Skip to main content

विद्यार्थ्यांनी कायद्याची माहिती घेऊन जीवनात त्याचा उपयोग करावा -एस. बी. अंभोरे


ता. प्र. किनवट :-

 विद्यार्थ्यांनी कायद्याविषयी माहिती घेऊन जीवनामध्ये त्यांचा उपयोग सुखी व समृध्द होण्यासाठी करावे. कायद्याचा अभ्यास सर्वांनी करावे. असे मत बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व तालुका विधी सेवा समिती शाखा किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने आयोजित कायदेविषयक शिबिरात मा.एस.बी.अंभोरे,अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश क. स्तर, किनवट यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष किनवट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नारायणराव सिडाम, 

प्रमुख उपस्थिती किनवट शिक्षण संस्थेचे सचिव, शंकरराव चाडावार

तालुका विधी सेवा समिती सदस्य के.मुर्ती,प्राचार्य डॉ. एस. के. बेंबरेकर, हे विचारमंचावर उपस्थित होते. 

प्रारंभी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

स्वागतगीत शे. सालेहा काजीम व दिव्या अचकुलवार यांनी  सादर केले. 


हा कार्यक्रम किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर यांनी केले.पुढे बोलतांना  न्यायधीश एस. बी. अंभोरे म्हणाले,भारतीय दंड सहिता विषयी माहिती मिळवावी विविध कलमा विषयी माहिती समजावून घ्यावे.कायदयाचा अभ्यास करावे.कायद्यापुढे सर्व समान असतात. खरे गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून कायद्यातील कलम समजावून घ्यावे.आयपीसीमधील विविध कलमाची सविस्तर माहिती घ्यावे.असे मार्गदर्शनातून व्यक्त केले. याप्रसंगी अॅड.एस.पी.शिरपूरे यांनी कौटुबिंक हिंसाचार, घरगुती कलह विषयी माहिती दिली. 

विशेष उपस्थिती अॅड. एन. एस. राठोड,अॅड.टि.आर.चव्हाण,अॅड.ए.एम.कोमरवार,पोलीस कर्मचारी  गंगय्या दोनकलवार, मिसलवार यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख तथा सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी केले तर आभार वाणिज्य विभागप्रमुख तथा सांस्कृतिक विभागाच्या डॉ. शुंभागी दिवे यांनी मानले. याप्रसंगी पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील, डॉ. जी.बी.लांब,प्रा.डाॅ.प्रज्ञा घोडवाडीकर, प्रा.सुलोचना जाधव, प्रा. अम्रपाली हटकर, प्रा.डाॅ. योगेश सोमवंशी, प्रा. काझी एस.एस.प्रा.मंदाकिनी राठोड,प्रा.एम. आय. पवार,प्रा.डाॅ.स्वाती कुरमे, 

प्रा.आत्राम,प्रा.राठोड,प्रा.

प्रल्हाद जाधव,

प्रा.डाॅ.हिप्पळगावकर, प्रा.एस.पी.बोकडे,दीपक खंदारे, मिलिंद लोकडे, सुधीर पाटील, यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...