नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय भगत, कोंडदेव हटकर, अशोक मगरे, वंदना मघाडे, उज्जेनकुमार पाईकराव, सुजाता पोपुलवार, शीला कोकाटे, चांगुणा गोणारकर, सरस्वती गोणारकर, गया कोकरे, लता शिंदे, मनिषा सपकाळे. या सर्व कवींच्या उपस्थितीमुळे कविसंमेलनात विविधता, साहित्यिकता, सामाजिक भान आणि भावनिक उंचीचा संगम पाहायला मिळणार आहे. कार्यक्रमाचे आयोजक सिंधु दहिफळे, नरेंद्र धोंगडे, उषा ठाकूर, सदानंद सपकाळे, बालिका बरगळ, माया तळणकर, सुनंदा भगत, पंकज कांबळे, आविष्कार शिंदे, सुजित भगत, अजित मुनेश्वर, धम्मा सरोदे आहे.

Comments
Post a Comment