Skip to main content

दिल्लीतील अखिल भारतीय महिला शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात डॉ शारदा चोंडेकर यांचा कर्तृत्वगौरव

 


तालुका प्रतिनिधी किनवट:

दिल्लीतील पहिल्या अखिल भारतीय महिला शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनामध्ये डॉ शारदा चोंडेकर यांचा साहित्यातील योगदानबाद्दल सन्मान करण्यात आला.त्या या पहिल्या अखिल भारतीय महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलनाच्या निमंत्रित प्रतिनिधी होत्या.

 डॉ शारदा चोंडेकर, तहसीलदार किनवट यांची  काव्यमय स्पंदने उलगडणाऱ्या वर्णनाला बहिणाबाई चौधरी सभागृहातील उपस्थितांनी मनापासून दाद दिली. शासकीय महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या साहित्य संमेलनाच्या दोन दिवसात   ग्रंथ  दिंडी, चर्चा सत्रे, मुलाखती,कवियत्री महिला अधिकऱ्यांची कविसंमेलने रंगले .देशाच्या राजधानीत महाराष्ट्र सदन येथे छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' मोठ्या उत्साहात संपन्न झाले. 'जागर कर्तृत्वाचा, उत्सव साहित्याचा' हे ब्रीदवाक्य घेऊन हे संमेलन दि ११व १२ एप्रिल २०२६ रोजी पार पडले.

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात   'सरहद, पुणे' आणि महाराष्ट्र शासनाच्या 'मराठी भाषा विभागा'द्वारे आयोजित या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  झाले.  महाराणी ताराबाई यांच्या ३५१ व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र सदन, 'सरहद, पुणे' आणि राज्य शासनाच्या 'मराठी भाषा विभागा'च्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा मंत्री उदय सामंत संमेलनाध्यक्ष लीना मेहंदळे, स्वागताध्यक्ष सुप्रिया देवस्थळी. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आदी उपस्थित होते. निवासी आयुक्त आर. विमला यांनी उपस्थितांचे स्वागत केले, ‘सरहद’चे संजय नहार यांनी प्रास्तविक व समन्वयक लेशपाल जवळगे यांनी आभार मानले.स्त्री-प्रशासकांनी लिहिलेल्या साहित्यातून प्रशासकीय व्यवस्थेवरही एक चांगला

संस्कार झाला तर ही व्यवस्था अधिक वत्सल, सृजनशील अन् सकारात्मक होऊ शकेल. त्यातूनच ती खऱ्या अर्थाने परिपूर्णतेने लोककल्याणकारी होईल, हे या संमेलनाचे वैचारिक अधिष्ठान होय .!

हे अधिष्ठान घेऊन नवी दिल्ली या सर्वोच्च राजकीय-प्रशासकीय सत्तेचा केंद्रबिंदू असणाऱ्या शहरात  संपन्न झालेले साहित्य संमेलन हे लिहिणाऱ्या स्त्रीअधिकाऱ्यांचे पहिले साहित्य संमेलन अशा प्रगल्भजाणिवांचा एक सुंदर आविष्कार आहे.या संमेलनाला महाराष्ट्र राज्य, दिल्ली केंद्र शासन आणि इतर राज्यांमधील कार्यरत महिला अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला.सरकारी कामाच्या धकाधकीतही सर्जनशीलता जपणाऱ्या महिला अधिकाऱ्यांसाठी हा अनुभव आनंददायी ठरेला.महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांचं हे पहिलं असं साहित्य संमेलन असल्यामुळे महाराष्ट्राच्या वाङ्मयमय इतिहासामधील ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट ठरली आहे.या अखिल भारतीय शासकीय महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या साहित्य संमेलनातील सहभागाबद्दल व साहित्यिक योगदानबद्दल डॉ शारदा चोंडेकर, तहसीलदार किनवट यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...