Skip to main content

गोकुंदा ग्रामपंचायत मधील सर्व वार्ड मध्ये पथदिवे लवकरात लवकर लावण्यात यावे - आशिष शेळके (


आशिष शेळके  तालुकाध्यक्ष, जनता माहिती अधिकार समिती महाराष्ट्र राज्य) यांनी गोकुंदा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक प्रविन रावळे यांच्या सोबत केली सर्व समस्यांवर सविस्तर चर्चा.


किनवट : मौजे गोकुंदा ग्रामपंचायत मधील सर्व वार्ड मध्ये पथदिवे व सर्व खांबावरचे बल्ब लवकरात लवकर लावण्यात यावी अशी मागणी जनता माहिती अधिकार समिती महाराष्ट्र राज्य चे किनवट तालुका अध्यक्ष आशिष शेळके यांनी गोकुंदा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक प्रविन रावळे यांना केली आहे.

          सविस्तर वृत्त असे की, बऱ्याच महिन्यांपासून गोकुंदा ग्रामपंचायत मधील बऱ्याच वार्ड मध्ये पथदिवे व खांबावरचे बल्ब खराब झाले आहेत त्यामुळे सर्व वार्ड मधील नागरिकांमध्ये रात्री ला भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. खांबावरती पथदिवे व बल्ब नसल्या कारणाने चोरीचे व लुटमारीचे प्रमाण ही वाढले आहेत, तसचे आता दिवस ही लवकर मावळत आहे तर काही विद्यार्थ्यांना देखील कोचिंग क्लासेस मधुन येताना अंधारातच घरी यांव लागत आहे त्यामुळे या अंधारामुळे पालक व विद्यार्थी दोघेही त्रस्त आहेत. तसेच महिला व लहान मुले-मुली आता दुर्गा उत्सव निमित्त गर्भा खेळण्यासाठी घरापासून दुर दुर्गा देवी व शारदा देवीकडे जात असतात, तेव्हा गर्भा खेळुन परत येताना आपापल्या वार्ड मध्ये सर्वीकडे अंधार असल्या कारणाने महिला व लहान मुले-मुली भितीमय परीस्थितीत घरी येत आहेत. या सर्व कारणांमुळे काही वाईट प्रकरण घडण्याच्या आधी सर्व वार्ड मध्ये लवकरात लवकर पथदिवे व खांबावरचे बल्ब लावण्यात यावी अशी मागणी जनता माहिती अधिकार समिती महाराष्ट्र राज्य चे किनवट तालुका अध्यक्ष आशिष शेळके यांनी ग्रामसेवक प्रविन रावळे यांच्याकडे केली आहे.


          तसेच या अंधाऱ्याच्या समस्या सोबतच नाल्या साफसफाई व कचरा गाडी च्या समस्यां देखील आशिष शेळके यांनी सांगितल्या. सर्व वार्ड मध्ये नाली ही कचऱ्यांनी व पाण्यांनी तुडुंब भरली आहे तरी बऱ्याच वार्ड मध्ये नाली साफसफाई कामगार हे बऱ्याच महिन्यांपासून आलेले नाही आहेत. तसेच काही वार्ड मध्ये भरपुर कचरा व घाणीचा ढीग झाला आहे त्यामुळे वार्ड मध्ये दुर्गंधी चे व मच्छरांचे व रोगराईचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कचरा गाडी व नाली सफासफाई कामगारांना दर हफ्त्यांला सर्व वार्ड मध्ये पाठवावे अशे आशिष शेळके यांनी ग्रामसेवक यांना सांगितले.

          पत्रकारांशी बोलताना आशिष शेळके यांनी सांगितले की, ग्रामसेवकांनी सर्व समस्या, सुचणा जाणून घेतल्या व या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी लागलीच तयारीला लागतो अशे आश्र्वासन दिले. व येत्या आठ दिवसांमध्ये सर्व वार्ड मधील पथदिवे व खांबावरचे बल्ब आणि नालीसाफसफाई व कचरा गाडी हे सर्व समस्या सुटणार अशी ग्वाही दिली. अभ्यासु व कर्तव्यदक्ष ग्रामसेवक अशी प्रतिमा असणारे ग्रामसेवक प्रविन रावळे हे त्यांचा शब्द पाळुन आपल्या कर्तव्यांशी एकनिष्ठ राहुन या सर्व समस्या खरंच आठ दिवसांत सुटणार का यांकडे गोकुंदा ग्रामपंचायत मधील सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...