Skip to main content

निर्भीड माता... गोळा मासाचा सोडून जाता बुद्धाच्या प्रवाहात कथा भिक्कू संघाची... वाचुया लेखीका ज्योती गायकवाड यांचा विशेष लेख



 योगायोगाने दाभड बावरी नगर येथे जाण्याचा योग आला सर्व परिसरात निरव शांतता जाणवत होती......

बुद्धाचे दर्शन घेताना मन प्रफुलित आणि चिंतनिशील झालं होतं.. शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीकडे पाहून मन शांतीच्या मार्गाने ध्यानस्थ करत होतं.. आकाशात उंच रुंदावलेल्या बोधिवृक्षाकडे पाहताच त्याच क्षणी मनात वाटत राहिले बोधिव्रक्षाखाली बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली वर त्या वृक्षाकडे बघताच वेळोवेळी त्याची प्रचिती होत होती.. दर्शन घेऊन बाहेर पडताच फेरफटका मारताना भिक्कू निवासाकडे नजर गेली दारासमोर झाडाखाली दोरीवर वाळत असलेल्या चिवर वर नजर गेली आणि मनाला वाटत राहिले बहुदा स्वतःलाच स्वतःची कामे करावी लागत असावीत मन पुटपुटले..आणि निवासस्थानाकडे पाहिल्यानंतर बहुतेक भिक्खूसंघ विश्राम करीत असावेत असे वाटले...

 तिथून थोडं पुढे आल्यानंतर केळीची शेती दिसून आली काही प्रमाणात एक-दोन झाडांना केळी लागली होती.. केळीकडे बघून वाटत राहिले भिक्खूंसाठी पोटाची व्यवस्था व्हावी म्हणून केळीची लागवड केली असावी असे वाटत राहिले तेथूनच थोडे पुढे आल्यानंतर गर्द सावलीत विसावलेल्या झाडाखाली अगदी दहा वर्ष वय असलेले भिकू *सुगत* हे बसले होते पहारेकरी आजोबांसोबत...


तर दुसऱ्या बाजेवर 16 वर्ष वय असलेले भिकू बाजेवर झोपून मोबाईलवर  काहीतरी बघत होते त्या दोघांनाही बघून माझ्या मनात क्षणभरासाठी विचार आले आपण जाऊन त्यांचं अगोदर दर्शन घेतलं पाहिजे..  आणि एवढ्या लहानशा वयात एवढ्या मोठ्या त्यागाची बाब विचारावी असे वाटले..पण अजून मनात विचार आला आपण त्यांना हा प्रश्न करणं कदाचित चुकीचं असू शकेल असं मनाशी बोलत बोलत मी चार पाऊल पुढे निघून गेले सगळ्या परिसराचा आनंद घेऊन माझी पावलं परतीच्या वाटेला निघाली.. तेवढ्यात माझ्यासमोर अचानकपणे *सुगत* भिकू येऊन थांबले घाईघाईने पाऊल टाकत लगबगिने माझ्याजवळ येऊन थांबले जीव त्यांचा लहान आणि अंगावर परिधान केलेले चिवर त्यांच्या जीवापेक्षा मोठे होतहोते मध्येच वेळोवेळी अंगावरील चिवर सावरत होते मी त्यांच्याकडे थक्क नजरेने पाहत राहिले...

पटकन त्यांच्या  जवळ जाऊन म्हणाले मला आपलं दर्शन हवं आहे आणि त्याच क्षणी मी  त्यांचं दर्शन घेतलं..

त्यांना बघताच क्षणी माझ्या मनात अनेक प्रश्नांची रेलचेल सुरू झाली आणि मला राहावलं नाही

 क्षणाचाही विलंब न करता भिकू आपलं नाव विचारू नये किंवा ते आपण सांगू नये हे मला ठाऊक आहे परंतु मला आपलं नाव जाणून घेण्याची इच्छा आहे तेव्हा कृपया मला आपले नाव सांगाल का? मी त्यांना हळूच आवाजात म्हणाले..

 तेव्हा सुगत भिकू अगदी निरागस लहानशा आवाजात हळुवारपणे म्हणाले माझे नाव *सुगत* आहे मला त्यांचं वय बघून आश्चर्य वाटत होतं एवढा लहान जीव एकटा कसा काय राहू शकतो..? असं वाटत होतं म्हणून मी पुन्हा प्रश्न केला कृपया आपलं गाव कोणतं ते पुन्हा हळुवारपणे म्हणाले नांदेड येथून आलो आहे मी...मला पुन्हा राहवत नव्हतं त्यांच्याबद्दल ऐकण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.. तोच मी पुन्हा प्रश्न केला तुम्ही येथे केव्हापासून सहभागी झालात आणि पुढे किती दिवस राहणार आहात तेव्हा ते हळू स्वरात म्हणाले मी तीन महिन्यापूर्वी येथे आलो आहे माझ्या आईने मला या ठिकाणी आणून सोडले आहे हा शांतीचा मार्ग अवलंब करण्यासाठी मला यापुढचे आठ वर्षे येथे थांबायचे आहे मी त्यांच्या या वाक्याने पूर्णता अवाक होऊन लगेच घाई घाईने विचारले अस ऐकण्यात आले आहे या ठिकाणी फक्त एक वेळेचे जेवण मिळते मग तुम्हाला तर खूप भूक लागत असेल ना..? इतके लहान आहात तुम्ही तुम्हाला भूकसहन होते का? तर तेवढ्याच प्रकर्षाने ते म्हणाले नाही तीन वेळा मिळते जेवायला हे त्याचं वाक्य ऐकून मनाला खूप आनंद झाला आणि ओके ओके ठीक मग काही प्रॉब्लेम नाही असे शब्द मनातून बाहेर आले.. तेव्हा माझे मित्र हळूच आवाजात म्हणाले काही दिवस देतात वाटत तीन वेळा नंतर देतील मग एक वेळा  पुन्हा माझं मन चररकन कापल्यासारखं झालं.. आणि असू देत सध्या तरी तीन वेळा देतात ना असं मनाशी हितगुज केलं.. आणि आम्ही निघण्याच्या तयारीत... तेवढ्यात शेवटचा प्रश्न म्हणून मी विचारलं घरी कोण कोण असतं आई वगैरे भेटायला येतात का? तर *सुगत* भिकू म्हणाले घरी आई आहे एक छोटी बहीण आणि भाऊ आहे मग मी लगेच म्हटलं वडील..?


 ते म्हणाले वडिलांचे निधन झालं आहे ते ह्यात नाहीत... पुन्हा काळजावर वार झाले....मग मी म्हटलं भाऊ तुमच्यापेक्षा लहान आहेत की मोठे तर ते म्हणाले माझ्यापेक्षा मोठा भाऊ होता पण आजच त्यांचं निधन झालं काय..??

मी जोरात ओरडले आणि पूर्णपणे शांत झाले लगेच माझे मित्र म्हणाले काय झालं होतं त्यांना अचानकपणे..

काही दिवसांपासून आजारी होता तो असं भिकूंच उत्तर आलं..

आता मात्र मी त्यांच्याकडे स्थिरवलेल्या नजरेने शांत बघण्या वाचून काहीच करू शकले नाही ते मात्र आजच भावाचं निधन झाले असं सांगताना आतून जरी कोलमडले असले तरी वरून मात्र अश्रूंना बांध न फुटू देता स्थिर गंभीर विचाराने...जणू काही घडलेच नाही या विचाराने एक एक पाऊल पुढे टाकत ते तेथून निघून गेले.. 

मी आणि माझे मित्र मंडळी एकमेकांकडे आवाकपणे बघत होतो एकही शब्द तोंडा बाहेर येत नव्हता इतके आम्ही हादरून गेलो.. आणि मनाला चटका लावणारी घटना ऐकून थरथरत्या मनाने बावरी नगरचा  निरोप घेत आम्ही बाहेर पडलो..

 तेवढ्यात एकमेकांशी चर्चा करताना मित्र म्हणाले बघितलेत का या दुखापुढे आपले दुःख किती कमी आहे ते... आज त्यांचा भाऊ या जगातून निघून गेला आहे पण ते अंत्यविधीलाही जाऊ शकत नाहीत... शेवटचं एकदा आपल्या भावाला डोळे भरून बघूही शकत नाहीत मग मला सांगा जीवन जगताना अडचणी ह्या येणारच पण ह्या दुःखासमोर आपल्या अडचणींच दुःख हे कमीच आहे या सर्व प्रसंगावरून वाटत राहिल आयुष्यातील प्रत्येक दुःख या दुःखापुढे कमीच आहे..

 घरी आल्यानंतर हा प्रसंग काही केल्या मनातून जाईना तेव्हा मी यावर आईशी चर्चा केली आईला हे ऐकून खूप दुःख झाले पण आईने सकारात्मक बाजूने मला समजावून सांगीतले...की त्या स्त्रीने म्हणजेच सुगतच्या आईने मोठ्या हिमतीने जीवन प्रवास सहन केला जिथे बुद्धांचे विचार अमर आहेत अशा ठिकाणी सुगत भिक्कूनां.. त्यांना ठेवण्याचा निर्णय कदापि चुकला नाही... कुठलीही आई एवढी मोठी हिम्मत करू शकले नसती प्रथम त्या आईच्या हिमतीला आपण दाद दिली पाहिजे.. स्वतःच्या पतीच्या निधनानंतर तिच्याकडे लेकरच तिची खरी हिंमत होती परंतु त्या माऊलीने कोणताही विचार न करता एक चांगला विचार करून  *सुगत* भिकूला बुद्धाच्या  विचाराने त्यांच्या जीवनात एक तेजोमय प्रकाश दिसून येईल आणि दुःखापासून मुक्ती मिळेल या अनुषंगाने त्या माऊलीने त्यांना येथे आणून सोडले असावे आणि बुद्धांच्या विचारात एवढी ताकत आहे की दुःख माणसाला स्पर्शही करू शकत नाही त्यामुळे भावाच्या निधनामुळे  काय दुःख झालं किती दुःख झाले... हे दुःख विसरण्याची ताकत...  बुद्धांच्या विचारात अमर आहे..

 सुख दुःख काय असतं याचा तर्क शुद्ध अभ्यासच मनुष्याच्या जीवनाची जडणघडण करीत असतो.. हे आईचे उत्तर आले..

 गौतम बुद्ध म्हणतात अपेक्षा हे दुःखाचं मूळ कारण असतं आणि सुखाच्या शोधात माणूस नवीन दुःखाला जन्म घालत असतो

त्यामुळे दुःखावर मात करण्यासाठी केवळ आणि केवळ जीवनात बुद्धांच्या विचारांचं... अनुकरण करणं.. हाच एकमेव पर्याय आहे.. आणि हेच अंतिम सत्य आहे...!!


ज्योती गायकवाड..✒️

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...