Skip to main content

सीतेच्या वनवासा पेक्षाही माझा वनवास कमी नव्हता , खासदार हेमंतभाऊ पाटील व गोदावरी समुहाच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटील यांच्या समक्ष भावनावश झाल्या - दिव्यांग सुनिता गुटे - फड

 


हिंगोली:

आम्हाला पाय नसल्याने कुठे जाता येत नाही खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी सायकल, ट्राय सायकल, इलेक्ट्रिकल सायकल, दिली नसती तर आम्हाला घरामध्येच बसावं लागलं असतं, घरात बसून दुःखी राहत होते, पण भाऊंच्या माध्यमातून ही सायकल मिळाल्यामुळे बाहेरचं जग पहायला मिळेल, या उपक्रम सेवाभाव विचारातुन, आम्हाला भरपूर आनंद होत आहे, घरात राहून कंटाळवाणं वाटायचं, नको ते विचार मनात यायचे, सायकल, इलेक्ट्रिकल सायकल दिव्यांग बांधवांना दिल्यात, यामुळे घरातुन बाहेर निघाल्यावर मन बदलल्या सारख होईल हे शब्द आहेत दिव्यांग सुनिता ह्यांचे.


दिव्यांग बांधवांच्या जाहिर कार्यक्रमात हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत त्या ध्वनीक्षेपकावर व्यक्त होत होत्या, त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले होते, उपस्थितांची मन काही वेळासाठी हळहळली होती. अपंगाकडे घरातले नातेवाईक सुद्धा, अपंग व्यक्ती काहीच करू शकत नाही, बिन कामाची व्यक्ती आहे अशी हेटाळणी पनाने वागणूक देतात, अपंगाचा मानसन्मान होत नाही, घरातील केरकचरा जसा झाडूने लोटला जातो अगदी तशाच पद्धतीने रक्ताचे नातेवाईक पण दुर लोटतात या अनुभवातून मी दिव्यांग इथपर्यंत आली आहे, खासदार हेमंत भाऊ तुम्ही अपंगासाठी दिव्यांग साहित्य उपलब्ध करून दिल्यामुळे आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे, सीतेच्या वनवासा पेक्षाही माझा वनवास कमी नव्हता, असं खासदार हेमंत भाऊ पाटील व गोदावरी उद्योग समुहाच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटील यांच्या समक्ष सुनिता गुटे-फड गहिवरल्या होत्या. 


हा प्रसंग आहे हिंगोली जिल्ह्यात 3260 दिव्यांगाना दिव्यांग साहित्य वाटपाच्या हिंगोलीतील कल्याण मंडपम कार्यक्रमादरम्यानचा. दिव्यांग असुनही काहीतरी करण्याची जिद्द असलेल्या सुनिता सारख्या नेक विचारी महिलांसाठी, उद्योजीका राजश्रीताई पाटिल यांनी समाजाने नाकारलेल्या लोकांना पुढ आनण्यासाठी वित्तपुरवठा करून त्यांच्या जगण्याचा मार्ग सुकर करण्यासाठी येथेच शब्द दिला, यामुळे दिव्यांगांच्या अपेक्षांवर मायेची फुंकर घालनार नेतृत्व खासदार हेमंतभाऊ पाटिल यांच्या रूपाने पुढे आल आहे.


सुनिता शंकरराव गुटे रा. सालेगाव ता. कळमनुरी, सर्वसामान्य कुटूंबात दि ९ नोव्हेंबर १९८६ ला  त्यांचा जन्म झाला, दोन आई, तिघी बहिणी, दोन भाऊ अस कुटूंब, जन्मानंतर साधारण चार वर्षाच वय, दुडू दुडू धावायला जमायच दरम्यान एकदा ताप आला होता, ग्रामीण भागात आरोग्याच्या सोयी नसायच्या त्यातही मुलगी म्हटल की, कोणी फारशी काळजी देखिल करायच नाही, हि समाजात विक्रतीच होती, अशातही गावातील डॉक्टरांकड उपचारार्थ नेण्यात आल, अंगात ताप असतांना डॉक्टरांनी इंजक्शन लावल त्यानंतर त्यांचे दोन्ही पाय कमरे पासुन लुळे झाले.


१००% अपंगत्व आलेल्या सुनिता यांना हिंगोली येथिल खातीबा अस्थीव्यंग विद्यालयात पहिल्या वर्गात टाकण्यात आल, पायाने अपंग असलेल्या सुनिताची बुध्दी तल्लक, काहीतरी बनण्याची जिद्द मनात होती, वस्तीगृहात पोटाला पिळ पडायचा, कधी जेवन वेळेवर मिळायच नाही, मिळाल तर ताटात अळ्या किडे निघायचे, अन्नाला नाव ठेवण्या एवढी मोठी नव्हते परंतु त्याच ताटावर बसायची हिम्मत व्हायची नाही, किळसवान वाटायच, कधी कधी पाण्याविना रात्र काढावी लागायची, कुणाला करूण कहानी सांगितली तर संथाचालकाच बाहुल असलेल्या सरांच्या हातातील ओल्या फोकाच्या छडीची भिती वाटायची, आंबिल खावुन दिव्यांग शाळेत दिवस काढले, फार विट यायचा सर्व अनुभवाचा , सांगणार कोणीच नाही, सोबत माझ्या सारख्या, माझ्या पेक्षाही कटु अनुभवाच्या समविचारी वर्ग मैत्रिनी, वैतागलेल्या मनाला आपणच आवर घालत भविष्यात काहीतरी व्हायच हि जिद्द बळकवायची. तिथे सातवी पर्यंत शिक्षण पुर्ण केल.


कुटूंबाकडुन कधी लाड पुरले नाही, सनवार निट करता आला नाही, उन्हाळ्यातील सुट्ट्या, अपंगत्व आल की नातेवाईकांनाही नकोस वाटायच, ईश्वर सत्व परीक्षा घेत असतो, मी देखिल ईश्वराला म्हणत असते, किती परीक्षा घ्यायची ते घे..! बघुत कोण? मी हारते का? तु ते..!


कोणासाठी तरी जगायच असते, तस तर दवाखाण्यात मृत्यु शय्येवर अनेक जन उपचार घेणारे, कृत्रिम ऑक्सीजन लावलेले पुष्कळ अंथरूनावर पडुन आहेत, मी अपंग असली तरी काय झाल कशाला मरणाचा विचार करू... म्हणत जगत आहे.


आठवी ते दहावी पर्यंतच शिक्षण परभणीतील रामराव कान्हेकर विद्यालयातुन पुर्ण केल, कळमनुरीतील डॉ. शंकरराव सातव कॉलेज मधुन बारावी पास झाले, घरी बसुन कला शाखेतुन बि.ए. ची पदवी घेतली. संगणक ऑपरेटर पदी सेतु सुविधा केंद्रात कंत्राटी पध्दतीवर नौकरी केली, परवा कोरोना काळात नौकरी गेली. 


नातेवाईकातील केशव नारायण फड यांचेशी १७ मार्च २०१३ ला हिंदु समाज व्यवस्थे प्रमाणे, विवाह जुळुन आला, सर्व सोपस्कारा प्रमाणे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम घरीच झाला दिव्यांग असुनही माझे पती केशवराव यांनी मला स्विकारला माझ्यासाठी पती हेच परमेश्वर आहेत, एक तासात सोयरीक, एक महिण्यात विवाह झाला, दिल्या घरी शेती उत्पन्नाच साधन नव्हत, इंग्लीश स्कुलच्या लेकरांना शाळेत ने आण करण्यासाठी मॅक्सीमो गाडी घेतली त्यावर चरीतार्थ चालायचा.


गरोदर पणात नवऱ्याने तळहाताच्या फोडा प्रमाणे सांभाळल, प्रसृतीसाठी दवाखाण्यात भर्ती होते, सिझर कराव लागल, मुलगी झाली, डॉक्टरांची सर्व फिस भरली परंतु पैशाची जुळवा जुळव करतांना शेवटच्या दिवशी ७०० रूपये आमचे कडे नव्हते, म्हणुन सुट्टी देण्यासाठी दवाखाण्यात आडकाठी केली होती, घराकडुन पैसे येणार होते, बाजुच्या रूग्णांच्या विनंती नंतरही डॉक्टरांनी सुट्टी दिली नाही, तिथेच ठरवल आता थांबायच नाही, मुलीला खुप शिकवायच एमबिबीएस डॉक्टर करायच समाजात जे गरीब लोक आहेत, ज्यांना उपचारासाठी पैसा घडत नाही, अशा लोकांकडुन जेवढा मेडीकल औषध खर्च आहे, तेवढाच खर्च घे..! अशी शिकवन देण्याची खुनगाठ तेंव्हा पासुन मनात बांधली आहे. ते स्वप्न पुर्ण करणार आहे.


कोरोना मध्ये शाळा बंद पडल्यात, पर्यायान शाळेला लावलेली गाडी बंद ठेवावी लागली, घरात येनारे दोन पैसे थांबले, बेकारीची कुऱ्हाड कोसळली, गाडी जागेवर थांबुन असल्यामुळे टायर निकामी झाले, इंजनच काम निघाल, ५० हजार रूपये खर्च लागला, आता मुलगी आठ वर्षाची झाली तिच्या शिक्षणाचा खर्च , घरगाडा चालवन अशक्य होत आहे, अशा वेळी खासदार हेमंतभाऊ पाटिल यांनी दिव्यांग बांधवांसाठी मोफत साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतला, या परस्थितीत इल्क्ट्रीक मोटार ट्रायसिकल मला मिळाली. हि गाडी घेण्याचा डोक्यात विचार देखिल आनु शक्त नव्हते, दिवस कसा काढावा याच विचारात असायचे, बाजारात ज्याची किंमत लाख रूपये असेल ती मोफत उपलब्ध करून दिली त्यामुळे आभारी आहे,,,, खासदार हेमंतभाऊ सारखा पाठीराखा असल्याचा मनोमन आनंद होत आहे.


दिव्यांग महिला पोटतिडकीन मांडत असलेला कटु अनुभव गोदावरी समुहाच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटिल ह्या सुनिताच्या बाजुलाच उभ्या होत्या कार्यकर्त्यांचा गराडा, हजारोंची उपस्थिती सुनिताचा एकन एक शब्द एैकतांना त्यांनाही अश्रु अनावर झाले होते. स्वत:ला सावरत त्यांनिही दिव्यांग सुनिताच्या पाठीशी उभे राहत गृह उद्योगासाठी हातभार लावण्याच सांगितल.


गोविंद गोडसेलवार सरसमकर

ता. हिमायतनगर

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...