Skip to main content

शेतकर्‍यांनी ई- के वाय सी करून घ्यावी - तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांचे अवाहन

 



किनवट ता.प्र दि ०६ शेतक-यांना वारंवार आवाहन करुन देखील किनवट तालुक्यातील ९२११ शेतक-यांनी अद्यापही आपला ई-के. वाय. सीन केल्याने आगामी काळात त्यांना मिळणारे पीएम- किसान योजनेचा हप्ता बंद होऊ शकतो यामुळे पुढील एक आठवड्यात शेतक-यांनी आपली ई- के.वाय. करुन घ्यावी असे आवाहन डॉ मृणाल जाधव तहसिलदार किनवट यांनी केले आहे.

केंद्र सरकार ने सन २०१७ पासुन शेतक-यांना वार्षीक ६००० रुपये प्रमाणे २००० हजार रुपयाच्या हप्त्याप्रमाणे अनुदान अशी योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता काही नियम व अटी लावण्यात आल्या होत्या परंतु सुरवातीला सरसकट शेतक-यांनी या योजने करिता नोंदणी केली होती परंतु नंतर महसुल प्रशासनाव्दारे या योजनेतील नियम व अटी प्रमाणे लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आली जसे आयकर भरणारे, नोकरी करणारे, एकाच कुटुंबात अनेकांची नावे, राजकारणी, संवैधानिक पदाचा लाभ घेणारे अशा लाभार्थ्यांना वगळण्यात आले. ती नावे वगळल्या नंतर आता या योजनेच्या पोर्टल मध्ये फक्त शेतक-यांची नावेच शिल्लक राहिलेली आहे. सदर योजनेला पीएम किसान या नावावे ओळखले जात असल्याने या पोर्टलचे नाव हि पीएम किसान असे ठेवण्यात आले आहे. तर किनवट तालुक्यातील ९२११ असे शेतकरी आहे ज्यांचा अजुन ही ई-के. वाय. सी झालेला नाही. त्यांनी येत्या एका आठवड्यात आपली ई-के. वाय. सी करुन घ्यावी असे आवाहन तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांनी केले आहे.
ई-के. वाय. सी करिता अत्यंत सोपी पध्दत आहे शेतक-यांनी आपल्या जवळच्या सेतु सुविधा केंद्र, सि. एस. सी केंद्र किंवा तहसिल कार्यालयात जाऊन आपला आधार क्रमांक सांगुन नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओ.टी.पी नोंदवणे आहे. किंवा ज्यांना ओ.टी.पी ने शक्य नाही अशानी आपल्या हातांच्या ठश्याने ई- के.वाय.सी करावयाचा आहे. ज्या शेतक-यांना शक्य आहे त्यांनी आपल्या मोबाईल किंवा घरातील संगणकावर देखिल पीएम- किसान च्या वेबसाईट वरती जाऊन सोप्या पध्दतीने आपली ई - केवासी करुन घ्यावी.




Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...