Skip to main content

टिपू सुलतान ब्रिगेड नांदेड जिल्हा कार्यकर्ता मेळावा संपन्न




नांदेड:

 टिपू सुलतान ब्रिगेड नांदेड जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा काल दि. 24 ऑक्टोबर 2021 रोजी नांदेड येथे टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या मेळाव्यात नांदेड जिल्ह्य़ातील (दक्षिण) नांदेड जिल्ह्यातील जिल्हा पदधिकारी, सदस्य, तालुकाध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य उपस्थित होते.

या मेळाव्यात जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली, धर्माबाद, उमरी, बिलोली आणि कंधार तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष पदी हिमायतनगर येथील सामाजिक कार्यकर्ते सलाम खुरेशी, जिल्हा संघटक पदी उमरी येथील ब्रिगेडचे जुने व समर्पित कार्यकर्ते फयाज पठाण, जिल्हा मीडिया प्रमुख आणि उमरी तालुका अध्यक्ष पदी बळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि दैनिक समीक्षाचे उमरी तालुका प्रतिनिधी फेरोज पटेल, उमरी तालुका विद्यार्थी ब्रिगेड अध्यक्ष पदी सय्यद सुलेमान तळेगावकर, बिलोली तालुका अध्यक्ष पदी युवा कार्यकर्ते शेख इरफान आणि बिलोली तालुका उपाध्यक्ष पदी अफरोजखान पठाण, धर्माबाद तालुका उपाध्यक्ष पदी मिर्झा इब्राहिम बेग, धर्माबाद तालुका सचिव पदी सय्यद शाहिद अली, कंधार तालुका विद्यार्थी ब्रिगेड अध्यक्ष पदी कुर्ला येथील जुनेद अत्तार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मेळाव्यात पुढच्याच महिन्यात येणार्‍या टिपू सुलतान जयंती आयोजना बाबत चर्चा करण्यात आली. 

 डाॅ. ज़हीरूद्दिन पठान (प्रदेश अध्यक्ष), सय्यद नदीम (जिल्हाध्यक्ष, नांदेड उत्तर) ईनामदार जकरीया (जिल्हाध्यक्ष, नांदेड दक्षिण), शेख शाकीर (किनवट तालुका अध्यक्ष), मिर्झां खुर्रम बेग पटेल (धर्माबाद तालुका अध्यक्ष) यांनी सर्व नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि टिपू सुलतान ब्रिगेड संघटनेच्या ध्येय आणि धोरणा बाबत, कार्यपद्धती बाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र दंगामुक्त करण्यासाठी, महापुरूषांना अपेक्षित समाज निर्माण करण्यासाठी, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही नैसर्गिक आणि मानवीय मूल्ये समाजात रुजविण्यासाठी, राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यासाठी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी संघटनेची विचारधारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात आणि प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचवावी, असे आवाहन प्रदेश अध्यक्ष डॉ. ज़हीरूद्दिन पठान यांनी केले.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...