Skip to main content

जुन्या नगर परिषदे समोरील संविधान स्तंभा भोवतालचे अतिक्रमण त्वरीत काढुन सुशोभीकरण करावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा- सिद्धार्थ नगर नवयुवक मंडळ व युवा पँथरचे तहसिलदार यांना निवेदन



किनवट बातमीदार:-

किनवट शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जुन्या नगर परिषदे समोरील लोकशाहीचे प्रतिक असलेले संविधान स्तंभ( स्मारक) हे फार जीर्न झाले असुन त्याच्या भोवताल परीसरात आईस्क्रीमचे , पाणीपुरी विक्रेते व इतर हातगाड्यांनी अतिक्रमण केले असुन ते वापरलेले प्लास्टीक ग्लास , पिशव्या तसेच धुतलेले सांडपाणी संविधान स्मारकाची विटंबना करीत आहेत .

संविधान स्मारक हे जुन्या काळातील मुख्य चौक असुन स्वातंत्र्य समता बंधुता व एकतेची प्रेरणा देणारे स्थळ आहे या कडे नगर परिषद प्रशासन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असुन संविधान प्रेमी नागरीकांकडुन येत्या २६ नोव्हेंबरला संविधान स्मारक येथे संविधान गौरव दिन , रक्तदान शिबिर इत्यादी कार्यक्रम होणार आहे तरी त्वरीत  बाजुचे अतिक्रमण काढून संविधान स्मारकाचे सुशोभीकरण करण्यात यावे या आशयाचे निवेदन मा. तहसिलदार यांना देण्यात आले तसेच त्याच्या प्रतिलिपी , मुख्याधिकारी नगर परिषद कार्यालय किनवट , उपविभागीय कार्यालय किनवट, पोलिस निरीक्षक साहेब , पोलीस ठाणे यांना सादर करण्यात आले आहेत सदरील निवेदनावर सतिष उत्तमराव कापसे, प्रदुमन राठोड, ओमकार शर्मा, आकाश आळणे, स्वप्नील सर्पे, संघर्ष घुले, राजेंद्र भातनासे, ब्रम्हानंद एडके, निखील ओंकार, शुभम पाटील, विनोद सी भरणे, निखील कावळे, सुमेध कापसे, विनोद रावळे, अतीफ शेख, अनिल कांबळे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत तर राजेश पाटील ,प्रशांत ना. ठमके , प्रतीक नगराळे, सुगत भरणे,

आदर्श शिलवंत येरेकर , कामेश मुनेश्वर , वसंत नगराळे , सम्राट सर्पे सर्प , गौतम पाटील यासह युवा पँथर आंबेडकरी संघटनेचे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...