Skip to main content

शाळा व महाविद्यालयात कोविड -19 लसीची सक्ती करू नये - ऑल इंडिया पँथर सेना




नांदेड : 

           महाराष्ट्रामधील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना लसीकरण करून घेणे महाराष्ट्र सरकारने अनिवार्य केले आहे. त्यामुळे भारतीय संविधानाने दिलेल्या मुलभूत  हक्कावर वर गदा येत आहे.शाळा महाविद्यालय यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी लसीकरणाचे 2 डोस घेतले आहेत. त्यांनाच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे अशी विद्यार्थ्यावर अन्यायकारक भूमिका या ठिकाणी काही महाविद्यालयांनी शाळा घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

           पुढे बोलताना  बुक्तरे म्हणाले की,जर  महाविद्यालयांना लसीकरण अनिवार्य करायचं असेल तर त्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील लसीची मात्रा ची उपलब्धता करून घ्यावी व ज्या विद्यार्थ्यांना लसीची मात्रा घ्यायची आहे त्यांनी त्या विद्यार्थ्यांना द्यावी व जे विद्यार्थी कलर्स घेणार नाहीत त्यांना सक्ती करू नये लस घेतल्यामुळे कोरोना होणार नाही याची हमी नाही त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी लाच घेतली त्यांना शारीरिक त्रास झाल्यास महाविद्यालय व प्रशासननाने याची जबाबदारी घ्यावी. 


           या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची पायमल्ली होताना दिसत आहे ही थांबली पाहिजे व सर्वसामान्य जनतेला सर्व योजनांचा लाभ दिला पाहिजे अन्यथा ऑल इंडिया पँथर सेना लसीकरणाची सक्ती करणाऱ्या महाविद्यालयाच्या समोर आंदोलन उभे केल्याशिवाय राहणार नाही. अशा आशयाचे पत्र निवेदन माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकारी मार्फत देण्यात आले आहे .

           यावेळी उपस्थित ऑल इंडिया  पँथर सेना जिल्हाध्यक्ष भिमराव बुक्‍तरे , युवा जिल्हाध्यक्ष सुरेश सावते, नांदेड ता.उपाध्यक्ष आनंदा पाटील, पत्रकार गणेश ढोले,  वंचितचे तालुका उपाध्यक्ष केशव जाधव , सुनील पाटील , अनिकेत पोहरे , पत्रकार संजय राक्षसे आदी जण उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...