Skip to main content

Posts

Showing posts from July, 2026

दिल्लीतील विद्यार्थी लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ किनवट-गोकुंदा कडकडीत बंद

  राजेश पाटील किनवट - दिल्ली येथील ऐतिहासिक जंतर-मंतर मैदानावर विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ दी. (२३ जुलै) किनवट व गोकुंदा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. दिल्लीतील लाठी हल्ल्याचे किनवट तालुक्यात तीव्र पडसाद उमटले. 'वंचित बहुजन आघाडी'च्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी 'महाराष्ट्र बंद'च्या हाकेला किनवट शहरात अभूतपूर्व स्वयंस्फूर्त सर्वानी बंदम ध्ये सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करत किनवट शहरासह गोकुंदा मधील व्यापारी वर्गाने या राज्यव्यापी बंद प्रतिसाद देत आपल्या सर्व व्यावसायिक प्रतिष्ठानांची कुलपे बंद ठेवून या आंदोलनात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या या शांततापूर्ण आणि अहिंसक आवाहनाला शिवसेना (उबाठा) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस पक्षानेही खंबीर पाठिंबा दर्शवला. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) स्थानिक नेतृत्वानेही पोलीस प्रशासनाला अधिकृत निवेदन देऊन या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा घोषित केला. नेत्य...

गोकुंदा येथील महात्मा फुले विद्यालयात एनसीसी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा 📡📡 *सत्यशोधक न्यूज*

किनवट, ता. १० (बातमीदार) : महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा(ता. किनवट) येथे एनसीसी अधिकाऱ्यांच्या सदिच्छा भेटीचा व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात नुकताच (ता.08) पार पडला. एनसीसीचे महत्त्व, शिस्त, नेतृत्वगुण, देशसेवा तसेच करिअरच्या विविध संधींबाबत विद्यार्थ्यांना यावेळी प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले.      संस्थेचे सचिव अभियंता प्रशांत ठमके तसेच संस्थेच्या कोषाध्यक्षा व प्राचार्या शुभांगी ठमके यांच्या पुढाकारातून ८ जुलै रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमास एनसीसी ग्रुप मुख्यालय, छत्रपती संभाजीनगरचे ग्रुप कमांडर तसेच ५२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, नांदेडचे कमांडिंग ऑफिसर कर्नल के. दिलीप रेड्डी यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. एनसीसीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वक्षमता, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेची भावना विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले.     यावेळी शिक्षणतज्ज्ञ किशोरी पाठक यांनीही विद्यार्थ्यांना शिक्षणातील सातत्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि जीवनमूल्यांचे महत्त...

गोकुंदा येथील महात्मा फुले विद्यालयात एनसीसी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा

  किनवट, ता. १० (बातमीदार) : महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा(ता. किनवट) येथे एनसीसी अधिकाऱ्यांच्या सदिच्छा भेटीचा व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात नुकताच (ता.08) पार पडला. एनसीसीचे महत्त्व, शिस्त, नेतृत्वगुण, देशसेवा तसेच करिअरच्या विविध संधींबाबत विद्यार्थ्यांना यावेळी प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले.      संस्थेचे सचिव अभियंता प्रशांत ठमके तसेच संस्थेच्या कोषाध्यक्षा व प्राचार्या शुभांगी ठमके यांच्या पुढाकारातून ८ जुलै रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमास एनसीसी ग्रुप मुख्यालय, छत्रपती संभाजीनगरचे ग्रुप कमांडर तसेच ५२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, नांदेडचे कमांडिंग ऑफिसर कर्नल के. दिलीप रेड्डी यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. एनसीसीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वक्षमता, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेची भावना विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले.     यावेळी शिक्षणतज्ज्ञ किशोरी पाठक यांनीही विद्यार्थ्यांना शिक्षणातील सातत्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि जीवनमूल्यांच...