किनवट: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड चे उपकेंद्र कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, किनवट येथे एम.एस.डब्ल्यू. (२०२४-२५) बॅचच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साही आणि भावूक वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे समन्वयक डॉ. नितीन गायकवाड होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य (स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड) डॉ. हणमंत कंधारकर लाभले होते. एम.एस.डब्ल्यू. प्रथम वर्ष आणि बी.एस.डब्ल्यू.च्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते. याप्रसंगी बोलताना डॉ. हणमंत कंधारकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "समाजकार्य ही केवळ पदवी नसून ती वंचितांच्या आयुष्यात बदल घडवण्याची एक मोठी जबाबदारी आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम विद्यार्थ्यांनी करावे." अध्यक्षीय भाषणात डॉ. नितीन गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या दोन वर्षांच्या प्रवासाचे कौतुक केले. ते म्हणाले की, "किनवटसारख्या दुर्गम भागात राहून विद्यार्थ्यांनी केलेले क्षेत्रीय कार्य (Field...
संपादक-राजेश पाटील (DJ/BA/MCJ/MJMS/CS) email- rajeshpatil502@gmail.com