राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किनवट शहरात 'स्वच्छता महामोहीम' सुरू ४० स्वच्छता पथकांद्वारे महिनाभर राबविले जाणार अभियान; 'एक कदम स्वच्छता की ओर'चा नारा
तालुका प्रतिनिधी किनवट : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आणि ३० एप्रिल या 'स्वच्छता दिननिमित्त, किनवट नगर परिषदेच्या वतीने शहरात 'एक कदम स्वच्छता की ओर' व 'स्वच्छ महाराष्ट्र अभियान सप्तपदी' अंतर्गत भव्य स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी स्वतः हातात झाडू घेऊन या मोहिमेत सहभाग नोंदवत स्वच्छतेचा एक अनोखा आदर्श शहरवासीयांसमोर निर्माण केला आहे. ३० एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता प्रभाग क्र. १ मधील रामनगर येथून या महामोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. शहराला चकाचक करण्यासाठी नगर परिषदेने ४० विशेष स्वच्छता पथकांची नियुक्ती केली आहे. पुढील एक महिना हे पथक शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन रस्ते सफाई आणि नालेसफाईची कामे करणार आहेत पावसाळ्यापूर्वीची तयारी म्हणून रस्ते आणि नाल्यांची सखोल स्वच्छता केली जाणार असून ओला व सुका कचरा वेगवेगळ्या पद्धतीने संकलित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. "किनवट शहराला सुंदर आणि स्वच्छ ठेवून आरोग्यदायी जीवन जगणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. हे अभियान यशस्वी करण्या...