Skip to main content

गंधकुटी बुद्ध विहारात सम्यक सम्बुद्ध रुपाची मिरवणुक काढून प्रतिष्ठापना

 


गोकुंदा प्रतिनीधी:- ता.८ कार्तिक पौर्णीमेच्या दिवशी गोकुंदा येथील गंधकुटी बुद्ध विहारात तथागत गौतम बुद्धाच्या नवीन मुर्तीची सम्यक संबुद्ध रुपाची मिरवणुक काढून पुजनीय भदंत सिरीपुत्त ( पुलगाव) यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके ता. अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा किनवट हे होते कार्य तर प्रमुख पाहुणे म्हणून उपा. दादाराव कयापाक मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष रिपाई ए. ,उपा. अँड. मिलींद सर्पे ता. बातमीदार  सकाळ, अनिल महामुने (गट शिक्षणाधिकारी प.सं) ,उपा गोकुळ भवरे ( दै. लोकमत प्रतिनीधी) ,सुरेश पाटील ( वामनदादा कर्डक संगीत ), विश्वनाथ नरवाडे (माजी केंद्रप्रमुख), उपा.महेंद्र नरवाडे( नांदेड जिल्हा पर्यटन व प्रचार उपाध्यक्ष), राजाराम वाघमारे नरवाडे (ता. सरचटणीस भा.बौ.म.स.) ,आनंद चंद्रे (माजी उपमुख्याध्यापक), राजेश पाटील(शहर प्रतिनीधी सकाळ)



तर प्रमुख वक्ते म्हणुन विचार मंचावर प्रा. शुभांगीताई ठमके (अध्यक्षा सावित्रीबाई फुले विचारमंच) किनवट, प्रा. डॉ. पंजाब शेरे (ता. सरचिटणीस अखिल भारतीय बौध्द उपासक संघ , कमलताई पाटील,( उपाध्यक्षा भा. बौ. म. स., माहुर ) उपस्थित होते यांनी  आपले विचार मांडले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी तुझाच गौतमा पडे प्रकाश अंतरी तुझेच धम्म चक्र हे फिरे जगावरी हे अभिवादन गीत  प्रा.सुरेश पाटील यांनी सादर केले  तर संगीत वाद्याची साथ प्रज्ञाचक्षु अनिल उमरे यांनी दिली,यानंतर भदंत सिरीपुत यांनी धम्म वंदना व परित्राण पाठ घेतले, कार्यक्रमाचे प्रास्तावीक सत्यभामा रमेश महामुने यांनी मांडले तर उत्कृष्ट असे सूत्र संचालन उपा. उत्तम कानिंदे (निवेदक न्यूज चॅनल) यांनी केले तर आभार ज्योती विनोद कदम यांनी मानले, दरम्यान बुद्ध मुर्ती दान केल्या बद्दल उपा. रमेश किशनराव महामुने, सत्यभामा महामुने यांचा  व नवनिर्वाचित सरपंच अनुसया संजय सिडाम यांचा सत्कार करण्यात आला.



या वेळी सरपंच अनुसया सिडाम यांनी गंधकुटी विहारास एकवीस हजार रुपये धम्मदान दिले.

गंधकुटी बुद्ध विहार समीती महिलांच्या वतीने सत्कार • आला तसेच, राहुल उमरे समता सैनीक दल संरक्षण उपाध्यक्ष, विशाल येरेकार, राहुल घुले यांनी चोख बंदोबस्त ठेवला या कार्यक्रमास सिद्धार्थ  नगर, एकता नगर, शिवनगरी, गोकुंदा, किनवट येथील उपासक व उपासिका  अशोक कानिंदे,                उपा. संविधान मुनेश्वर, राहुल घुले, बौद्धाचार्य अनिल उमरे, उपा. प्रकाश कांबळे, सावन मुनेश्वर, साहेबराव भवरे, उपा, सुधीर पाटील, उपा. दिलीप मुनेश्वर, उपा. कपील कांबळे, मारोती अभंगे, जनार्दन भगत, संदेश घुले, उपा. आनंद कानिंदे, प्रशांत रावळे, प्रकाश मुनेश्वर शंकर धोटे, उपा. गंगाराम मुनेश्वर, भिमराव धोटे, प्रतीक उमरे, निलेश भवरे, उपा. सुनिल भवरे, वसंत कांबळे,रत्नदिप , उपा.पंचशिला येरेकार

 उपा. गोदावरी,उपा. लक्ष्मीबाई मुनेश्वर, केवळाबाई कानिंदे, उपा. रुकमीनाबाई गिमेकार, उपा. रमाबाई भगत, उपा, निर्मलाबाई पाटील उपा. सुनिता उमरे, उपा, रुपाली मुनेश्वर

, सत्यभामा महामुने. उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रम संपल्यावर भोजनदान देण्यात आले.



Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...