Skip to main content

Posts

Showing posts from September, 2026

आदिवासी महिला अत्याचाराप्रकरणी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्यावर कारवाईची मागणी; 'अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद' आक्रमक

   किनवट : किनवट लगत गोकुंदा (जि. नांदेड) येथील शासकीय विश्रामगृहात एका पीडित विधवा आदिवासी महिलेच्या विनयभंग प्रकरणी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, या घटनेत तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस निरीक्षक गणेश कराड यांना सहआरोपी करून त्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे, अशी जोरदार मागणी 'अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद' (महाराष्ट्र शाखा) च्या वतीने करण्यात आली आहे. दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी गोकुंदा (ता. किनवट) येथील शासकीय विश्रामगृहाच्या स्वयंपाकघरात काम करत असताना बालाजी केंद्रे नावाच्या इसमाने पीडित महिलेसोबत अवाच्य भाषेत शिवीगाळ करत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच या विधवा आदिवासी महिलेला आर्थिक मदतीचे प्रलोभन दाखवून शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तिच्या असहायतेचा अपलाभ घेण्याचा प्रयत्न केला. या संतापजनक घटनेनंतर पीडित महिलेने २१ ऑगस्ट २०२६ रोजी किनवट पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. अखेर २२ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्ह...

२ सप्टेंबरच्या रात्री दीड वाजता पोहचले मंडलवार आणि किनवटचा प्रभार बदलला पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची नियंत्रण कक्षात, जगदीश मंडलवार यांच्याकडे कारभार

  (किनवट शहर प्रतिनिधी)  किनवट येथील दोन अत्यंत संवेदनशील प्रकरणांनंतर वरिष्ठ पोलीस प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. चिखली फाट्यावरील तेलंगणा पोलिसांवरील हल्ला आणि एका आदिवासी विधवा महिलेवरील अत्याचार प्रकरणात गुन्हा नोंदवण्यास झालेला विलंब यामुळे वादग्रस्त ठरलेले किनवट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची अखेर नियंत्रण कक्षात (कंट्रोल रूम) रवानगी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता नियंत्रण कक्षातील जगदीश मंडलवार यांच्याकडे किनवट पोलीस ठाण्याचा नवीन कार्यभार सोपवण्यात आला आहे.चिखली फाट्यावरील थरार आणि सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्हरविवारच्या संध्याकाळी तेलंगणा पोलिसांनी किनवटमधून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले होते. मात्र, त्याला तेलंगणाकडे घेऊन जात असताना चिखली फाटा येथे संशयित शेख जाफर याच्या नातेवाईकांनी तेलंगणा पोलिसांवर थेट हल्ला केला आणि आरोपीला हातकडीसह सोडवून पळवून नेले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर या संशयिताला पुन्हा पकडून तेलंगणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या अत्यंत संवेदनशील घटनेदरम्यान तेलंगणा पोलिसांना स्वसंरक्षणासाठी गोळीबार...

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २३ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या परीसरात हळहळ

   किनवट : मांडवी पोलिस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत असलेल्या २३ वर्षीय गणेश मदन चौफाडे याने गोकुंदा येथील नारायणनगर परिसरातील भाड्याच्या खोलीत जीवन संपवल्याची घटना ३ सप्टेंबर रोजी पहाटे उघडकीस आली. गणेश हा सावरगाव तांडा येथील रहिवासी असून, तो पोलिस भरतीची तयारी करत होता. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गणेश लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर त्याच्या आईने नातेवाइकांच्या मदतीने त्याचे पालनपोषण आणि शिक्षण पूर्ण केले. गणेशची यापूर्वी बीएसएफमध्ये निवड झाली होती. मात्र, काही कारणास्तव त्याने तेथून राजीनामा देऊन परतल्याची माहिती आहे. त्यानंतर तो होमगार्ड म्हणून सेवेत रुजू झाला आणि मांडवी पोलिस ठाण्यात कार्यरत होता. पोलिस भरतीची तयारी करता यावी, यासाठी गणेश गोकुंदा येथील नारायणनगर परिसरात भाड्याच्या खोलीत सचिन जगदीश पवार आणि भवन संतोष या दोन मित्रांसोबत राहत होता. २ सप्टेंबरच्या रात्री मित्रांसोबत काही वेळ गप्पा मारल्यानंतर सर्वजण झोपले. त्यानंतर पहाटे गणेशने आत्महत्या केल्याचे मित्रांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने या घटनेची मा...