Skip to main content

किनवट मध्ये आज संविधान जागृती महोत्सवाचे आयोजन

 


किनवट:-

 भारतीय संविधान- दिनानिमित्त युवा प्रबोधन मंच शाखा किनवटच्या वतीने दि 24 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत किनवट येथे संविधान जागृती महोत्सवाचे आयोजन केले असून यानिमित्त प्रख्यात सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचा प्रबोधना चा कार्यक्रम, व्याख्यान, सावधान रॅली, संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन युवा प्रबोधन मंचच्या वतीने करण्यात आले आहे.


भारतीय संविधानातील मूलभूत हक्क, स्वातंत्र्य, समता, न्याय, धर्मनिरपेक्षता ही लोकशाहीची मूल्य जपण्यासाठी तसेच संविधानाप्रती जनजागृती करण्याच्या उद्देशाने युवा प्रबोधन मंच शाखा किनवटच्या वतीने दि 24 व 26 नोव्हेंबर असे दोन दिवस येथील गोंदराजे मैदानात संविधान जागृती महोत्सव आयोजित केला आहे कार्यक्रमाच्या


अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले विचार मंचाच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके हे राहणार असून आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखाताई ठाकूर, खा हेमंत पाटील, मा खा सुभाष वानखेडे, प्रा गोविंद दळवी, फारुख अहेमद, माजी आ प्रदीप नाईक, जि प च्या माजी अध्यक्षा जनाबाई डूडुळे, राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी फारूक अहमद राजेश्वर हत्तीआंबिरे माजी नगराध्यक्ष इसाखान सरदार खान प्रशांत ठमके नामदेवराव केशवे, सुधाकर भोयर, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, अनिल तिरमनवार, सचिन नाईक, उपनगराध्यक्ष व्यंकट नेमानीवार, प्रफुल राठोड, संध्या वाचन राठोड, विनोद भरणे, नारायण सिडाम, व्यंकटराव नेमानीवार, प्रकाश गब्बा राठोड, सोपान केंद्रे, दिनकर दहिफळे, रविकांत सर्पे, विकास कुडमते, जयवंत वनोळे यांच्यासह विविध पक्षाचे तसेच सामाजिक संघटनेचे नेते उपस्थित


राहणार आहेत. जोतिबा खराटे हे कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत, माजी नगराध्यक्ष साजिद खान स्वागताध्यक्ष, राजेंद्र शेळके संयोजक तर दत्ता कसबे हे स्वागतोतुस्क आहेत. दि 24 नोव्हेंबर रोजी सांय 6 वा प्रा डॉ अनंत राऊत यांचे "लोक कल्याणकारी संविधान व संविधानाने दिलेल्या अधिकाराचे लाभ घेणारे संविधान मूल्यानुसार वागतात काय ?" या विषयावर व्याख्यान होईल व त्यानंतर प्रख्यात सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचा सत्यपालाची सत्यवाणी हा प्रबोधनाचा कार्यक्रम गोंडराजे मैदानत आयोजित केला आहे 26 नोव्हेंबर रोजी संविधान रॅली, संविधान उद्देशिकेचे सामूहिक व संविधान जागृती महोत्सवाचा समारोप होईल. या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक सुरेश जाधव, माधवराव कावळे, शंकर नगराळे, विशाल हलवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...