अहमदपूर/ गौतम कांबळे :- सागराचे पाणी कधी आटणार नाही, भिमरावाचे कार्य कधी मिटणार नाही, एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी डाॅ.बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाहि असे गौरवोद्गार प्रा.डाॅ.शेख रब्बानीसर यांनी काढले, गुंजोटी ता.अहमदपूर येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गुंजोटी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच तथा युवा नेते श्री.राम चव्हाण , प्रमुख पाहुणे म्हणून प्रा, बालाजी आचार्य, श्री.बालाजी चावरे व्यासपीठावर उपस्थित होते, कार्यक्रमाची सुरुवात महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजनाने झाली, तद्नंतर भव्य धम्म वंदना करुन ध्वजारोहण सरपंच श्री.राम चव्हाण यांच्या हस्ते व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले, या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे यथोचित सत्कार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जंयती समीतीतर्फे करण्यात आला, प्रा.डाॅ.शेख रब्बानीसर पुढे म्हणाले की डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श वादी विचार आत्मसात करणे गरजेचे आहे, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.राम चव्हाण यांनी पण सर्व महान व्यक्तीचे, समाजसुधारकांची जंयती उत्साहात साजरी करून सामाजिक एकोपा निर्माण करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. सिध्दार्थ वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.सतीश वाघमारे यानी मांडले, कार्यक्रम यशस्वितेसाठी जयंती समितीचे अध्यक्ष श्री.अश्वजित सिरसाट, आशिर्वाद भालेराव, आदींनी परिश्रम घेतले.
किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील प्रगल्भ व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

Comments
Post a Comment