किनवट:
मुंबईच्या मेहर हॉल मध्ये डॉक्टर कृष्णा चव्हाण द्वारा महात्मा गांधी रत्न अवार्ड 2021 चे शानदार आयोजनकरण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासी बहुल भागातील आज की न्युज चे संपादक नसीर तगाले यांना मुंबई येथे "महात्मा गांधी रत्न अवार्ड 2021" ने सन्मानीत करण्यात आले. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद भालेराव, तालुका अध्यक्ष आशिष शेळके, तालुका उपाध्यक्ष शेख आतिफ , सहसचिव प्रणय कोवे, तालुका संघटक राज माहुरकर ,प्रसिद्धीप्रमुख गंगाधर कदम,सदस्य विशाल गिमेकर ,रमेश परचाके आदी उपस्थित होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या जयंतीदिनी मुंबई या देशाच्या आर्थिक एक राजधानीमध्ये डॉक्टर कृष्णा चव्हाण यांनी महात्मा गांधी रत्न अवार्ड 2021 चे शानदार आयोजन केले होते कृष्णा चव्हाण फाउंडेशन रजिस्टर रजिस्टर्ड महात्मा गांधी रत्न अवार्ड 2019 चे आयोजन केले होते डॉक्टर डॉ भारती लव्हेकर, वर्सोवा अंधेरी मुम्बई च्या आमदार आणि गजेंद्र चौहान यांच्या हस्तेव सर्वाना आवार्ड प्रदान करण्यात आले. यात महात्मा गांधी रत्न अवार्ड 2021 सुनील बोंडे एसीपी, अनु मलिक, मधुश्री, गजेंद्र चौहान, डायरेक्टर मेहुल कुमार, प्रेमा किरण, सुनील पाल, एहसान कुरैशी, बीएन तिवारी,सिकन्दर खान, अरुण उग्रेजा, ज़ुबैर अली खान, ऎक्ट्रेस शबनम खान, मुनीश खान, गीतकार सुधाकर शर्मा, पारस अरुण बख्शी, दादा साहेब फाल्के के पोते चंद्रशेखर पुसाल्कर, डॉ योगेश लखानी, गणेश पचाने, आदत एमपी डायरेक्टर साउथ सिनेमा, वीआईपी कॉमेडियन, अली खान, एकता जैन, बबलू एक्स पोकल्स, आर राजपाल बेस्ट पब्लिसिटी डिज़ाइनर तसेच अनेक दिग्गजना सन्मानित करण्यात आले.
(राजेश पाटील/किनवट) मोजे दरसांगवी(सि.) ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड 3. पी एम किसान योजना 4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी), श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...
Comments
Post a Comment