Skip to main content

Posts

Showing posts from May, 2026

किनवटमध्ये २४ मे रोजी भव्य सामूहिक विवाह सोहळा 'अजिंक्य सेवाभावी संस्थे'चा २० वर्षांचा समाजसेवेचा वसा कायम !

   किनवट ता.प्रतिनिधी गोरगरीब आणि गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी अविरत कार्यरत असणाऱ्या येथील प्रसिद्ध 'अजिंक्य सेवाभावी संस्थे 'च्या वतीने येत्या २४ मे रोजी दुपारी १२:३० वाजता एका भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. किनवट येथील कलावती गार्डन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडणार आहे. विवाहबंधनात अडकणाऱ्या नवीन जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी आणि या सामाजिक उपक्रमाचा भाग होण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अजिंक्य सेवाभावी संस्थेने गेल्या सलग २० वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत सामूहिक विवाहाचा हा स्तुत्य उपक्रम सुरू ठेवला आहे. संस्थेने आजवर तब्बल १२ हजारापेक्षा जास्त नवदाम्पत्यांना विवाहबंधनात अडकवून एक नवा इतिहास रचला आहे. आजच्या महागाईच्या काळात अनाठायी खर्चाला लगाम घालणे आणि वेळेची बचत करणे या उद्देशाने असे सामूहिक विवाह सोहळे केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच नव्हे, तर आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांसाठीही काळाची गरज बनले आहेत. या विवाह सोहळ्यात नवविवाहितांना शुभाश...