Skip to main content

गोकुंदा ग्राम पंचायतीच्या हद्दीत सुमार दर्जाचे विद्युत साहीत्य बसविण्याचा सपाटा ; गोकुंदा वासियांची चौकशीची मागणी



किनवट,दि.२९ :  ग्राम पंचायतीवर प्रशासक असल्याचा फायदा उचलत व प्रशासक जास्त लक्ष देऊ शकणार नाही, हे ओळखून गोकुंद्याच्या  ग्रामसेवकांनी अत्यंत घाई गडबडीत अत्यंत सुमार दर्जाचे विद्युत खांब, पथदीवे(आय.एस.आय.) मार्क नसणारे विद्युत साहीत्य बसविण्याचा  सपाटा सुरु केला आहे. हे साहीत्य किती काळ टिकेल,हे लवकरच कळेल.या सुमार दर्जाच्या साहीत्याची सक्षम यंत्रणे मार्फत चौकशी करावी व यात दोषी असणाऱ्या विरुद्ध कडक कार्यवाही करावी,अशी मागणी गोकुंदा ग्रामवासी करीत आहेत.

    किनवट चे उपशहर अशी ओळख असलेल्या व तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत असलेल्या गोकुंदा (ता. किनवट) ग्रामपंचायती मधील सर्व वार्डमध्ये पथदिवे व सर्व खांबावरचे पथदिवे लवकरात लवकर लावण्यात यावेत, अशी मागणी जनता माहिती अधिकार समिती, महाराष्ट्र राज्य चे तालुका अध्यक्ष श्री. आशिष यांनी ग्रामसेवक यांची भेट घेऊन नुकतीच  केली होती.

          खांबावरती पथदिवे व बल्ब नसल्या कारणाने चोरीचे व लुटमारीचे प्रमाण ही वाढले होते.तसचे आता दिवस ही लवकर मावळत आहे.काही विद्यार्थ्यांना देखील कोचिंग क्लासेस मधून येताना अंधारातच घरी यांव लागत आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थी दोघेही त्रस्त आहेत.काही वाईट प्रकरण घडण्याच्या आधी सर्व वार्ड मध्ये लवकरात लवकर पथदिवे व खांबावरचे पथदिवे लावण्यात यावेत, अशी मागणी जनता माहिती अधिकार समिती, महाराष्ट्र राज्य,तालुका शाखेचे अध्यक्ष श्री. आशिष यांनी ग्रामसेवक यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली होती.

          अंधाराच्या समस्ये सोबतच नाल्या साफ - सफाई व कचरा गाडी ची समस्यां देखील श्री. आशिष यांनी ग्रामसेवकाच्या निदर्शनास आणून दिली होती. सर्व वार्डामध्ये नाल्या  या कचऱ्यांनी व पाण्यांनी तुडुंब भरलेल्या आहेत,तर काही वार्डामध्ये नाली साफ - सफाई कामगार हे बऱ्याच महिन्यांपासून आलेले नाहीत. तसेच काही वार्ड मध्ये भरपुःःर कचरा व घाणीचा ढीग झालेले आहेत. त्यामुळे वार्ड मध्ये दुर्गंधी चे व मच्छरांचे राज पसरले व वाढले आहे.पर्यायाने रोगराईचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे कचरा गाडी व नाली सफासफाई कामगारांना दर आठवड्याला सर्व वार्ड मध्ये पाठवावे, अशी विनंती ही आशिष यांनी ग्रामसेवक यांच्याकडे केली होती.

      त्यावेळी येत्या काही दिवसांमध्ये सर्व वार्ड मधील पथदिवे व खांबावरचे पथदिवे आणि नालीसाफसफाई व कचरा गाडी या सर्व समस्या सुटणार, अशी ग्वाही ग्रामसेवक यांनी श्री. आशिष यांना दिली होती.अभ्यासु व कर्तव्यदक्ष ग्रामसेवक अशी प्रतिमा असणारे ग्रामसेवक हे त्यांचा शब्द पाळुन आपल्या कर्तव्यांशी एकनिष्ठ राहुन या सर्व समस्या खरंच आठ दिवसांत सोडणार का याची प्रतिक्षा नागरिक करीत होते.

   दरम्यान,सदरील प्रकरणाची माहीती घेण्यासाठी व वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी सदरील ग्राम सेवकाशी अनेक वेळा भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...