Skip to main content

आश्विन पौर्णिमेला चंद्राच्या छायेत बहरली काव्य मैफिल

 



किनवट (प्रतिनिधी) :

क्रांतीसूर्य प्रतिष्ठान आयोजित आश्विन पौर्णिमे / कोजागीरी पौणिमे निमित्त तक्षशिला बुद्ध विहार विद्यानगर गोकुंदा येथे चंद्रांच्या छायेत कवि संमेलन काव्य पौर्णिमा साजरी करण्यात आली.


सांगावाकार कवी महेंद्र नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कवी संमेलनात काव्य पौर्णिमेनिमित्त स्थानिक कवींनी  बहारदार रचना सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली.भारतीय बौद्ध महासभेचे तालुका संस्कार सचिव अनिल उमरे यांच्या राहो सुखाने हा मानव इथे या वंदन गीतेने कवी संमेलनाला सुरूवात झाली.वामनदादा कर्डक संगीत अकादमी चे संचालक प्राचार्य सुरेश पाटील यांनी वंदन गीत सादर केले.



त्यांनंतर कवी रुपेश मुनेश्वर यांनी 


" हिंसा नको कधीही कायेने वाचने

ठेवावे शुध्द आचरण बुद्धाचे सांगणे"


प्रा.सुभाष गडलिंग यांनी 

" वेळु वनात वेळु हलत आहे वाऱ्याने

शब्द थांबुन होते वेळु वनात

स्वताला मुक्तपणे उधळत 

भीरभीरत निघाले ते"

हि मर्मस्पशी रचना मांडली .




 संगीत शिक्षिका आम्रपाली वाठोरे यांनी आमृतवानी ही बुद्धाची,ऐका देऊनी ध्यान सादर केले


प्रा.एस.डी.वाठोरे यांनी

 " हळुच हलली बोधी वृक्षाची फांदी अन सुरु झाली सतयुगाची नांदी"


  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विचारमंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके यांनी

" महामानव  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 

बहिष्कृत भारतान आपल्या लौकिक

इतिहासाला जपल"

हि प्रेरणादायी रचना सादर केली.


 गायिका मंगला कावळे यांनी "सुशिला,पंचशिला चला चला ग विहाराला" हि गीत रचना सादर केली


क्रांतीसूर्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष कवी रमेश मुनेश्वर यांनी "ऊर्जास्रोत बाबासाहेब व  "पौर्णिमेसम सुंदर असाव आयुष्य

पौर्णिमेसम तेजोमय व्हाव आयुष्य

उन सावली जीवनी येती नेहमी

पौर्णिमा तर कधी आमवस्या व्हाव आयुष्य" हि सुंदर काव्य रचना सादर केली.


सिमा नरवाडे यांनी आपण मस्तपैकी आनंदाच्या बीया पेरीत  जावे.. अशा एकापेक्षा एक सरस रचना सादर करुन काव्य रसिकांच्या टाळ्या मिळवल्या.


या नंतर कवी रमेश मुनेश्वर यांनी


या नंतर युवाकवी राजेश पाटील यांनी 

"धम्म हा नवा दिला तु भीवा

धम्माने ते झाले सोने नागभुमीला 

तुझ्या धम्माचा तो रथ 

आम्ही नेऊ चालवत हि गेय कविता गाऊन दाखवली"


तर कवयत्री वंदना तामगाडगे यांनी

"येथे विषमतेचे वारे चोहीकडे

दारे प्रत्येकांची आहे दुहीकडे "

हि सामाजीक रचना सादर केली






कवीसमेलनाचे अध्यक्ष कवी महेंद्र नरवाडे यांनी "हजारो वर्षाच्या वळवंटी तुझ्या भावनेला

येऊदे आता धम्मपथावर अन मिळूदे " अशा बहारदार रचनेने कवीसमेलनाचा समारोप केला.कवीसमेलनाचे बहारदार सुत्रसंचलन उत्तम कानिंदे यांनी केले तर प्रा.डा.पंजाब शेरे यांनी आभार मानले. यावेळी काव्य रसिक सखाराम घुले, पत्रकार विशाल गीमेकर,संघपाल कौठेकर, सतीश विणकरे, संघमित्रा वाघमारे, सुजाता नरवाडे, करुणा परेकार, अनिता बनसोड ,ललिता कयापाक , भागयरथा राऊत,राधाबाई दुथडे ,अक्षरा गोखले,प्रज्योत कांबळे यांच्या सह असंख्य काव्यरसिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...