किनवट:
दि.८ जागतिक महिला दिनाचे पर्वावर संथागार येथील वृद्धाश्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलाचा सन्मान करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजन ॲड आकांक्षा आळणे यांनी केले होते..
या कार्यक्रमाच्या उद्घाटक तथा अध्यक्षस्थानी किनवट नगरीच्या महिला नगराध्यक्षा श्रीमती सुजाताताई एन्ड्रलवार, होत्या.
स्वागताध्यक्ष पदाची धुरा सामाजिक कार्यकर्त्या शिलाताई बनसोड यांनी सांभाळली
नगर परिषद उपनगराध्यक्ष हसन लाला ,युवानेते करण एन्ड्रलवार यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ,सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली व पुष्पहार अर्पण करण्यात आले.
तर मंचावर नगर सेविका ललीताताई मुनेश्वर, NGO श्रीमती संगिता पाटील, डॉ. प्रज्ञा बहादुरे, नगर सेविका प्रिती नेम्मनिवार, निलोफर भाटी, निकीता आयनेनिवार, ऐश्वर्या धात्रक, रेवती पवार, सपना मंडारे, हर्षावर्धना पाटील, रोहिणी मुनेश्वर, कांताताई सर्पे, निकीता कांबळे, पुनम सोनकांबळे,शशीकला कांबळे, आत्मानंद सत्यवंश ,बंडु गौरकर, शिवा साखरे,कांचन कांबळे, सपना कसबे, दिव्या राठोड आदींची उपस्थिती होती तर मुलींनी सावीत्रीबाई फुले आणि फातीमा शेख यांच्या जिवनावर आधारित समुह नृत्य सादर केले यामध्ये अनुष्का, दिव्या, अंजली , अनुजा कशीष, मिष्टी यांना सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी सोळंके यांनी केले तर आभार प्रदर्शन व विशेष सहकार्य अतुल बनसोड यांनी केले

Comments
Post a Comment