सायकल, इलेक्ट्रिकल सायकल दिव्यांग बांधवांना दिल्यात, यामुळे घरातुन बाहेर निघाल्यावर मन बदलल्या सारख होईल हे शब्द आहेत दिव्यांग सुनिता ह्यांचे. दिव्यांग बांधवांच्या जाहिर कार्यक्रमात हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत त्या ध्वनीक्षेपकावर व्यक्त होत होत्या, त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले होते, उपस्थितांची मन काही वेळासाठी हळहळली होती. अपंगाकडे घरातले नातेवाईक सुद्धा, अपंग व्यक्ती काहीच करू शकत नाही, बिन कामाची व्यक्ती आहे अशी हेटाळणी पनाने वागणूक देतात, अपंगाचा मानसन्मान होत नाही, घरातील केरकचरा जसा झाडूने लोटला जातो अगदी तशाच पद्धतीने रक्ताचे नातेवाईक पण दुर लोटतात या अनुभवातून मी दिव्यांग इथपर्यंत आली आहे, खासदार हेमंत भाऊ

पत्रकारांवर झालेला अन्याय सहन करणार नाही - प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, उमरखेडच्या बैठकीत निर्णय

  यवतमाळ, उमरखेड : राज्यात पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मासिक बैठक उमरखेड येथे शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी पार पडली. पत्रकारांवर झालेला अन्याय सहन करणार नाही असा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,उमरखेडच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला.  यावेळी तालुक्यातील वेगवेगळ्या सर्कल मधील संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांच्या उपस्थितीमध्ये तालुका अध्यक्ष मारोती गव्हाळे यांनी पत्रकारांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांनी संघटनेच्या कुठल्याही व्यक्तीवर जर अन्याय झाला तर कदापीही खपवून घेणार नाही. कुठल्याही प्रकारे अन्याय सहन करणार नाही. व पत्रकारांच्या मागे आपली संघटना सदैव उभी असेल असे आश्वासन दिले. संघटनेची दरमहा बैठक होत असते. व त्यामध्ये पत्रकारांच्या समस्या सोडवल्या जातात. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे नियमित पणे संघटना पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून योग्य ते मार्गदर्शन करीत असतात. या बैठकीमध्ये काही नवीन पत्रकारांना संघटनेमध्ये प्रवेश देण्यात

किनवट पोलीस ठाण्यात कायदेेविषयक शिबिर संंपन्न*

  किनवट, दि.२३ : तालुका विधी सेवा समिती व व अभिवक्ता संघाच्या वतीने पोलिस ठाण्याच्या प्रांगणात आज(दि.२३) न्यायाधीश श्री.अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीर घेण्यात आले.   यावेळी सह दिवाणी न्यायाधीश श्री. परवरे,पोलिस निरीक्षक मारोती थोरात,तालुकाविधी सेवा समितीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष के.मुर्ती, एड.राहुल सोनकांबळे, एड.मिलिंद सर्पे, एड.शामिले यांनी समयोचित मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन विधी सेवा समितीचे सदस्य एड.दिलिप काळे यांनी केले.अभार प्रदर्शन पोलिस उपनिरीक्षक श्री. पवार यांनी केले.   मंचावर महिला दक्षता समितीच्या सदस्या भावना दिक्षीत, एड.तौफिक कुरेशी, नायब तहसीलदार रफिक, एड.किशोर मुनेश्वर, एड.रुपेश पुरुषोत्तमवार,एड.राठोड,मुख्य पोलिस जमादार आप्पाराव,एड.सुनिल येरेकार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.कार्यक्रमास पत्रकार विजय जोशी, विशाल गिमेकार यांच्यासह पोलिस पाटील,सरपंच ,पोलिस कर्मचारी यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी श्री.मिसलवार,सेवक शौकत शेख व श्री.पठाण यांनी पुढाकार घेतला.

आश्विन पौर्णिमेला चंद्राच्या छायेत बहरली काव्य मैफिल

  किनवट (प्रतिनिधी) : क्रांतीसूर्य प्रतिष्ठान आयोजित आश्विन पौर्णिमे / कोजागीरी पौणिमे निमित्त तक्षशिला बुद्ध विहार विद्यानगर गोकुंदा येथे चंद्रांच्या छायेत कवि संमेलन काव्य पौर्णिमा साजरी करण्यात आली. सांगावाकार कवी महेंद्र नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कवी संमेलनात काव्य पौर्णिमेनिमित्त स्थानिक कवींनी  बहारदार रचना सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली.भारतीय बौद्ध महासभेचे तालुका संस्कार सचिव अनिल उमरे यांच्या राहो सुखाने हा मानव इथे या वंदन गीतेने कवी संमेलनाला सुरूवात झाली.वामनदादा कर्डक संगीत अकादमी चे संचालक प्राचार्य सुरेश पाटील यांनी वंदन गीत सादर केले. त्यांनंतर कवी रुपेश मुनेश्वर यांनी  " हिंसा नको कधीही कायेने वाचने ठेवावे शुध्द आचरण बुद्धाचे सांगणे" प्रा.सुभाष गडलिंग यांनी  " वेळु वनात वेळु हलत आहे वाऱ्याने शब्द थांबुन होते वेळु वनात स्वताला मुक्तपणे उधळत  भीरभीरत निघाले ते" हि मर्मस्पशी रचना मांडली .  संगीत शिक्षिका आम्रपाली वाठोरे यांनी आमृतवानी ही बुद्धाची,ऐका देऊनी ध्यान सादर केले प्रा.एस.डी.वाठोरे यांनी  " हळुच हलली बोधी वृक्षाची फां

शाळा व महाविद्यालयात कोविड -19 लसीची सक्ती करू नये - ऑल इंडिया पँथर सेना

नांदेड :             महाराष्ट्रामधील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना लसीकरण करून घेणे महाराष्ट्र सरकारने अनिवार्य केले आहे. त्यामुळे भारतीय संविधानाने दिलेल्या मुलभूत  हक्कावर वर गदा येत आहे.शाळा महाविद्यालय यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी लसीकरणाचे 2 डोस घेतले आहेत. त्यांनाच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे अशी विद्यार्थ्यावर अन्यायकारक भूमिका या ठिकाणी काही महाविद्यालयांनी शाळा घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.            पुढे बोलताना  बुक्तरे म्हणाले की,जर  महाविद्यालयांना लसीकरण अनिवार्य करायचं असेल तर त्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील लसीची मात्रा ची उपलब्धता करून घ्यावी व ज्या विद्यार्थ्यांना लसीची मात्रा घ्यायची आहे त्यांनी त्या विद्यार्थ्यांना द्यावी व जे विद्यार्थी कलर्स घेणार नाहीत त्यांना सक्ती करू नये लस घेतल्यामुळे कोरोना होणार नाही याची हमी नाही त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी लाच घेतली त्यांना शारीरिक त्रास झाल्यास महाविद्यालय व प्रशासननाने याची जबाबदारी घ्यावी.             या

बोधडी वन परिक्षेत्रात झालेल्या विविध कामाची चौकशी करा ; सेक्युलर मुव्हमेंट ची मागणी

  किनवट,दि..१८: बोधडी(ता.किनवट)वन परीक्षेत्रांतर्ग झालेल्या विविध कामांची चौकशी करा,अशी मागणी करणारे निवेदन "सेक्युलर मुव्हमेंट,"या सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष एड.मिलिंद सर्पे  यांनी  उप वनसंरक्षक,नांदेड यांना नुकतेच पाठविले आहे.    निवेदनात नमुद केले आहे की, बोधडी(बु.)वनपरिक्षेत्रांंतर्गत सन २०१९-२० व २०२०-२१ या दोन वर्षाच्या कालावधीत वनतळे,रोप लागवड,आग व गुरे प्रतिबंधक चर,दगडी पोळ व तार कुंपन ही कामे हजारो रुपये खर्च करून करण्यात आली आहेत.या कामात वनपरिक्षेत्राधिकारी,वनपाल व वनरक्षक यांनी संगनमत करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे.    वन तळ्यांंची कामे करतांना  कांही कामे ही अर्धवट करण्यात आली आहेत,तर कांहीं वन तळ्यांची पिचिंग न करताच कागदोपत्री पिचिंग केल्याचे दर्शवून या कामांचा निधी हडप केलेला आहे.दगडी पोळाच्या काही जुन्या कामांना नवीनच केल्याचे दर्शवून त्याचा निधि हडप करण्यात आलेला आहे.आग व गुरे प्रतिबंधक चराची कामे दर्जाहीन करून या कामांचा निधी हडप करण्यात आलेला आहे.तसेच जंगलात व रोप लागवड केंद्रात प्रत्यक्षात तार कुंपन न करताच ते केल्याचे दर्शवण्यात आले आहे.ता

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या उपस्थितीत प्रति पिक बारा कापणी प्रयोग

  नांदेड  दि. 14 :- खरीप हंगामातील पिकांची उत्पादकता काढण्यासाठी महसुल मंडळामध्ये प्रति पिक बारा कापणी प्रयोग नुकताच घेण्यात आला. नांदेड तालुक्यातील सुगाव बु येथील  शेतकरी संजय तुकाराम गुबरे  यांच्या शेतातील सोयाबिनची कापणी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या उपस्थितीत करुन वजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी स्वत: पिकाची पाहणी केली. सन 2021 च्या खरी हंगामामध्ये सततच्या अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणात शेतामध्ये पाणी साचणे, शेतामधून पाणी वाहने आदी बाबीमुळे सोयाबिन, कापूस, तुर, उडीद, इत्यादी पिकांचे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून विमा कंपनी व कृषि सह महसुल प्रशासनाकडे तक्रार सुचना प्राप्त झाले आहेत. त्याच अनुषंगाने नुकतीच सोयाबिन पिकांतील पिक कापणी प्रयोग घेण्यात आला. सुगाव बु गावातील संजय तुकाराम गुबरे यांच्या गट क्र. 174 यांच्या शेतात 10x5  मी. अर्धा गुंठा क्षेत्रातील सोयाबिनची कापणी करण्यात आली या कापणी प्रयोगाच्यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, तालुका कृषि अधिकारी सिध्देश्वर मोकाळे, मंडळ कृषि अधिकारी लिंबगाव पप्रकाश पाटील, सतीश सावंत , कृषि पर

छत्रपती शिवराय पुतळा प्रकरणी खासदार हेमंत पाटील यांचेसह शिवसैनिकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे ; तालुका शिवसेनेच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी यांना निवेदन

  किनवट : वसमत येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा प्रकरणी खासदार हेमंत पाटील यांच्यासह शेकडो शिवसैनिकांवर विनाकारण पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, या मागणीचे निवेदन तालुका शिवसेनेच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात रविवार (दि. 17) रोजी दिले आहे.         बुधवार (दि. 13 ) रोजी वसमत ( जि. हिंगोली ) येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचे मिरवणूक काढून शिवप्रेमी जनता व शिवसैनिकांनी मोठ्या हर्षोल्हासात शिवरायांच्या नावाचा गगनभेदी जयघोष करीत नियोजित ठिकाणी अनावरण केले.         छत्रपती शिवरायांप्रती तमाम जनतेत आत्यंतिक प्रेम, आदर व आगाध श्रद्धा आहे. त्यामुळे स्वतःहून मोठ्या संख्येंनी शिवप्रेमींनी सहभाग नोंदविला. परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरून दबावास बळी पडून पोलीस प्रशासनाने प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या खासदारांसह आणि शेकडो शिवसैनिक व शिवप्रेमी बांधवांवर गुन्हे दाखल केले. हे निषेधार्ह व निंदनीय आहे. याबाबत जनतेचा प्रक्षोभ आहे. तेव्हा पोलिस प्रशासनाने त्वरित गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीचे निवेदन किनवट

वसमत येथील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचा पंचनद्यांच्या जलाने होणार जलाभिषेक शिवभक्त , शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ; खासदार हेमंत पाटील यांचे आवाहन

हिंगोली/ वसमत : वसमत शहरात १३ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याच्या  आगमन प्रसंगी राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे आणि  माजी आ. जयप्रकाश मुंदडा यांच्या कडून अनावधानाने जो निंदनीय प्रकार झाला त्यामुळे तमाम शिवभक्त शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत . अखंड हिंदुस्थानचे दैवत , मराठी मनाचे मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पावित्र्य अबाधित राहावे याकरिता  गोदावरी, आसना, पूर्णा, कयाधु, पैनगंगा या पाच नद्यांचे जल आणून जलाभिषेक करण्यात येणार आहे . या सोहळ्याला  शिवसैनिक व शिवप्रेमींनी उद्या १७ ऑक्टोबर  रोजी  सकाळी आठ वाजता हजारोंच्या संख्येने वसमत येथे उपस्थित राहावे असे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे .                  वसमत वासियांची मागील ४० वर्षाची मागणी १३ ऑक्टोबर २०२१ रोजी पूर्ण झाली मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचे आगमन झाले . यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये अतिउत्साहाच्या भरात राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे आणि  माजी आ. जयप्रकाश मुंदडा यांच्या कडून अनावधाना

शिवभक्त, शिवसैनिकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या किंवा मला अटक करा -खासदार हेमंत पाटील यांची आक्रमक भूमिका !

  हिंगोली : वसमत येथे १३ ऑक्टोबर  रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती अश्वारूढ पुतळ्याच्या आगमनाप्रित्यार्थ काढण्यात आलेल्या मिरवणुकी मध्ये सहभागी झालेल्या  शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी,कार्यकर्ते आणि शिवभक्तांवर  वसमत पोलिसांनी गुन्हे दाखल केले . याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेऊन  शिवभक्तांवर ,शिवसैनिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्या,  किंवा मला अटक करा अश्या कडक  शब्दात पोलीस प्रशासनाचा तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला आणि थेट  हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या गेटसमोर धरणे आंदोलन करून तात्काळ  गुन्हे मागे न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला .                    मराठी मनाचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती अश्वारूढ पुतळा वसमत येथे १३ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात आणण्यात आला . यावेळी वसमत तालुका आणि तमाम हिंगोली जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिवभक्त या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते . परंतु वसमत पोलिसांनी दंडेलशाही करत मिरवणुकीमध्ये सहभागी झालेलया सर्वच शिवसेना लोकप्रतिनिधी, शिवसैनिक आणि  शिवभक्त

किनवट तालुका क्रिडा संकुलास जिल्हा क्रिडा अधिकाऱ्यांची भेट

  किनवट प्रतिनिधी:दि.१५ विविधी कामाचा आढावा घेण्यासाठी व पाहणी करण्यासाठी नांदेडचे जिल्हा क्रिडा अधिकारी राजेश्वर मारावार हे किनवट येथे आले असता त्यांनी टेनीस कोर्ट, व्यायाम शाळा, क्रिडा मैदानाची ट्रॅकची अवस्था आदीची पाहणी केली तसेच खेळाडुंना मोलाचे मार्गदर्शन केले या वेळी नगर परिषदेचे माजी नगर उपाध्यक्ष अभय महाजन , तालुका क्रिडा संयोजक संदीप यशीमोड, प्रसिद्ध उद्योजक संजय नेम्मानिवार, शर्मा सर कृषी विभागाचे जाधव सर, राजु उपलवार, राज मेलडे, अतिश तामगाडगे, राईज अकॅडमीचे पोलिस प्रशिक्षक लक्ष्मीकांत कापसे, पत्रकार विशाल गिमेकर,राजेश पाटील आदींची उपस्थिती होती

पटीयाला ( पंजाब) येथुन NIS बॉक्सिंग राष्ट्रीय दर्जाचा कोर्स पूर्ण करून आल्या बद्दल संदीप यशीमोड यांचा उपविभागिय अधिकारी पुजार यांनी केला सत्कार

  ✍🏻राजेश पाटील किनवट :- क्रिडा संयोजक तथा कराटे प्रशिक्षक  संदीप यशीमोड यांनी आपल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवले व किनवट तालुक्यात एक आदर्श निर्माण केला त्यांच्या मुळे अनेक विद्यार्थी क्रिडा क्षेत्राकडे आकर्षित झाले त्यामध्ये आणखी एक मानाचा तुरा त्यांनी रोवला पटीयाला पंजाब जिथे अनेक राष्ट्रीय क्रिडापटु प्रशिक्षण घेतात व सुर्वण पदक मिळवून भारताच नाव लौकिक करतात अशा ठिकाणी यशीमोड यांनी जाऊन NIS कोर्स पूर्ण केला त्यामुळे आता किनवट सारख्या आदिवासी अतीदुर्गम भागास कराटे सोबतच बॉक्सिंग क्रिडा प्रकार राष्ट्रीय दर्जाच प्रशिक्षण मिळणार आहे हि  एक किनवट तालुक्यासाठी गर्वाची बाब आहे.  त्यांनी NIS कोर्स पूर्ण केल्या बद्दल सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागिय अधिकारी किर्ती किरण पुजार IAS  हस्ते त्यांच पुष्पगुच्छ , प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आल या वेळी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक कराड , गणराज गायकवाड, सोनटक्के सर, राहुल अपसमवाड, फरहान सर, देशमुखे मॅडम, शिंदे सर, परीवाले सर, नरवाडे सर, तथा किनवट शासकिम आश्रम शाळेचे अधिक्षक पुरी सर, व सर्व क्रिडा शिक्षक या वेळी उपस्थित होते.

भारतीय बौद्ध महासभा शाखेच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

  किनवट, ता.१४ : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीने ६५ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन शहर व परिसरात आज(ता.१४)उत्साहात साजरा करण्यात आला.धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ व सिद्धार्थ नगर येथील जेतवन बुद्ध विहारात संपन्न झाला.डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्या हस्ते, तर जेतवन बुद्ध विहारात सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी गंगाधर कावळे यांच्या हस्ते पंचरंगी ध्वज वंदन झाले.दोनही ठिकाणी सामुहिक बुद्ध वंदना महेंद्र नरवाडे,सुरेश पाटील, अनिल उमरे व गंगाधर कदम यांनी घेतली.    यावेळी रिपाइं मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक,डॉ. यु.बी.मोरे,वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष किशनराव राठोड, अखिल भारतीय बौध्द उपासक संघाचे राज्य सचिव एड.मिलिंद सर्पे, उत्तम कानिंदे,विवेक ओंकार,नितीन कावळे,एड.जी.एस.रायबोळे,संदिप निखाते,दिलिप पाटील,अंकुश भालेराव,आत्मानंद सोनकांबळे, मल्लुजी येरेकार,विजय नगराळे,नरेंद्र दोराटे,उपश्याम भगत,मंगला कावळे,प्रा.रविकांत सर्पे,गोपले सर,रा जाराम वाघमारे,सुभाष राऊत,चंद्रकांत दुधारे,मा

गोकुंदा ग्रामपंचायत मधील सर्व वार्ड मध्ये पथदिवे लवकरात लवकर लावण्यात यावे - आशिष शेळके (

आशिष शेळके  तालुकाध्यक्ष, जनता माहिती अधिकार समिती महाराष्ट्र राज्य) यांनी गोकुंदा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक प्रविन रावळे यांच्या सोबत केली सर्व समस्यांवर सविस्तर चर्चा. किनवट : मौजे गोकुंदा ग्रामपंचायत मधील सर्व वार्ड मध्ये पथदिवे व सर्व खांबावरचे बल्ब लवकरात लवकर लावण्यात यावी अशी मागणी जनता माहिती अधिकार समिती महाराष्ट्र राज्य चे किनवट तालुका अध्यक्ष आशिष शेळके यांनी गोकुंदा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक प्रविन रावळे यांना केली आहे.           सविस्तर वृत्त असे की, बऱ्याच महिन्यांपासून गोकुंदा ग्रामपंचायत मधील बऱ्याच वार्ड मध्ये पथदिवे व खांबावरचे बल्ब खराब झाले आहेत त्यामुळे सर्व वार्ड मधील नागरिकांमध्ये रात्री ला भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. खांबावरती पथदिवे व बल्ब नसल्या कारणाने चोरीचे व लुटमारीचे प्रमाण ही वाढले आहेत, तसचे आता दिवस ही लवकर मावळत आहे तर काही विद्यार्थ्यांना देखील कोचिंग क्लासेस मधुन येताना अंधारातच घरी यांव लागत आहे त्यामुळे या अंधारामुळे पालक व विद्यार्थी दोघेही त्रस्त आहेत. तसेच महिला व लहान मुले-मुली आता दुर्गा उत्सव निमित्त गर्भा खेळण्यासाठी घरापासून दुर दुर्गा

तालुका विधी सेवा समिती व अभिवक्ता संघाच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत कायदे विषयक शिबिर

  किनवट,दि.११ :  तालुका विधी सेवा समिती व अभिवक्ता संघाच्या वतीने आझादी का अम्रत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत सोमवारी(दि.११) गोकुंदा(ता.किनवट)  येथे सकाळी साडे अकरा वाजता तालुका विधी सेवा समितीचे सदस्य व वकील संघाचे माजी सचिव एड.दिलिप काळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम पंचायत प्रांगणात कायदेविषयक शिबिर घेण्यात आले.    यावेळी तालुका विधी सेवा समितीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष के.मुर्ती यांनी प्रास्ताविक केले. एड.दिपा सोनकांबळे व एड. एम.यु.सर्पे यांनी विविध कायद्यांची तोंड ओळख करून दिली. सूत्रसंचालन व अभार प्रदर्शन ग्राम विकास अधिकारी पी.व्ही.रावळे यांनी केले.    कार्यक्रमास सहाय्यक गट विकास अधिकारी बी.बी.राठोड,अभिवक्ता संघाचे सचिव एड.पंकज गावंडे, कोषाध्यक्ष एड.सुनिल येरेकार,जी.एस.वाव्हळे, सामाजिक कार्यकर्त्या प्रविण, पोलिस कर्मचारी सुभाष दोनकलवार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.     यावेळी श्री.मिसलवार, वाहन चालक कागणे,शेख मकदुम, जमुना राठोड,कविता गोनारकर,विशाखा कांबळे, उमरेबाई यांच्यासह  अनेक प्रतिष्ठित नागरिक, महीला व पुरुष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

किनवट मॉर्निंग वॉक समूहाकडून केलेल्या श्रमदानास वन्यजीवांनी दिली दाद... दगडी बांधावर विसावले दोन वाघ..!

किनवट/ खरबी: पैनगंगा अभयारण्यात काही दिवसापूर्वी वन्यजीव सप्ताह निमीत्त श्रमदानातून तयार करण्यात आलेल्या दगडी बांधावर वाघाचे जोडपं आराम करत असल्याचे छायाचित्र नुकतेच समाज माध्यमातून प्रसिद्ध झाले होते. तेव्हा पासून हे छायाचित्र सर्वत्र कुतूहलाचा विषय बनले आहे.          किनवट शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या  पैनगंगा वन्यजीव अभयारण्यात नुकतेच  कर्मचाऱ्यांनी आपल्या कॅमेरा मध्ये दोन वाघ मॉर्निंग वॉक समुह व वन परिक्षेत्र खरबी यांच्या श्रमदानातून तयार केलेल्या दगडी बांधावर विसावलेले चित्र कॅमेरा मध्ये कैद केले होते.        टिप्पेश्वर अभयारण्यातून हे वाघ या ठिकाणी आलेले शक्यता वर्तविण्यात येत आहे. या वरुन पैनगंगा अभयारण्य सर्वकाही व्यवस्थित असल्याचे  लक्षात येत. अन्यथा गेले 2 वर्षे वाघ इथे राहीलेच नसते. हे अभयारण्य विविधांगी परिपूर्ण असुन वाढती वनराई वन्यजीवांसाठी अधिक पोषक वातावरण तयार होण्यास मदत होत आहे. वन्यप्रेमीनां जंगल सफारीचीही  व्यवस्था करण्यात आलेली आहे. पैनगंगा अभयारण्य हे किनवट साठी एक वरदान ठरल्याची प्रतिक्रीया सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.

आजाद समाज पार्टीच्या नांदेड जिल्हा प्रभारी पदी दिनेश लोणे पाटनुरकर यांची निवड

  नांदेड : आजाद समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश कोर कमिटी सदस्य तथा नांदेड जिल्हा प्रभारी पदी दिनेश लोणे पाटनुरकर यांची करण्यात आली. आजाद समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश कोर कमिटी सदस्य तथा नांदेड जिल्हा प्रभारी पदी दिनेश लोणे पाटनुरकर यांची करण्यात आली. या निवडीचे नियुक्ती पत्र आजाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राहुल प्रधान यांच्या हस्ते देण्यात आले. नांदेड जिल्ह्यामध्ये युवा पँथर सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अनेक देशात दलितांवर होणारे अन्याय अत्याचार,शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ,विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी असे अनेक आंदोलन मोर्चे काढून पीडितांना न्याय मिळवून देण्याचे काम केल. याचीच दखल घेऊन राहुल प्रधान यांनी आजाद समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश कोर  कमिटी सदस्य तथा नांदेड जिल्हा प्रभारी पदी दिनेश लोणे पाटनुरकर यांची निवड केली.  आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.राहूलदादा प्रधान यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर आजाद समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश कोर कमिटी सदस्य तथा नांदेड जिल्हा प्रभारी पदाची जबाबदारी दिली. आजाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई चंद्रशेखर आजाद या

महाराष्ट्र बंद च्या हाकेला किनवट बंद पाळण्यात आला

  किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर) उत्तर प्रदेश येथील लखिंपुर येथे शेतकऱ्यांना स्वतःच्या गाडीने चिरडून मृत व जखमी करण्यात आले होते त्या घटनेतील मुख्य आरोपी आशीष मिश्रा यांच्यावर खटला चालून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी होत असून मागणीच्या समर्थनार्थ महाराष्ट्र महा विकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिनांक 11/10/2021 रोजी देण्यात आली त्याचे पडसाद किनवट मध्ये उमटले असून शहरांमध्ये शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड , काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत रेड्डी व मा क पा चे जनार्दन काळे यांनी व्यापाऱ्यांना बंद पाळण्यासाठी व बंद मध्ये सहभागी होण्यासाठी आव्हान केले होते व्यापाऱ्यांनी या बंदला मात्र तेवढा प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून आले परिसरातील गोकुंदा ग्रामपंचायत पूर्णता शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ व आरोपी आशिष मिश्रा यांच्या विरोधात व्यापाऱ्यांनी 100% बंद पाळून सिद्ध केले यावेळी किनवट मध्ये शिवसेना ,राष्ट्रवादी, काँग्रेस व डी वाय फा य च्या कार्यकर्त्यांनी शहरात फिरून व्यापारी प्रतिष्ठाने बंद पाळण्यात यावे यासाठी परिश्रम

शक्यतोवर गावातील तंटे तंटामुक्त समितितच मिटवा: न्यायमूर्ती एस.बी.अंभोरे

  किनवट,दि.१० : कुणाचे चांगले नाही करता आले तर,किमान  कुणाचे वाईटही करु नका. वाद करुच नका ,वाद झाल्यास तो गावच्या तंटामुक्त समितित मिटवा.भांडणात मजा नाही.भांडण झाल्यास मध्यस्तामार्फत मिटवून घ्या.संगत करतांना चांगल्या माणसाची संगत करा,असे आवाहन न्यायमूर्ती एस.बी.अंभोरे यांनी केले.    तालुका विधी सेवा समिती व अभिवक्ता संघाच्या वतीने आझादी का अम्रत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत रविवारी (ता.१०) मांडवा (कि.)ता.किनवट)येथे सकाळी साडे दहा वाजता न्यायमूर्ती एस.बी.अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम पंचायत प्रांगणात कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते.    यावेळी तालुका विधी सेवा समितीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष के.मुर्ती, समितीच्या सदस्या एड.दिव्या पाटील,एड.शामिले,अभिवक्ता संघाचे सचिव एड.पंकज गावंडे,माजी उपाध्यक्ष एड.एम.यु.सर्पे यांनी विविध कायद्यांची तोंड ओळख करून दिली. प्रास्ताविक विधी सेवा समितीचे सदस्य एड.दिलिप काळे यांनी केले.सूत्रसंचालन विठ्ठल चिठ्ठेवार यांनी केले,तर अभार प्रदर्शन प्रशासक एस.के तिरमनवार यांनी केले.    कार्यक्रमास सहाय्यक गट विकास अधिकारी डी.बी.राठोड,अभिवक्ता संघा

ऑल इंडिया पँथर सेनेने जपली सामाजिक बांधिलकी

     नांदेड : एकदरा ग्रा.प ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुकाध्यक्ष तसेच एकदरा ग्रा.प सदस्य सतीश हिंगोले  यांच्या वाढदिवस निमित्त सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाच्या काळात जी ऑक्सीजन विना अनेक जनतेस आपला प्राण गमवावा लागला होता ही परिस्थिती भविष्यात घडू नये. म्हणून सामाजिक बांधिलकीतून ऑल इंडिया पँथर सेनेचे नांदेड तालुका अध्यक्ष यांनी आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा प्रांगणात वृक्ष लागवड करून सामाजिक बांधिलकी जपली.व प्रत्येक व्यक्तीने किमान दरवर्षी आपल्या शुभप्रसंगी  एक झाड रोपन करून त्याची जोपासना करावी असे यांनी सांगितले येणाऱ्या काळामध्ये ऑक्सिजन तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून आपल्या गावाच्या खुल्या मैदानात ,बांधावर ,रस्त्याच्या दुतर्फा बाजूला ,गावातील गायरान जमिनीवर ,शाळेच्या प्रांगणात सर्व गावकऱ्यांनी म्हणून श्रमदानातून वृक्ष लागवड करून सामाजिक समतोल जपावा. यातून निसर्गाचा समतोल व निसर्गाची पाणी पातळी वाढण्यास मदत होते असे प्रतिपादन सतीश इंगोले एकदरेकर यांनी केले  जिल्हा परिषद शाळा एकदरा येथे वृक्ष लागवड करून वाढदिवस साजरा करण्यात आला.     त्यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया पँथर सेनेचे

नसीर तगाले यांना म. गांधीरत्न पुरस्कार

किनवट: मुंबईच्या मेहर हॉल मध्ये डॉक्टर कृष्णा चव्हाण द्वारा महात्मा गांधी रत्न अवार्ड 2021 चे शानदार आयोजनकरण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासी बहुल भागातील आज की न्युज चे संपादक नसीर तगाले यांना मुंबई येथे "महात्मा गांधी रत्न अवार्ड 2021" ने सन्मानीत करण्यात आले. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद भालेराव, तालुका अध्यक्ष आशिष शेळके, तालुका उपाध्यक्ष शेख आतिफ , सहसचिव प्रणय कोवे, तालुका संघटक राज माहुरकर ,प्रसिद्धीप्रमुख गंगाधर कदम,सदस्य विशाल गिमेकर ,रमेश परचाके आदी उपस्थित होते. राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या जयंतीदिनी मुंबई या देशाच्या आर्थिक एक राजधानीमध्ये डॉक्टर कृष्णा चव्हाण यांनी महात्मा गांधी रत्न अवार्ड 2021 चे शानदार आयोजन केले होते कृष्णा चव्हाण फाउंडेशन रजिस्टर रजिस्टर्ड महात्मा गांधी रत्न अवार्ड 2019 चे आयोजन केले होते डॉक्टर डॉ भारती लव्हेकर, वर्सोवा अंधेरी मुम्बई च्या आमदार आणि गजेंद्र चौहान यांच्या हस्तेव सर्वाना आवार्ड प्रदान करण्यात आले. यात महात्मा गांधी रत्न अवार्ड

संजय वानखेडे यांचा वाढदिवस सभापती यांच्या दालनात साजरा

  किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर) किनवट पंचायत समिती सभापती यांच्या दालनात ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय वानखेडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सारखणी ग्रामपंचायत येथे सेवक या पदावर कार्यरत असलेले संजीव वानखेडे यांचा पंचायत समितीचे सभापती दालनात ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे कर्मचारी व सभापती यांचे चिरंजीव दत्ताभाऊ आडे उपसभापती कपिल करेवाड माजी उपसभापती गजानन कोल्हे पाटील पंचायत समिती सदस्य निळकंठ कातले, अखिल भारतीय अपंग कामगार संघटनेचे तालुका सचिव राज माहुरकर, शंकर चिंचोळकर, विजय वाघमारे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला.

मौलाना कलीम सिद्दिकी यांची सुटका करा - टिपू सुलतान ब्रिगेड किनवटची मागणी

  किनवट/सय्यद नदीम                उत्तर प्रदेश एटीएस ने भारतीय मुस्लिमांचे आदरस्थान आणि श्रद्धास्थान आदरणीय मौलाना कलीम सिद्दिकी यांना धर्मांतरण करण्याच्या आरोपात अटक केली आहे. मौलाना कलीम सिद्दिकी यांनी कोणताच गुन्हा केलेला नाही. हा आरोप पूर्णतः द्वेष भावनेने प्रेरित आणि निराधार आहे. मौलाना कलीम सिद्दिकी यांनी कोणालाच धर्मांतर करण्यास जबरदस्ती केलेली नाही. भारतीय राज्यघटनेने सर्व भारतीय नागरिकांना आपापल्या धर्मानुसार आचरण करण्याचा, आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचा आणि आपल्या इच्छेनुसार कोणत्याही धर्माचा स्वीकार करण्याचा अधिकार दिलेला आहे. मौलाना कलीम सिद्दिकी साहेब सारख्या देशभक्त, समाज सुधारक आणि हिंदू-मुस्लीम समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी झटणाऱ्या व्यक्तीस खोट्या गुन्ह्यात अटक करणे आणि त्यांना पोलीस पोलीस कोठडीत ठेवणे हे बेकायदेशीर आणि लोकशाहीला मारक आहे. ही अटक द्वेष भावनेतून आणि येणाऱ्या काळातील उत्तर प्रदेशच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेशात राजनीतिक ध्रुवीकरण करण्याचा, समाजात फूट पाडण्याचा, समाजात भांडणे लावून देशात अराजकता माजवण्याचा घाणेरड

रामराव जगन्नाथ कावळे यांचे निधन

  🔳 *निधन वार्ता*🔳 *रामराव जगन्नाथ कावळे* यांचे दि.५/१०/२०२१ सकाळी ७ वा. रोजी वृध्दापकाळाने निधन झाले आहे त्यांचा अंत्यविधी   शांतीभुमी परीसर बस्टँड जवळ किनवट (३ वाजता ) आहे त्यांच्या पश्चात दोन मुले , चार मुली ,जावई नातवंडं असा परीवार आहे ते सिद्धार्थ नगर येथील आंनद कावळे व दिनेश ( दाऊ कावळे) यांचे वडील होत ते सिद्धार्थ  नगरचे वरीष्ठ उपासक होते .