Skip to main content

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

 



राजेश पाटील किनवट,

ता.१४: महात्मा जोतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सव समिती व भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आज(ता.१४) उत्साहात साजरी करण्यात आली.

     जयंतीचा मुख्य सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी ११ वाजता संपन्न झाला.भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्या हस्ते पंचशील ध्वजवंदन करण्यात आले.अनिल उमरे व महेंद्र नरवाडे यांनी सामुदायिक वंदना घेतली.आमदार भीमराव केराम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले. दरम्यान आत्मानंद सत्यवंश यांनी भीम गित सादर केले व ब्लु युनीटी बिट्स ग्रुपच्या मुलींनी सुंदर समुह नृत्य सादर केले तसेच

याठीकाणी ॲड.दिलिप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.सुनिल येरेकार यांनी खिचडी व पाणी बाॅटलचे वाटप केले.

नगरसेविका ललिता मुनेश्वर यांनी बुंदी लाडूचे वाटप केले. गुरुस्वामी पवार यांनी शितपेयाचे वाटप केले, एका कार्यकर्त्याने थंड मठ्ठ्याचे वाटप केले.

      बसस्थानकात आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते ,तर जेतवन बुद्ध विहारात नगराध्यक्षा सुजाता येंड्रलवार यांच्या हस्ते पंचशील ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी युवा नेते करण एंड्रलवार,  शिवसेनेचे शहर प्रमुख प्रशांत कोरडे, नगरसेवक श्रीनिवास नेम्मानीवार, नगरसेविका ललिता मुनेश्वर,प्रा.रामप्रसाद तौर,प्रा.दगडू भरकड, रिपाइं चे नेते दादाराव कयापाक,पीरिपाचे विनोद भरणे,मारोती मुनेश्वर, उपप्राचार्य प्रा डॉ.पंजाब शेरे, ॲड मिलिंद सर्पे, मिलिंद धावारे, विवेक ओंकार, शंकर नगराळे, आकाश आळणे,ॲड.आकांक्षा आळणे, निखिल कावळे,ॲड.सम्राट सर्पे,साजिद बडगुजर,प्रा.रविकांत सर्पे, महेंद्र नरवाडे संजय नरवाडे, सुबोध सर्पे, लक्ष्मीकांत कापसे, राजेश पाटील, प्रफुल आढागळे यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आजी - माजी लोकप्रतिनिधी यांच्यासह महीला, पुरुष ,बालके मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष निखिल सर्पे व समितिचे आकाश सर्पे,अनिकेत भरणे, सिद्धार्थ भरणे,ऑलफ्रेंड ठमके, संघर्ष घुले,अनिल कांबळे यांनी पुढाकार घेतला.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...