Skip to main content

किनवट येथे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? २०० पुस्तक वाटप व वाचन आ.संजय गायकवाड व धीरेंद्र शास्त्री बागेश्वर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी

 


तालुका प्रतिनिधी किनवट:

४० वर्षापूर्वी कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले छत्रपती शिवरायांच्या अस्सल जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारे शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या शिर्षकावरून बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांच्या आई व पत्नी बाबत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तसेच नागपूर येथील एका जाहीर कार्यक्रमात धीरेंद्र बागेश्वर नावाच्या व्यक्तीने छत्रपती शिवरायांबाबत अनैतीहासिक व खोटे वक्तव्य केल्याने अभ्यासू शिवप्रेमीमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.


त्यामुळे किनवट तालुक्यातील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व परिवर्तनादी व पुरोगामी विचाराच्या संघटनांच्या वतीने दि.२८-एप्रिल मंगळवारी रोजी सायंकाळी ४:३० वा सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले. तसेच किनवट येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कॉ. गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे २०० पुस्तक वाटप व जाहीर वाचन करण्यात आले.


यावेळी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष पठाण मोहम्मद हसन, माजी नगराध्यक्ष के. मूर्ती, माजी सभापती अनिल पाटील कराळे, माजी नगराध्यक्ष अरुण आळणे, पिरीपाचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, अँड. मिलिंद सर्प, प्रा. विजय खुपसे, डॉ. पुंडलिक आमले, मराठा सेवा संघाचे


तालुकाध्यक्ष प्रा. दगडू भरकड, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव बालाजी सिरसाट, प्रा. शिवदास बोकडे, राजू शिंदे, प्रवीण गायकवाड, रमेश कदम, शिवा पवार, गोविंद आरसोड, सदानंद काळे, सुमित माने आकाश इंगोले, गजानन माने, शिवाजी काळे, सुरेश पाटील, आशिष शेळके, गंगाधर सोळंके मारुती मुनेश्वर, प्रशांत कानवटे, अजय पाटील, विजय वाघमारे, गंगाधर कदम, विशाल शिंदे, भुजंग मेश्राम, राजेश पाटील आदीसह विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते

शिवप्रेमी व पुरोगामी संघटनाचे कार्यकर्तेसह समाज बांधव उपस्थित होते.

यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रा. दगडू भरकड यांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून आ. संजय गायकवाड व धीरेंद्र शास्त्री बागेश्वर यांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व शिवाजी कोण होता ? या पुस्तकाचे लेखक स्मृतिशेष कॉ. गोविंद पानसरे यांच्या बाबत अवमानकारक वक्तव्य करून प्रकाशक प्रशांत आंबी यांना मोबाईल व्दारे त्यांच्या आई व पत्नीबाबत अर्वाच्च व अश्लील भाषेत शिवीगाळ करून दहशत निर्माण केल्या प्रकरणी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचे विरुद्ध, तसेच छत्रपती शिवरायाबाबत आक्षेपार्ह अनऐतिहासिक व खोटे वक्तव्य करणाऱ्या धीरेद्र शास्त्री बागेश्वर यांचे विरुद्ध कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन नायब तहसीलदार मुंडे यांचे मार्फत प्रशासनास सादर करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...