Skip to main content

वसमत येथील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचा पंचनद्यांच्या जलाने होणार जलाभिषेक शिवभक्त , शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ; खासदार हेमंत पाटील यांचे आवाहन


हिंगोली/ वसमत : वसमत शहरात १३ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याच्या  आगमन प्रसंगी राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे आणि  माजी आ. जयप्रकाश मुंदडा यांच्या कडून अनावधानाने जो निंदनीय प्रकार झाला त्यामुळे तमाम शिवभक्त शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत . अखंड हिंदुस्थानचे दैवत , मराठी मनाचे मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पावित्र्य अबाधित राहावे याकरिता  गोदावरी, आसना, पूर्णा, कयाधु, पैनगंगा या पाच नद्यांचे जल आणून जलाभिषेक करण्यात येणार आहे . या सोहळ्याला  शिवसैनिक व शिवप्रेमींनी उद्या १७ ऑक्टोबर  रोजी  सकाळी आठ वाजता हजारोंच्या संख्येने वसमत येथे उपस्थित राहावे असे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे . 

                वसमत वासियांची मागील ४० वर्षाची मागणी १३ ऑक्टोबर २०२१ रोजी पूर्ण झाली मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचे आगमन झाले . यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये अतिउत्साहाच्या भरात राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे आणि  माजी आ. जयप्रकाश मुंदडा यांच्या कडून अनावधानाने निंदनीय प्रकार घडला याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले होते यामुळे देश आणि राज्यभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या . तसेच पोलिसांनी दंडेलशाही करत सहभागी झालेल्या शिवप्रेमी शिवभक्तांवर आणि शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले . मिरवणुकीनंतर झालेल्या प्रकारामुळे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पावित्र्य मालिन झाले असल्याची भावना जिल्हाभरातील शिवप्रेमी,  शिवभक्तांनी बोलून दाखवली यामुळे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पावित्र्य अबाधित राहावे याकरिता खासदार हेमंत पाटील आणि शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. संतोष बांगर हे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील गोदावरी, आसना, पूर्णा, कयाधु, पैनगंगा या पंचनद्यांच्या जलाने  जलाभिषेक करणार आहेत या जलाभिषेक सोहळ्याला हिंगोली जिल्ह्यातील तमाम शिवभक्त शिवसैनिक आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने  वसमत येथे सकाळी आठ वाजता  छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात  उपस्थित राहावे असे आवाहन खासदार हेमंत पाटील आणि आ. संतोष बांगर यांनी केले आहे .

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...