राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किनवट शहरात 'स्वच्छता महामोहीम' सुरू ४० स्वच्छता पथकांद्वारे महिनाभर राबविले जाणार अभियान; 'एक कदम स्वच्छता की ओर'चा नारा
तालुका प्रतिनिधी किनवट :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आणि ३० एप्रिल या 'स्वच्छता दिननिमित्त, किनवट नगर परिषदेच्या वतीने शहरात 'एक कदम स्वच्छता की ओर' व 'स्वच्छ महाराष्ट्र अभियान सप्तपदी' अंतर्गत भव्य स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी स्वतः हातात झाडू घेऊन या मोहिमेत सहभाग नोंदवत स्वच्छतेचा एक अनोखा आदर्श शहरवासीयांसमोर निर्माण केला आहे.
३० एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता प्रभाग क्र. १ मधील रामनगर येथून या महामोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. शहराला चकाचक करण्यासाठी नगर परिषदेने ४० विशेष स्वच्छता पथकांची नियुक्ती केली आहे. पुढील एक महिना हे पथक शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन रस्ते सफाई आणि नालेसफाईची कामे करणार आहेत
पावसाळ्यापूर्वीची तयारी म्हणून रस्ते आणि नाल्यांची सखोल स्वच्छता केली जाणार असून
ओला व सुका कचरा वेगवेगळ्या पद्धतीने संकलित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
"किनवट शहराला सुंदर आणि स्वच्छ ठेवून आरोग्यदायी जीवन जगणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ सुजाता विनोद एंड्रलवार यांनी याप्रसंगी बोलताना केले आहे
नगराध्यक्षांच्या या पुढाकाराचे शहरभर कौतुक होत असुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विचारांना अनुसरून सुरू झालेली ही मोहीम किनवट शहराचा कायापालट करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. या मोहिमेत नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवून कचरा कुंडीतच टाकावा, असे आवाहनही नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. याप्रसंगी युवा नेते करण एंड्रलवार,मुख्याधिकारी मुगाजी काकडे, कार्यालयीन अधीक्षक अशोक भालेराव नगरसेवक सुरत सातुरवार,शेखर नेम्मानिवार,प्रीती धीरज नेम्मानीवार,अश्विनी जागरलावार,राम नेम्मानीवार,संतोष मरस्कोल्हे,मारोती मुनेश्वर,माजी शहरप्रमुख संतोष यलचलवार,राजु जोशी,यांच्यासह रामनगर येथील नागरिक मोठया संख्येने या मोहिमेत सहभागी झाली होते.

Comments
Post a Comment