Skip to main content

Posts

Showing posts from November, 2022

हैद्राबाद येथील राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये किनवटचे विद्यार्थी चमकले

  किनवट (ता.प्र.) हैद्राबाद येथे दिनांक १९ व २० नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत किनवट तालुक्यातील ६ विद्यार्थ्यांनी प्रशिक्षक संदीप येशीमोड यांच्या मार्गदर्शना खाली घवघवित यश संपादन केल्याने सर्व विद्यार्थी व प्रशिक्षक यांचा उप विभागीय अधिकारी नेहा भोसले (IAS) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . तालुक्यातील क्रिडा प्रेमी कडून ही त्यांचे अभिनंदन करून कौतुक केल्या जात आहे .                     दिनांक १९ व २० नोव्हेंबर रोजी हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय  कराटे स्पर्धेमध्ये किनवट येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. तालुक्यातील १४ वर्षे वयोगटातून प्रथम सांस्कृतिक मेश्राम  १७ वर्षे वयोगटातून वैष्णवी बेंद्रे १९ वर्षे वयोगटातून कार्तिक जाधव १४ वर्षे वयोगटातून द्वितीय क्रमांक अक्षरा आजकुलवार १ ४ वर्षे वयोगटातून तृतीय क्रमांक जयश्री टक्कलवार व १७ वर्षे वयोगटातून मनीषा तालिकोंडावर या ६ विद्यार्थ्यांनी  विजय मिळवित घवघवित यश संपादन केले .या सर्व विद्यार्थ्यांचे  व मुख्य प्रशिक्षक संदीप येशीमोड , मारोती येशीमोड , गोदावरी येशीमोड , या सर्वांचा यश संपादन केल्या बदल  उपविभा

टिपू सुलतान हे राष्ट्रीय बलीदानाचे प्रतिक - शेख सुभान अली

  हिंदू मुस्लिम एक्य हेच आमचे प्रगतीचे निष्कर्ष, धार्मिक सलोखा असेल तर देश महासत्ता बनेल -  मधुकर महाराज बारूळकर  मुखेड शहारात २९ रोजी ह. टिपू सुलतान जयंती उत्सव समीती मूखेड च्या वतीने टिपु सुल्तान जयंती व सविधान दिन निमित्त व्याख्यानांचा कार्यक्रम संपन्न व्याख्यानाच्या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाची उद्देशिका वाचन करून झाली, येणाऱ्याया सर्व मान्यवरांना समितीच्या वतीने संविधानाची टिपू जिवनावर असलेली पुस्तिका सत्कार म्हणून देण्यात आली, तसेच भारतीय संविधानाची उद्देशिकाचे वाचन खाजा धुंदी यांनी, तर शाळेतील चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. प्रस्ताविक भाषण शिवाजी गेडेवाड यांनी केले, या कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार पत्रकार महताब शेख यानी केले.  उदघाटक श्री मधुकर महाराज बारूळकर यांनी प्रत्येक घराघरात देशभक्तीचा व मानवतेचा टिपू सुलतान घडवा, हिंदू मुस्लिम एक्य हेच आमचे प्रगतीचे निष्कर्ष असू शकतात, धार्मिक सलोखा असेल तर देश महासत्ता बनेल हे ठणकावून सांगितले, पुढे कार्यक्रमाचे अध्यक्ष भ रेवतबोद्धी यानी आपल्या शैलीत बोलले देशात काही जन दंगली करुन जाती

शाहरुख खानच्या जवान सिनेमाचे शूटिंग औरंगाबादेत, यंत्रणा पोहचली

  सम्यक सर्पे  औरंगाबाद : हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार अभिनेता शाहरुख खान याच्या आगामी ‘जवान’ या सिनेमाचे चित्रीकरण (शूटिंग) बिडकीन येथील ‘डीएमआयसी’त होणार असून चित्रिकरणासाठी लागणारी सर्व यंत्रणा बिडकीन येथे पोहोचली आहे. चित्रपटातील काही साहसी दृष्यांचे (ॲक्शन सीन) येथे चित्रीकरण होणार असल्याची माहिती आहे. अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ हा एक ॲक्शनपट असून जून २०२३ मध्ये तो रिलीज होणार आहे. सध्या हा सिनेमा सध्या निर्मिती प्रक्रियेत असून पुणे, हैदराबाद, मुंबई, चेन्नई येथे शूटिंग होणार आहे. मात्र, चित्रपटातील भरधाव गाड्यांचा थरार शूट करण्यासाठी या मेट्रो शहरात जागा नसल्याने औरंगाबाद नजीकच्या बिडकीनची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून शाहरुख खानच्या ‘रेड चिली प्रॉडक्शन’चे अधिकारी प्रयत्नशील होते. अखेर त्यांना चित्रिकरणासाठी परवानगी मिळाली असून सर्व यंत्रणा चित्रीकरणस्थळी पोहोचली आहे. या शूटिंगसाठी शाहरुख खान येणार का, याबाबत साशंकता आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘बॉडी डबल’च्या माध्यमातून ॲक्शन सीनचे शूटिंग करण्यात येणार असल्याचे समजते. परदेशातील काही ॲक्शन

अजय कदम यांची युवा सेना किनवट तालुका प्रमुखपदी नियुक्ती

  किनवट : संभाजी ब्रिगेड चे 15 वर्ष तालुकाध्यक्ष पद सांभाळणारे  अजय कदम पाटील यांची बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या युवासेना तालुका प्रमुख पदी  खा.हेमंत पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पञ देऊन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील पाटील , भाजप युवा मोर्चा चे उमाकांत कऱ्हाळे ,संतोष डोंनगे यांची उपस्थिती होती.

देशातील सर्वात उंच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा 125 फूट उंच पुतळ्याचे काम वेगाने सुरु

  तेलंगणा:- तेलंगणा मधील हैदराबाद:- शहरातील हुसेनसागर तलावाशेजारी असलेल्या एनटीआर गार्डनजवळील 10 एकर जागेवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 फूट उंच पुतळ्याचे काम वेगाने सुरु आहे. पुढील वर्षी 14 एप्रिल रोजी डॉ.आंबेडकरांच्या 132 व्या जयंतीदिनी मुख्यमंत्री केसीआर यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन करण्याची तयारी तेलंगणा सरकार करत आहे. देशातील सर्वात उंच मानल्या जाणाऱ्या या पुतळ्याचे काम फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण होईल. तसेच या 10 एकर परिसरात लेझर शो व्यतिरिक्त पुतळ्याच्या पायथ्याशी संसदेसारखी रचना केली जात आहे. डॉ.आंबेडकरांचे महानतेचे दर्शन घडविण्यासाठी डॉ.आंबेडकरांचे फोटो गॅलरी आणि मिनी थिएटर उभारण्यात येत आहे. डॉ.आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या संग्रहालयात डॉ.आंबेडकरांच्या संसदेत केलेल्या भाषणांचा वीडिओ आणि त्यांच्या जीवनावर आधारित फिचर फिल्म सुद्धा लोकांना दाखवले जातील. 2016 मध्ये पायाभरणी 14 एप्रिल 2016 रोजी डॉ.आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री केसीआर यांच्या हस्ते पुतळा बसविण्याची पायाभरणी करण्यात आली होती. एस.सी कॉपोरेशनच्या वतीने रस्ते आण

ज्येष्ठ समीक्षक, लेखक नागनाथ कोतापल्ले यांचे निधन

  सम्यक सर्पे:- मराठी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक, लेखक आणि औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू व 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांचे आज निध झाले. गेल्या दोन दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. मराठी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक, साहित्यिक म्हणून नागनाथ कोत्तापल्ले यांची ओळख होती. नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म 29 मार्च 1948 या दिवशी नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे झाला होता. शालेय शिक्षण मुखेडच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आणि बीए मराठीचे शिक्षण देगलूर महाविद्यालय येथे त्यांनी पूर्ण केले होते. त्यामध्ये ते मराठवाड्यात तिसरे तर मराठी विषयात प्रथम आले होते. त्यांनी 1980 मध्ये औरंगाबादमधील मराठवाडा विद्यापीठातून डॉ. यु. म. पठाण यांच्या मार्गदर्शनाने ‘शंकरराव पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर पीएचडी केली होती. नागनाथ कोतापल्ले 1977 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यानंतर ते पुणे

कॅनरा बँकेत कर्मचाऱ्यांच्या अभावी खातेदारांची हेळसांड

  किनवट प्रतिनिधी: किनवट येथे तिन राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या पैकी कॅनरा बँक हि पण आहे  बँकींग संदर्भात जनजागृती संदर्भात जनजागृतीसाठी आर बी आय ने कॅनरा बँकची  निवड केली खरी परंतु ह्या बँकेत अकाँऊन्टंट नसल्याने खातेदारांची हेळसांड होत आहे या शाखेत दुर दुरच्या ग्रामीण भागातील शेतकरी , विद्यार्थी, महीला , व्यापारी, खातेदार आहेत परंतु कर्मचारी अपुरे असल्याने तेथील कामे वेळेवर होत नसतात पासबुक एन्ट्री करायची असल्यास तीन दिवस वाट पहावी लागते तर इतर कामासाठी व्यवस्थापक सुद्धा वेळवर उपलब्ध नसतात व तेथील कामाचा ताण इतर कर्मचाऱ्यांवर येता येतो म्हणुन खातेदारांची मागणी आहे की येथे लवकरात लवकर अकाँऊटंट नियुक्त करून खातेदार ग्राहकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरीक व्यापारी करीत आहेत.

विक्रमी तारा निखळला....

   आपल्या.... भारदस्त अभिनयानं तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झाल्याची नुकतीच बातमी समोर आली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं होतं. पण विक्रम गोखलेंची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मागच्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. अनेक दशके सिनेसृष्टीत मोलाचं योगदान देणाऱ्या विक्रम गोखले यांच्या जाण्यानं सर्वत्र शोककळा पसरली आहे. विक्रम गोखले यांना अभिनयाचे धडे कुटुंबातच मिळाले होते. विक्रम गोखले यांचं चित्रपटसृष्टीशी जुनं नातं होतं, वडिलच नाही तर आजी-आजोबाही हाडाचे कलाकार होते. मराठी सिनेसृष्टीबरोबरच अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली.    मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1947 रोजी पुण्यात झाला होता. यांनी चित्रपट, मालिका आणि नाटक या सर्व माध्यमात काम केले होते. ते चित्रपटांबरोबरच रंगभूमीवर सुद्धा अत्यंत नावाजलेले कलाकार म्ह

प्रवाशांना बस रद्द झाल्याची सूचना न दिल्यामुळे एसटी महामंडळाला ६ हजाराचा दंड तक्रार निवारण आयोगाने व्यवस्थापकाला प्रवाशी नुकसान भरपाई बद्दल दिले आदेश

  माहूर : गावाकडे दिवाळी सण साजरा करण्यासाठी प्रवाशांनी कोल्हापूर -  लातूर जाणाऱ्या बसचे सांगलीपासून लातूर पर्यंत तीन सीट आरक्षीत केले मात्र ती बस रद्द झाल्याची पूर्व सूचना प्रवाशांना न दिल्यामुळे ग्राहक तक्रार निवारण आयोगाने आगार व्यवस्थापकाला ३ हजार रुपये दंड, मानसिक त्रासापोटी २ हजार तर तक्रारीसाठी १ हजार असे एकुण ६ हजार रुपये प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश  आगार व्यवस्थापकाला  दिले. नांदेड जिल्ह्याच्या माहुर तालुक्यातील तुळशी गावाचे सरपंच नितीन मंडाले यांनी २८ ऑक्टोंबर २०२१ रोजी कोल्हापूर - लातूर जाणाऱ्या बसचे सांगलीपासून लातूर पर्यंत ३ सीट आरक्षीत केले. त्याबद्दल त्यांनी महामंडळला सेवेचा मोबदला 2034 रुपये दिले. व त्याच्या कुटूंबातील सदस्यांसह सांगली बसस्थानकात बसची वाट बघत बसले. बराच वेळ ताटकळत बसल्यानंतर बसची निश्चित वेळ होऊन त्यामुळे प्रवाशी नितीन मांडले यांनी चौकशी विभागात विचारपूस केली तेव्हा त्यांना कळाले लातूर जाणारी बस रद्द झाली आहे. मंडाले यांनी तिकीट आरक्षित करत असताना स्वतःचा मोबाईल नंबर दिला होता परंतु, आगार व्यवस्थापकानी त्यांना बस रद्द झाल्याची कोणतीही पूर्व कल्

किनवट मध्ये आज संविधान जागृती महोत्सवाचे आयोजन

  किनवट:-  भारतीय संविधान- दिनानिमित्त युवा प्रबोधन मंच शाखा किनवटच्या वतीने दि 24 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत किनवट येथे संविधान जागृती महोत्सवाचे आयोजन केले असून यानिमित्त प्रख्यात सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचा प्रबोधना चा कार्यक्रम, व्याख्यान, सावधान रॅली, संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन युवा प्रबोधन मंचच्या वतीने करण्यात आले आहे. भारतीय संविधानातील मूलभूत हक्क, स्वातंत्र्य, समता, न्याय, धर्मनिरपेक्षता ही लोकशाहीची मूल्य जपण्यासाठी तसेच संविधानाप्रती जनजागृती करण्याच्या उद्देशाने युवा प्रबोधन मंच शाखा किनवटच्या वतीने दि 24 व 26 नोव्हेंबर असे दोन दिवस येथील गोंदराजे मैदानात संविधान जागृती महोत्सव आयोजित केला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले विचार मंचाच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके हे राहणार असून आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखाताई ठाकूर, खा हेमंत पाटील, मा खा सुभाष वानख

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आक्षेपार्ह फोटो लावणाऱ्या व्यक्तिस अटक करावे -स्वाभिमानी युवा सेनेची मागणी

किनवट/प्रतिनिधी 23 : इंस्टाग्राम या सोशल मीडियावर gangster_lakhan007 (गँगस्टर लखन) या नावाच्या आयडी धारकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे विद्रूपीकरण, दैवीकरण करून अश्लील फोटो टाकून आक्षेपार्ह मजकूर टाकून आंबेडकर प्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत या व्यक्तीवर कठोर कारवाई करून त्याचा तात्काळ अटक करावी या मागणीचे निवेदन स्वाभिमानी युवा सेना च्या वतीने आज दिनांक 23 रोजी देण्यात आले.       जाती धर्मांध कुविचारी व्यक्ती गँगस्टर लखन याने जातीय द्वेष भावनेतून फोटोवर विद्रूपीकरण, दैवीकरण केले आहे. अशा मानसिकतेच्या व्यक्तीला कठोर शिक्षा करुन त्याची आयडी ब्लॉक करावी. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू असे निवेदन स्वाभिमानी युवा सेनेचे तालुकाध्यक्ष सिध्दांत खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले आहे. निवेदनावर स्वाभिमानी युवा सेनेचे तालुका अध्यक्ष सिध्दांत खोब्रागडे, तालुका उपाध्यक्ष शिलरत्न पाटील, तालुका सचिव विपिन पवार, तालुका सहसचिव सुगत भरणे, तालुका कोषाध्यक्ष सुमित शेंद्रे, शहराध्यक्ष निवेदक कांनिंदे, रवी दिसलवर, सोनू टाक, सुबोध पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत निवेदनाची प्रत सहाय्यक

स्वातंत्र्य सेनानी शहीद टिपु सुलतान यांचे विचार घरा-घरात पोहचवा-शेख सुभानअली( टिपु सुलतान ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्ष , दंगा मुक्त महाराष्ट्र अभियान प्रमुख)

  किनवट तालुका प्रतिनिधी:- स्वातंत्र्यवीर शहीद टिपू सुलतान यांचे विचार घरा घरात पोहचवा टिपु सुलतान  हे राष्ट्रीय बलीदानाचे प्रतिक आहेत ते धर्म सहिष्णू राजे होते. त्यांनी १५६ मंदीरांना देणग्या दिल्याचा पुरावा आज ही म्हैसूर गॅझेटीयर मध्ये उपलब्ध आहेत. राष्ट्र पिता महात्मा गांधी यंग इंडियाच्या २३ जानेवारी १९३० च्या अंकात म्हणतात, टिपू सुलतान खरा धर्म सहिष्णू होता. इंग्रजांनी टिपला बदनाम केले टिपू सुलतान च्या महलाच्या ४ही बाजुने श्रीवेंकटरमना, श्रीनिवास, श्रीरंगनाथ चे मंदीर या गोष्टीचा स्पष्ट पुरावा आहे की टिप् सुलतान धर्म सहिष्णू होते. हिंदू प्रजेवर प्रेम करणारे होते असे मत टिपू सुलतान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दूंगा मुक्त महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख शेख सुभान अली यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यसेनानी शहीद टिपू सुलतान जयंती, संविधान दिवस आणी प्रबोधनकार ठाकरे स्मृती दिनानिमित्त टिपू सुलतान ब्रिगेड किनवट आयोजित राष्ट्रीय एकत्मतापरिषद दि. १८ रोजी सायंकाळी तहसील मैदानात संपन्न झाली. या वेळी मंचावर कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून टिपू सुलतान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दंगा मुक्त

मांडवी येथे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी

  मांडवी प्रतिनिधी : मांडवी  येथे  दि. 20/11022 रोजी  भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्साह साजरी करण्यात आलेली असून सर्व धर्म समभाव या या विचाराने सर्व समाजातील व्यक्ती सहभागी झाले  या दरम्यान मांडवी येथे किनवट - माहुर विधानसभा  आमदार श्री भिमराव केराम यांचे विशेष उपस्थिती होती  मांडवी येथील सांस्कृतिक भवन विकास कामासाठी दहा लाख रुपये देण्याची घोषणा केली  मांडवी हे शहर हमेशा समभाव विचाराने चालणारे शहर आहे या शहरात स्वर्गीय माजी महसूल मंत्री उत्तमराव राठोड साहेब यांच्या  विचाराने चालणारे व विकासाची कारणे शहर आहे व या विकासाच्या कामास सदैव तत्पर आहे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमात गावातील सर्व समाजाचे मानेवर उपस्थित होते या कार्यक्रमात उपस्थित जनतेला संबोधन करताना माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय प्रफुल राठोड यांनी यावेळी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले  संध्याताई राठोड यांनी मांडवी येथील सर्व धर्म समभाव विचाराने राहत असून आजपर्यंत कोणत्याही प्रकारची जातीय दंगल  घडलेली नाही असे प्रतिपादन केले. तसेच श्री. मा. बाबाराव राठोड यांनी मांडवी येथील  बिरसा मुंडा सभागृहाची नोंद करण्यात यावी व संरक

जे .एल. जी. व बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षम होत आहे - एकनाथजी शिंदे यांचे प्रतिपादन

  ( ता. प्र. किनवट) ता.१९ जे.एल.जी. व बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण व तालुक्यातील  महीला सक्षम होत आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा अग्रणी बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक मा. एकनाथजी शिंदे यांनी केले . (राष्ट्रीय कृषी आणि ग्रामिण विकास बँक नार्बाडपुरस्कृत) गृहलक्ष्मी महीला ग्राम विकास संस्था किनवट व महाराष्ट्र ग्रामिण बँकेच्या वतीने घोटी येथे आयोजित संयुक्त क्रार्यक्रमात  ते बोलत होते या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून किनवटच्या  प्रकल्पाधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मा. नेहाजी भोसले  (IAS) हे होते तर मंचावर प्रमुख उपस्थिती किनवट महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा व्यवस्थापक रुपेशजी दलाल, बोधडी एम जी बी शाखेचे व्यवस्थापक श्री. चांदेकर , सौ. संगीता पाटील संस्था अध्यक्षा गृहलक्ष्मी महिला ग्राम विकास संस्था किनवट- माहुर हे मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरवातीस महीलांनी स्वागत गीत सादर केले   कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. संगिता पाटील यांनी मांडले व संस्थेची कारकीर्द सांगीतली , या नंतर रुपेश दलाल यांनी महीलांना बँके व्यवहार  संबधी माहिती दिली तसेच एम जी बी  बँके  सेवा केंद्रातर्फे

खासदार हेमंत पाटील जनसंपर्क कार्यालयात हिंदु हृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

  आज किनवट येथील खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या किनवट जनसंपर्क कार्यालयात हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले किनवट न्युज नेटवर्क:- यावेळी उपस्थित यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, माजी उपसभापती गजानन कोल्हे,भाऊराव राठोड, दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड, मनोज तिरमनवार, सुरेश घुमडवार,आनंद बामणे, अरविंद कदम, ओमप्रकाश नरवाडे, कपिल रेड्डी, संतोष चक्करवार,विपीन पवार, अभिषेक किन्हाळकर, भावराव जाधव, चंदू बिलोला, प्रकाश बेकमवार, संदेश कटकमवार, रुपेश दासरवार, गीतेश कोरटकर,संदीप नेमानिवार, नारायण औदिवार,किरण दडगेलवार, लहू गायकवाड, बळीराम शिंदे, पवन जोशी,किरण येरमे, जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड  यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोकुंदा ठाकरे चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

  किनवट:-गोकुंदा येथील ठाकरे चौकात दरवर्षीप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला असून सदर कार्यक्रमाचे नेतृत्व शिवसैनिक तथा माजी शिवसेना तालुका अध्यक्ष राम कोरडे पाटील यांच्या समवेत शिवसैनिक संतोष येलचलवार ,प्रमोद केंद्रे, प्रवीण रेड्डी, श्याम कोरडे, अतुल दर्शनवाढ, संजय मेश्राम, नागेशराव, गणेश कटाजीवार, शेख अफसर, अजिज खान पठाण हे उपस्थित होते सदर कार्यक्रमात सर्वप्रथम राम कोरडे पाटील यांनी सर्व शिवसैनिकांच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या  फोटोला हार अर्पण करून अभिवादन केले यानंतर बाळासाहेब ठाकरे अमर रहे अशा घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शिक्षक सतत गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज

 चिखलीच्या माणिक विद्यालयाच्या शिक्षकांना गरज नाही शाळेत हजर राहण्याची,महीण्यातुन एक दोनदा सह्या मारुन पगार उचलतात मात्र महीण्याची..... चिखली येथील चित्र   किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट तालुक्यातील माणिक विद्यालय चिखली (बु) येथे संस्थाचालक यांचे भाऊ माधव माणिकराव बसवदे हे गेल्या अनेक दिवसापासून आजारी असल्या कारणाने महिन्यातून दोनच वेळा शाळेवर येऊन हजेरीपटावर उपस्थित असल्याचे स्वाक्षरी करून शासनाचे पगार उचलत असल्याचा प्रकार काही दिवसापुर्वीच उघडकीस आला होता त्याचीच प्रचिती दि 14 नोवव्हेंबर रोजी दै.नांदेड चाैफेर चे तालुका प्रतीनीधी लक्ष्मीकांत मुंडे यांना आली.   किनवट पासून 12 किलोमीटर अंतरावर चिखली (बु) येथे माणिक विद्यालय अंतर्गत पाचवी ते दहावीपर्यंत माध्यमिक शाळा कार्यरत असून सदर शाळेवर मुख्याध्यापकासह 14 कर्मचारी कार्यरत आहेत दिनांक 29/06/2022 रोजी गावकऱ्यांच्या सांगण्यावरून काही पत्रकारांनी प्रत्यक्ष शाळेवर भेट दिली असता संस्था चालकाचे भाऊ माधव माणिकराव बसवदे हे शिक्षक पदावर कार्यरत आहेत परंतु सदर शिक्षक अनेक महिन्यापासून आजारी असल्याचे शाळेवरील कर्मचाऱ्यांनी सांगितले सदर शिक्षक म

आगाखान एज्युकेशन सेंटर प्री स्कुल मध्ये बालक दिन साजरा

  किनवट प्रतिनिधी:- ता.१४ नोव्हेबर आज पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती व बालक दिन साजरा करण्यात आला या शाळेत छोटेखानी कार्यक्रम  घेण्यात आला शाळेत सजावट करण्यात आली होती तसेच विद्यार्थ्यांनी  विविध वेशभुषा , पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या पोशाख परिधान विद्यार्थ्यांनी केला तर कुणी साडी परिधान केली तसेच शाळेत फुगे रिबीन व विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला    आगाखान एज्युकेशन सेंटर प्री स्कुल शाळा भर भरून दिसत होती या प्रंसगी शाळेच्या मुख्याध्यापिका अल्का पेन्शनवार, संस्थेचे  सचिव करीम जीवाणी, नुरजंहा जीवाणी, मुनीरा जीवाणी, फेरोज हिराणी शिक्षीकावृंद शाहीन चरनीया, शितल गजेन्गीवार, पुजा बंडेवार व सर्व शिक्षीका उपस्थित होते.

गोकुंदा येथील शांतिनिकेतन पब्लिक स्कूल मध्ये बालदिन साजरा

गोकुंदा प्रतिनिधी:  किनवट गोकुंदा येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त शांतिनिकेतन पब्लिक स्कूल येथे आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव परवीन शेख यांनी भेट दिली त्याचबरोबर प्रिन्सिपल व टीचर यांनी आनंदनगरीचे . उत्तम प्रकारे आयोजन केले. विद्यार्थी भरपूर प्रमाणात याच्या सहभागी झाले व वेगवेगळे पदार्थ बनवून आणले त्याचबरोबर त्यांचे पालकही आनंद नगरीचा भरपूर आनंद घेतला पालकही मोठ्या प्रमाणात सहभागी होते व सर्व बालक यावेळी खूप आनंदित होते या आनंदनगरी ची तयारी  शाळेचे प्रिन्सिपल शिक्षक सर्व मिळून उत्तम प्रकारे केली

जुन्या नगर परिषदे समोरील संविधान स्तंभा भोवतालचे अतिक्रमण त्वरीत काढुन सुशोभीकरण करावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा- सिद्धार्थ नगर नवयुवक मंडळ व युवा पँथरचे तहसिलदार यांना निवेदन

किनवट बातमीदार:- किनवट शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जुन्या नगर परिषदे समोरील लोकशाहीचे प्रतिक असलेले संविधान स्तंभ( स्मारक) हे फार जीर्न झाले असुन त्याच्या भोवताल परीसरात आईस्क्रीमचे , पाणीपुरी विक्रेते व इतर हातगाड्यांनी अतिक्रमण केले असुन ते वापरलेले प्लास्टीक ग्लास , पिशव्या तसेच धुतलेले सांडपाणी संविधान स्मारकाची विटंबना करीत आहेत . संविधान स्मारक हे जुन्या काळातील मुख्य चौक असुन स्वातंत्र्य समता बंधुता व एकतेची प्रेरणा देणारे स्थळ आहे या कडे नगर परिषद प्रशासन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असुन संविधान प्रेमी नागरीकांकडुन येत्या २६ नोव्हेंबरला संविधान स्मारक येथे संविधान गौरव दिन , रक्तदान शिबिर इत्यादी कार्यक्रम होणार आहे तरी त्वरीत  बाजुचे अतिक्रमण काढून संविधान स्मारकाचे सुशोभीकरण करण्यात यावे या आशयाचे निवेदन मा. तहसिलदार यांना देण्यात आले तसेच त्याच्या प्रतिलिपी , मुख्याधिकारी नगर परिषद कार्यालय किनवट , उपविभागीय कार्यालय किनवट, पोलिस निरीक्षक साहेब , पोलीस ठाणे यांना सादर करण्यात आले आहेत सदरील निवेदनावर सतिष उत्तमराव कापसे, प्रदुमन राठोड, ओमकार श

गंधकुटी बुद्ध विहारात सम्यक सम्बुद्ध रुपाची मिरवणुक काढून प्रतिष्ठापना

  गोकुंदा प्रतिनीधी:- ता.८ कार्तिक पौर्णीमेच्या दिवशी गोकुंदा येथील गंधकुटी बुद्ध विहारात तथागत गौतम बुद्धाच्या नवीन मुर्तीची सम्यक संबुद्ध रुपाची मिरवणुक काढून पुजनीय भदंत सिरीपुत्त ( पुलगाव) यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके ता. अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा किनवट हे होते कार्य तर प्रमुख पाहुणे म्हणून उपा. दादाराव कयापाक मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष रिपाई ए. ,उपा. अँड. मिलींद सर्पे ता. बातमीदार  सकाळ, अनिल महामुने (गट शिक्षणाधिकारी प.सं) ,उपा गोकुळ भवरे ( दै. लोकमत प्रतिनीधी) ,सुरेश पाटील ( वामनदादा कर्डक संगीत ), विश्वनाथ नरवाडे (माजी केंद्रप्रमुख), उपा.महेंद्र नरवाडे( नांदेड जिल्हा पर्यटन व प्रचार उपाध्यक्ष), राजाराम वाघमारे नरवाडे (ता. सरचटणीस भा.बौ.म.स.) ,आनंद चंद्रे (माजी उपमुख्याध्यापक), राजेश पाटील(शहर प्रतिनीधी सकाळ) तर प्रमुख वक्ते म्हणुन विचार मंचावर प्रा. शुभांगीताई ठमके (अध्यक्षा सावित्रीबाई फुले विचारमंच) किनवट, प्रा. डॉ. पंजाब शेरे (ता. सरचिटणीस अखिल भारतीय बौध्द उपासक संघ , कमलताई पाटील,( उपाध्यक्षा भा. बौ. म. स., माहुर ) उ

उपविभागिय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी नेहा भोसले किनवटला रुजु

  किनवट,ता.७(बातमीदार): एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्पाधिकारी म्हणून आणि किनवट उपविभागीय कार्यालयाचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून आज(ता.७)नेहा भोसले ह्या रुजू झाल्या.दरम्यान, गट विकास अधिका-यांसह अनेक संंबधीत अधिका ऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आहे  .

शेतकर्‍यांनी ई- के वाय सी करून घ्यावी - तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांचे अवाहन

  किनवट ता.प्र दि ०६ शेतक-यांना वारंवार आवाहन करुन देखील किनवट तालुक्यातील ९२११ शेतक-यांनी अद्यापही आपला ई-के. वाय. सीन केल्याने आगामी काळात त्यांना मिळणारे पीएम- किसान योजनेचा हप्ता बंद होऊ शकतो यामुळे पुढील एक आठवड्यात शेतक-यांनी आपली ई- के.वाय. करुन घ्यावी असे आवाहन डॉ मृणाल जाधव तहसिलदार किनवट यांनी केले आहे. केंद्र सरकार ने सन २०१७ पासुन शेतक-यांना वार्षीक ६००० रुपये प्रमाणे २००० हजार रुपयाच्या हप्त्याप्रमाणे अनुदान अशी योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता काही नियम व अटी लावण्यात आल्या होत्या परंतु सुरवातीला सरसकट शेतक-यांनी या योजने करिता नोंदणी केली होती परंतु नंतर महसुल प्रशासनाव्दारे या योजनेतील नियम व अटी प्रमाणे लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आली जसे आयकर भरणारे, नोकरी करणारे, एकाच कुटुंबात अनेकांची नावे, राजकारणी, संवैधानिक पदाचा लाभ घेणारे अशा लाभार्थ्यांना वगळण्यात आले. ती नावे वगळल्या नंतर आता या योजनेच्या पोर्टल मध्ये फक्त शेतक-यांची नावेच शिल्लक राहिलेली आहे. सदर योजनेला पीएम किसान या नावावे ओळखले जात असल्याने या पोर्टलचे नाव हि पीएम किसान असे ठेवण्यात आले आ

निर्भीड माता... गोळा मासाचा सोडून जाता बुद्धाच्या प्रवाहात कथा भिक्कू संघाची... वाचुया लेखीका ज्योती गायकवाड यांचा विशेष लेख

 योगायोगाने दाभड बावरी नगर येथे जाण्याचा योग आला सर्व परिसरात निरव शांतता जाणवत होती...... बुद्धाचे दर्शन घेताना मन प्रफुलित आणि चिंतनिशील झालं होतं.. शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीकडे पाहून मन शांतीच्या मार्गाने ध्यानस्थ करत होतं.. आकाशात उंच रुंदावलेल्या बोधिवृक्षाकडे पाहताच त्याच क्षणी मनात वाटत राहिले बोधिव्रक्षाखाली बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली वर त्या वृक्षाकडे बघताच वेळोवेळी त्याची प्रचिती होत होती.. दर्शन घेऊन बाहेर पडताच फेरफटका मारताना भिक्कू निवासाकडे नजर गेली दारासमोर झाडाखाली दोरीवर वाळत असलेल्या चिवर वर नजर गेली आणि मनाला वाटत राहिले बहुदा स्वतःलाच स्वतःची कामे करावी लागत असावीत मन पुटपुटले..आणि निवासस्थानाकडे पाहिल्यानंतर बहुतेक भिक्खूसंघ विश्राम करीत असावेत असे वाटले...  तिथून थोडं पुढे आल्यानंतर केळीची शेती दिसून आली काही प्रमाणात एक-दोन झाडांना केळी लागली होती.. केळीकडे बघून वाटत राहिले भिक्खूंसाठी पोटाची व्यवस्था व्हावी म्हणून केळीची लागवड केली असावी असे वाटत राहिले तेथूनच थोडे पुढे आल्यानंतर गर्द सावलीत विसावलेल्या झाडाखाली अगदी दहा वर्ष

राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा भारताच्या इतिहासातीलसर्वात मोठी यात्रा ठरावी- नानाभाऊ पटोले यांचे रेणुका देवीला साकडे

  माहुर प्रतिनिधी:-  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आज रविवारी दुपारी 12 वाजता माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरात दर्शन घेऊन आरती केली व राहुल गांधी यांची भारत जोडा पदयात्रा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी यात्रा ठरावी यासाठी नानाभाऊ पटोले यांनी रेणुका मातेला साखडे घातले            दिनांक 7 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यातून जाणार आहे याकरिता राज्यातील सर्वच नेते सध्या नांदेड मुक्कामी असून दरम्यान आज दिनांक 6 रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे माहूर गडावरील माता रेणुकाच्या दर्शनासाठी आले होते यावेळी त्यांनी श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले व आरती केली यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव परविन शेख व किनवटचे उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अभय महाजन यांनी त्यांचे स्वागत केले व  भारत जोडो पदयात्रेविषयी  चर्चा केली यावेळी किनवट तालुक्याचे  महिला तालुका अध्यक्ष  शेख शहेनाज माहूरचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेंद्र केशवजी व तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संजय भाऊ राठोड  माहूर शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे  माजी नगरपालिका उपा

नागरिकांचे संवैधानिक अधिकार सुरक्षेसाठी संविधानवादी सरकार आणावे लागेल- शेख सुभान अली सर प्रदेश सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

  शिर्डी:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन दिवसीय शिबीर  घेण्यात आले  "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय संविधानावर खरी श्रद्धा आणि निष्ठा ठेवणारा पक्ष असून भाजप हा संविधान विरोधी पक्ष आहे. नागरिकांचे संवैधानिक अधिकार सुरक्षेसाठी संविधानवादी सरकार आणावे लागेल..... शिबिरात आपले मत व्यक्त करताना शेख सुभान अली सर प्रदेश सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या 'राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा' या शिबिराचा पहिला दिवस आज संपन्न झाला. या संपूर्ण दिवसात अनेक नामांकित वक्त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या शिबिराची सुरुवात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली. यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांनी राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या विषयावर कार्यक्रमाला संबोधित केले. कार्यक्रमात झालेल्या प्रत्येक मान्यवरांचे मार्गदर्शन महत्वपूर्ण ठरले. पुढे अनुक्रमे ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांनी 'महाराष्ट्राच्या निर्मितीची गोष्ट