किनवट (तालुका प्रतिनिधी)
किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय, तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी
मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे.
सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी
घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी तालुका सचिव बापूसाहेब तुपेकर सर,दत्ता नरवाडे,सुनील चव्हाण,संजय बेंद्रे,संतोष डोनगे, सुनील चव्हाण, अजय कदम, अँड विजय कदम,बाबाराव पाटील हुडीकर,अक्षय विनोद पावडे,साई मगर,चेतन कऱ्हाळे, संतोष कदम तसेच विविध समाजातील आर्थिक, राजकीय, सामाजिक, संस्कृतीक क्षेत्रातील मान्यवराणी अभिनंदन करुन पुढील यशस्वी कार्यासाठी श्री रामविजय गरड पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment