Skip to main content

किनवटमध्ये २४ मे रोजी भव्य सामूहिक विवाह सोहळा 'अजिंक्य सेवाभावी संस्थे'चा २० वर्षांचा समाजसेवेचा वसा कायम !

 


 किनवट ता.प्रतिनिधी

गोरगरीब आणि गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी अविरत कार्यरत असणाऱ्या येथील प्रसिद्ध 'अजिंक्य सेवाभावी संस्थे 'च्या वतीने येत्या २४ मे रोजी दुपारी १२:३० वाजता एका भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. किनवट येथील कलावती गार्डन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडणार आहे.


विवाहबंधनात अडकणाऱ्या नवीन जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी आणि या सामाजिक उपक्रमाचा भाग होण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अजिंक्य सेवाभावी संस्थेने गेल्या सलग २० वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत सामूहिक विवाहाचा हा स्तुत्य उपक्रम सुरू ठेवला


आहे. संस्थेने आजवर तब्बल १२ हजारापेक्षा जास्त नवदाम्पत्यांना विवाहबंधनात अडकवून एक नवा इतिहास रचला आहे. आजच्या महागाईच्या काळात अनाठायी खर्चाला लगाम घालणे आणि वेळेची बचत करणे या उद्देशाने असे सामूहिक विवाह सोहळे केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच नव्हे, तर आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांसाठीही काळाची गरज बनले आहेत. या विवाह सोहळ्यात नवविवाहितांना शुभाशीर्वाद देण्यासाठी विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्यानेः बेबीताई नाईक, नगराध्यक्ष सुजाताताई येंडूलवार, ॲड. सुभाष ताजने, दत्ता कसबे, मुन्ना खान यांच्यासह अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. हा सोहळा सर्वार्थान अविस्मरणीय करण्यासाठी 'अजिंक्य सेवाभावी संस्थेची संपूर्ण टीम सज्ज

झाली आहे. विवाह मंडप, भोजन व्यवस्था आणि इतर तांत्रिक बाबींचे नियोजन आता अंतिम टप्प्यात आले आहे. सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाची मुख्य जबाबदारी माजी नगराध्यक्ष अरुण आळणे यांनी स्वीकारली आहे. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष ज्योतिबा खराटे, नियंत्रक करण येंड्रलवार, अध्यक्ष अमोल भवरे तर उपाध्यक्ष म्हणून गोलू आढागळे ही जबाबदारी सांभाळत आहेत. संयोजक निखिल वाघमारे यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सोहळा यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मंगल प्रसंगी उपस्थित राहून नवदाम्पत्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी शुभाशीर्वाद द्यावेत, असे आवाहन माजी नगराध्यक्ष अरुण आळणे व अजिंक्य सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...