Skip to main content

स्वातंत्र्य सेनानी शहीद टिपु सुलतान यांचे विचार घरा-घरात पोहचवा-शेख सुभानअली( टिपु सुलतान ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्ष , दंगा मुक्त महाराष्ट्र अभियान प्रमुख)

 



किनवट तालुका प्रतिनिधी:-

स्वातंत्र्यवीर शहीद टिपू सुलतान यांचे विचार घरा घरात पोहचवा टिपु सुलतान  हे राष्ट्रीय बलीदानाचे प्रतिक आहेत ते धर्म सहिष्णू राजे होते. त्यांनी १५६ मंदीरांना देणग्या दिल्याचा पुरावा आज ही म्हैसूर गॅझेटीयर मध्ये उपलब्ध आहेत. राष्ट्र पिता महात्मा गांधी यंग इंडियाच्या २३ जानेवारी १९३० च्या अंकात म्हणतात, टिपू सुलतान खरा धर्म सहिष्णू होता. इंग्रजांनी टिपला बदनाम केले टिपू सुलतान च्या महलाच्या ४ही बाजुने श्रीवेंकटरमना, श्रीनिवास, श्रीरंगनाथ चे मंदीर या गोष्टीचा स्पष्ट पुरावा आहे की टिप् सुलतान धर्म सहिष्णू होते. हिंदू प्रजेवर प्रेम करणारे होते असे मत टिपू सुलतान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दूंगा मुक्त महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख शेख सुभान अली यांनी व्यक्त केले.


स्वातंत्र्यसेनानी शहीद टिपू सुलतान जयंती, संविधान दिवस आणी प्रबोधनकार ठाकरे स्मृती दिनानिमित्त टिपू सुलतान ब्रिगेड किनवट आयोजित राष्ट्रीय एकत्मतापरिषद दि. १८ रोजी सायंकाळी तहसील मैदानात संपन्न झाली. या वेळी मंचावर कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून टिपू सुलतान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दंगा मुक्त महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख शेख सुभान अली, भीम टायगर सेनेचे दादासाहेब शेळके, मुफ्ती अजिज खान, गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. प्रदीप राठोड यांच्या सह माजी नगराध्यक्ष साजीद खान, माजी उपनगराध्यक्ष अभय महाजन, माहूरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अमित यतिकर, डॉ.मोफिक खान, पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसानी यांची उपस्थिती होती.


पुढे बोलताना सुभान अली म्हणाले, राष्ट्रीय प्रतीक राष्ट्र निर्माणाची प्रेरणा असतात आणीस्वातंत्र्यवीर टिपू सुलतान एकमेव सर्वात पहले शहिद आहेत जे इंग्रजा विरूद्ध लढताना रणांगणात शहिद झाले आहेत म्हणून स्वातंत्र्यवीर टिपू सुलतान यांची जयंती राष्ट्रीय बलीदानाची प्रेरणा म्हणून साजरी करायला हवी, संविधानाच्या मूळ प्रतीत त्यांचे छायाचित्र समाविष्ट करण्यात आले आहे. राज्यघटनेच्या मूळ प्रतच्या पृष्ठ १४४ अध्याय १६ मध्ये स्वातंत्र्यवीर टिपू सुलतानचे छायाचित्र आहे. जी विचारधारा संविधानाला विरोध करते तीच विचारधारा स्वातंत्र्यवीर टिपू सुलतान यांचा विरोध करते आणी जो कोणी टिपू सुलतानला विरोध करत आहे तो संविधानाच्या मूळ प्रतीच्या अस्तित्वालाच विरोध करत आहे आणि म्हणून तोराष्ट्रद्रोही संबोधला जावू शकतो. म्हणून कोणीही अज्ञानपोटी ही राष्ट्रीय प्रतिके, संविधान यांचा विरोध करता कामा नये असे ते म्हणाले. या वेळी भीम टायगर सेनेचे दादासाहेब शेळके, मुफ्ती अजिज खान, गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. प्रदीप राठोड साजिद खान, अभय महाजन यांनी स्वातंत्र्यवीर टीपू सुलतान यांच्या व अनेक महापुरुषांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकला. या वेळी अकबर खान युसुफ खान प्रास्ताविक डॉ.मोफिक खान  यांनी मांडले तर

संचलन जकिर सर यांनी तर सय्यद नदीम यांनी आभार मानले. समाजात बंधुभाव निर्माण करून सामाजिक एकता आणी राष्ट्रीय एकात्मता सशक्त करणारा अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन किनवट येथील टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हाध्यक्ष सय्यद नदीम शब्बीर खान, शेख फयाज, अल्माज खान, शेख जुबेर, शेख जावेद शेख सद्दाम, शेख आसिफ, अमीर खान, शेख मुनवर यांनी केले.



Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...