Skip to main content

प्रवाशांना बस रद्द झाल्याची सूचना न दिल्यामुळे एसटी महामंडळाला ६ हजाराचा दंड तक्रार निवारण आयोगाने व्यवस्थापकाला प्रवाशी नुकसान भरपाई बद्दल दिले आदेश

 


माहूर : गावाकडे दिवाळी सण साजरा करण्यासाठी प्रवाशांनी कोल्हापूर -  लातूर जाणाऱ्या बसचे सांगलीपासून लातूर पर्यंत तीन सीट आरक्षीत केले मात्र ती बस रद्द झाल्याची पूर्व सूचना प्रवाशांना न दिल्यामुळे ग्राहक तक्रार निवारण आयोगाने आगार व्यवस्थापकाला ३ हजार रुपये दंड, मानसिक त्रासापोटी २ हजार तर तक्रारीसाठी १ हजार असे एकुण ६ हजार रुपये प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश  आगार व्यवस्थापकाला  दिले.


नांदेड जिल्ह्याच्या माहुर तालुक्यातील तुळशी गावाचे सरपंच नितीन मंडाले यांनी २८ ऑक्टोंबर २०२१ रोजी कोल्हापूर - लातूर जाणाऱ्या बसचे सांगलीपासून लातूर पर्यंत ३ सीट आरक्षीत केले. त्याबद्दल त्यांनी महामंडळला सेवेचा मोबदला 2034 रुपये दिले. व त्याच्या कुटूंबातील सदस्यांसह सांगली बसस्थानकात बसची वाट बघत बसले. बराच वेळ ताटकळत बसल्यानंतर बसची निश्चित वेळ होऊन त्यामुळे प्रवाशी नितीन मांडले यांनी चौकशी विभागात विचारपूस केली तेव्हा त्यांना कळाले लातूर जाणारी बस रद्द झाली आहे.


मंडाले यांनी तिकीट आरक्षित करत असताना स्वतःचा मोबाईल नंबर दिला होता परंतु, आगार व्यवस्थापकानी त्यांना बस रद्द झाल्याची कोणतीही पूर्व कल्पना दिली नाही त्यामुळे मंडाले व त्यांचा कुटूंबातील सदस्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला त्यामुळे त्यांनी ऍड. सचिन भीमराव दारवंडे यांच्या मार्फत ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल करून ५० हजार रुपये नुकसाभरपाई देण्याची मागणी केली.

ग्राहक आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा सातपुते, सदस्य रविंद्र बिलोलीकर, श्रीमती कविता देशमुख यांनी मंडाले आणि आगार व्यवस्थापक अधिकारी या दोघांची बाजू ऐकून घेतली. ग्राहक आयोगाने त्यानंतर मंडाले यांची तक्रार अंशतः मंजुर करून तिकिटाची एकूण रक्कम ३ हजार रुपये मंडाले यांना परत देण्याचे आदेश दिले तसेच आगार व्यवस्थापक यांना मानसिक त्रासापोटी भरपाई म्हणून २ हजाराचा दंड ठोठावला व ग्राहक तक्रार दाखल करण्यासाठी लागलेला खर्च १ हजार रुपये असे एकुण ६ हजार रुपये मंडाले यांना देण्याचा आदेश दिले. सदरील प्रकरणात मंडाले यांची बाजू ऍड सचिन भीमराव दारवंडे यांनी व आगार व्यवस्थापकांची बाजू संदीप पवार यांनी मांडली.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...