नांदेड : आजाद समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश कोर कमिटी सदस्य तथा नांदेड जिल्हा प्रभारी पदी दिनेश लोणे पाटनुरकर यांची करण्यात आली.
आजाद समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश कोर कमिटी सदस्य तथा नांदेड जिल्हा प्रभारी पदी दिनेश लोणे पाटनुरकर यांची करण्यात आली. या निवडीचे नियुक्ती पत्र आजाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राहुल प्रधान यांच्या हस्ते देण्यात आले.
नांदेड जिल्ह्यामध्ये युवा पँथर सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अनेक देशात दलितांवर होणारे अन्याय अत्याचार,शेतकर्यांच्या समर्थनार्थ,विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी असे अनेक आंदोलन मोर्चे काढून पीडितांना न्याय मिळवून देण्याचे काम केल. याचीच दखल घेऊन राहुल प्रधान यांनी आजाद समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश कोर कमिटी सदस्य तथा नांदेड जिल्हा प्रभारी पदी दिनेश लोणे पाटनुरकर यांची निवड केली.
आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.राहूलदादा प्रधान यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर आजाद समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश कोर कमिटी सदस्य तथा नांदेड जिल्हा प्रभारी पदाची जबाबदारी दिली. आजाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई चंद्रशेखर आजाद यांनी व आजाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राहुलदादा प्रधान यांनी माझ्यावर विश्वास दाखवून दिलेली ही जबाबदारी येणाऱ्या काळात निश्चितपणे कामाच्या माध्यमातून सार्थ ठरवून दाखवेन.असा विश्वास दिनेश लोणे पाटनुरकर यांनी दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष बालीभाऊ कांबळे,आकाश सूर्यवंशी, प्रसेनजीत माजरमकर,सम्राट आढाव,चंदू गजभारे,सय्यद हर्षद,इम्रान शेख,शैलेश कांबळे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment