Skip to main content

Posts

Showing posts from June, 2026

राज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन; विविध संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग

  किनवट, दि. ६ : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आज सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, किनवट येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड, किनवट यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला विविध राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.    यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या शौर्य, दूरदृष्टी,लोककल्याणकारी राज्यकारभार आणि स्वराज्याच्या संकल्पनेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. शिवरायांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे असून त्यांच्या आदर्शांचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे वक्त्यांनी सांगितले.    कार्यक्रमात "जय जिजाऊ, जय शिवराय" च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. विविध पक्ष, संघटना व सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींनी एकत्र येत शिवरायांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष पर...