किनवट:
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे
संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा
स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले
प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासून ट्रायबल सेवा न्यूज चॅनल च्या माध्यमातून आदिवासी समाज बांधवांच्या सेवेत आहेत. बीए, एमए,बी एड, बीजे (एम.एस) बॅचलर ऑफ जर्नालिझम पत्रकारितेची पदवी त्यांनी प्रदान केली आहे. गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या वृत्तपत्रात लोकमत, जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल, सीके मराठी न्यूज चॅनल, लाईव्ह पत्रकार जनशक्ती न्यूज चॅनल. अशा वेगवेगळ्या चॅनल ला काम करून पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली. त्या ठिकाणी काम करताना त्यांच्या मनामध्ये विचार आला की आपणही आपल्या आदिवासी समाजाला न्याय देण्याकरता आपलं स्वतःचं चॅनल सुरू करावं म्हणून स्वतःचं ट्रायबल सेवा न्यूज चॅनल त्यांनी सुरू केलं. या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक ,क्रीडा या वेगवेगळ्या विषयी समाजावर अन्याय अत्याचार करणाऱ्या बातम्या त्यांनी प्रकाशित केल्या आहेत. लोकांना न्याय मिळवून देण्याच काम त्यांनी खुप मोठ्या प्रमाणात केलं आहे. त्यांच्या ह्या कार्यामुळे त्यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. आमच्या प्रतिनिधी शी बोलताना ते म्हणाले की, मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, की संस्थापक अध्यक्ष आदरणीय विजयजी सुर्यवंशी साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून आदिवासी विकास समितीच्या नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावर मी काम करतांना माझ्या कार्याची दखल घेऊन मराठवाडा अध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली त्याबद्दल प्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो व या पुढे आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहिन याची ग्वाही देतो असे हि ते म्हणाले.
यावेळी प्रसिद्धीप्रमुख संतोष कनाके, गोंडवाना युथ फोर्स अध्यक्ष बालाजी सिडाम, माजी सरपंच अनिल कनाके,आकुंश आडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह गोकुंदा या ठिकाणी ही बैठक घेऊन ही निवड जाहीर करण्यात आली सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार तथा ट्रायबल सेवा न्यूज चॅनल चे मुख्य संपादक प्रणय कोवे यांच्या कार्याची दखल घेऊन मराठवाडा अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली असल्याने त्यांच्या मित्र परिवारांकडून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत असल्याचे दिसून येत आहे.
Comments
Post a Comment