गोकुंदा ठाकरे चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
किनवट:-गोकुंदा येथील ठाकरे चौकात दरवर्षीप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला असून सदर कार्यक्रमाचे नेतृत्व शिवसैनिक तथा माजी शिवसेना तालुका अध्यक्ष राम कोरडे पाटील यांच्या समवेत शिवसैनिक संतोष येलचलवार ,प्रमोद केंद्रे, प्रवीण रेड्डी, श्याम कोरडे, अतुल दर्शनवाढ, संजय मेश्राम, नागेशराव, गणेश कटाजीवार, शेख अफसर, अजिज खान पठाण हे उपस्थित होते सदर कार्यक्रमात सर्वप्रथम राम कोरडे पाटील यांनी सर्व शिवसैनिकांच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला हार अर्पण करून अभिवादन केले यानंतर बाळासाहेब ठाकरे अमर रहे अशा घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Comments
Post a Comment