Skip to main content

टिपू सुलतान हे राष्ट्रीय बलीदानाचे प्रतिक - शेख सुभान अली

 


हिंदू मुस्लिम एक्य हेच आमचे प्रगतीचे निष्कर्ष, धार्मिक सलोखा असेल तर देश महासत्ता बनेल -  मधुकर महाराज बारूळकर


 मुखेड शहारात २९ रोजी ह. टिपू सुलतान जयंती उत्सव समीती मूखेड च्या वतीने टिपु सुल्तान जयंती व सविधान दिन निमित्त व्याख्यानांचा कार्यक्रम संपन्न व्याख्यानाच्या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाची उद्देशिका वाचन करून झाली, येणाऱ्याया सर्व मान्यवरांना समितीच्या वतीने संविधानाची टिपू जिवनावर असलेली पुस्तिका सत्कार म्हणून देण्यात आली, तसेच भारतीय संविधानाची उद्देशिकाचे वाचन खाजा धुंदी यांनी, तर शाळेतील चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. प्रस्ताविक भाषण शिवाजी गेडेवाड यांनी केले, या कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार पत्रकार महताब शेख यानी केले.  उदघाटक श्री मधुकर महाराज बारूळकर यांनी प्रत्येक घराघरात देशभक्तीचा व मानवतेचा टिपू सुलतान घडवा, हिंदू मुस्लिम एक्य हेच आमचे प्रगतीचे निष्कर्ष असू शकतात, धार्मिक सलोखा असेल तर देश महासत्ता बनेल हे ठणकावून सांगितले, पुढे कार्यक्रमाचे अध्यक्ष भ रेवतबोद्धी यानी आपल्या शैलीत बोलले देशात काही जन दंगली करुन जाती जातीत भांडणे लावण्याचे कामे करीत आहेत, आपन ह्या बाबी विचारात घेऊन एकच धर्म मानवता धर्म आमलात आणुन मानव घडणे व घडवणे तेंव्हाच आपले संविधान व देश वाचेल. पुढे सुभाण अली सर म्हणाले स्वातंत्र्य वीर शहीद टिपू सुलतान हे राष्ट्रीय बलीदानाचे प्रतिक आहेत ते धर्म सहिष्णू राजे होते. त्यांनी १५६ मंदीरांना देणग्या दिल्याचा पुरावा आज ही मैसुर गेझेटीयर मध्ये उपलब्ध आहे. टिपू सुलतान खरा धर्म सहिष्णू होता. इंग्रजांनी टिपू ला बदनाम केले टिपू सुलतान च्या महलाच्या ४ ही बाजुने श्रीवेंकटरमना, श्रीनिवास, श्रीरंगनाथ चे मंदीर या गोष्टीचा स्पष्ट पुरावा आहे की टिपू सुलतान धर्म सहिष्णू होते हिंदू प्रजेवर प्रेम करणारे होते असे मत टिपू सुलतान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दंगा मुक्त महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख शेख सुभान अली यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय प्रतीक राष्ट्र निर्माणाची प्रेरणा असतात आणी स्वातंत्र्य वीर टिपू सुलतान एकमेव सर्वात पहले शहिद आहेत जे इंग्रजा विरुद्ध लढताना रणांगणात शहिद झाले आहेत म्हणून स्वातंत्र्य वीर टिपू सुलतान यांची जयंती राष्ट्रीय बलीदानाची प्रेरणा म्हणून साजरी करायला हवी, संविधानाच्या मूळ प्रतीत त्यांचे छायाचित्र समाविष्ट करण्यात आले आहे. राज्यघटनेच्या मूळ प्रतच्या पृष्ठ १४४ अध्याय १६ मध्ये स्वातंत्र्य वीर टिपू सुलतानचे छायाचित्र आहे. जि विचारधारा संविधानाला वीरोध करते तीच विचारधारा स्वातंत्र्यवीर टिपू सुलतान यांचा विरोध करते आणी जो कोणी टिपू सुलतानला विरोध करत आहे तो संविधानाच्या मूळ प्रतीच्या अस्तित्वालाच विरोध करत आहे आणि म्हणून तो राष्ट्रद्रोही संबोधला जावू शकतो, म्हणून कोणीही अज्ञानपोटी ही राष्ट्रीय प्रतिके, संविधान यांचा विरोध करता कामा नये असे ते म्हणाले. समाजात बंधुभाव निर्माण करून सामाजिक एकता आणी राष्ट्रीय एकात्मता सशक्त करणारा अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन मुखेड येथील टिपू सुलतान जयंती उत्सव समिती यांनी केले, तर या कार्यक्रमाला दिलीप पाटील बेटमोगरेकर, दशरथराव लोहबंदे, सय्यद एफ एम, गौतम काळे, ईनामदार जकरीया, नासेरखा पठाण, संतोष बोनलेवाड, सदाशिव पाटील, शिवाजी गेडेवाड, गोविंद डुमणे, अनिल सिरसे, शौकत होनवडजकर, उत्तम बनसोडे, शौकत पठाण, आलावोदीन मुल्ला, हाजी हैदरसाब, अँड रहीमखान, शेख मैनोदीन, अ. करीमसाब धुंदी, बंटी सोनकांबळे, हाजी सय्यद साबेर पठाण, सचिन पा. इंगोले, विजय कोतापले, सचिन श्रीरामे, लखन गायकवाड, पठाण अनवरखा, अँड आशिष भारदे, संतोष बनसोडे, शंकर श्रीरामे, अहेमद बेळीकर, पत्रकार मुस्तफा पिंजारी, पत्रकार जलील पठाण, मोसीन कोतवाल आदी सह तालुक्यातील सर्व समाजिक संघटनाचे, राजकीय पदअधिकारी, पत्रकार, कार्यकरते, व मूखेड शहरातिल नागरिक व टिपू सुलतान जयंती उत्सव समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...