Skip to main content

शिवभक्त, शिवसैनिकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या किंवा मला अटक करा -खासदार हेमंत पाटील यांची आक्रमक भूमिका !

 


हिंगोली : वसमत येथे १३ ऑक्टोबर  रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती अश्वारूढ पुतळ्याच्या आगमनाप्रित्यार्थ काढण्यात आलेल्या मिरवणुकी मध्ये सहभागी झालेल्या  शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी,कार्यकर्ते आणि शिवभक्तांवर  वसमत पोलिसांनी गुन्हे दाखल केले . याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेऊन  शिवभक्तांवर ,शिवसैनिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्या,  किंवा मला अटक करा अश्या कडक  शब्दात पोलीस प्रशासनाचा तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला आणि थेट  हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या गेटसमोर धरणे आंदोलन करून तात्काळ  गुन्हे मागे न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला . 


                  मराठी मनाचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती अश्वारूढ पुतळा वसमत येथे १३ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात आणण्यात आला . यावेळी वसमत तालुका आणि तमाम हिंगोली जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिवभक्त या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते . परंतु वसमत पोलिसांनी दंडेलशाही करत मिरवणुकीमध्ये सहभागी झालेलया सर्वच शिवसेना लोकप्रतिनिधी, शिवसैनिक आणि  शिवभक्तांवर खोटे गुन्हे दाखल  केल्याची वार्ता संपूर्ण जिल्हा आणि महाराष्ट्रभर पसरताचा खासदार हेमंत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेऊन संपूर्ण हिंगोली जिल्हा पोलीस प्रशासनाचा तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला आणि  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्यावर जर आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होत असतील तर आम्ही खुशाल जेलमध्ये जायला तयार होत आहोत . परंतु चुकीच्या पद्धतीने दाखल होणारे  गुन्हे कदापी खपवून घेतले जाणार नाहीत अश्या कडक शब्दात इशारा देऊन   खासदार हेमंत पाटील , आ. संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धरणे आंदोलन केले .  शिवभक्तांवर ,शिवसैनिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्या,  किंवा मला अटक करा अशी गर्जना करून जिल्हा पोलीस प्रशासनाचा निषेध केला. 

                यावेळी खासदार हेमंत पाटील यांच्या सोबत जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर, सहसंपर्कप्रमुख डॉ रमेश शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम, उपजिल्हाप्रमुख सुनिल भाऊ काळे, परमेश्वर मांडगे, उध्दवराव गायकवाड, संदेश देशमुख, तालुकाप्रमुख भानुदास जाधव, आनंदराव जगताप, अंकुश आहेर, राजु चापके, नगराध्यक्ष श्रीनिवास पोरजवार, रमेश दळवी, जि.प.सभापती फकीरा मुंडे, जि.प. सदस्य विठ्ठल चौतमाल, बाळासाहेब मगर, नंदकिशोर खिलारे, नगरसेवक सुभाष बांगर, राजेश इंगोले, प्रल्हाद राखोंडे, ईश्वर तांबोळी, संभाजीराव बेले, काशिनाथ भोसले, बाबा आफुने, राजु पाटील, लक्ष्मीकांत देशमुख, दतराव लोंढे, भाई कराळे, रवी नादरे, संतोष शेळके, जसवंत काळे, धीरज कुलथे, ज्ञानेश्वर बांगर, रामप्रसाद हरबळे, व्यंकटी कऱ्हाळे, प्रमोद भुसारे, ज्ञानेश्वर भालेराव, हनुमान चव्हाण, चंदू शिंदे, ज्ञानेश्वर कदम, ज्ञानेश्वर हरबळे, पप्पू कदम, हनुमान बांगर यांच्यासह शेकडो शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...