Skip to main content

शिक्षक सतत गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज

 चिखलीच्या माणिक विद्यालयाच्या शिक्षकांना गरज नाही शाळेत हजर राहण्याची,महीण्यातुन एक दोनदा सह्या मारुन पगार उचलतात मात्र महीण्याची..... चिखली येथील चित्र

 


किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट तालुक्यातील माणिक विद्यालय चिखली (बु) येथे संस्थाचालक यांचे भाऊ माधव माणिकराव बसवदे हे गेल्या अनेक दिवसापासून आजारी असल्या कारणाने महिन्यातून दोनच वेळा शाळेवर येऊन हजेरीपटावर उपस्थित असल्याचे स्वाक्षरी करून शासनाचे पगार उचलत असल्याचा प्रकार काही दिवसापुर्वीच उघडकीस आला होता त्याचीच प्रचिती दि 14 नोवव्हेंबर रोजी दै.नांदेड चाैफेर चे तालुका प्रतीनीधी लक्ष्मीकांत मुंडे यांना आली.

  किनवट पासून 12 किलोमीटर अंतरावर चिखली (बु) येथे माणिक विद्यालय अंतर्गत पाचवी ते दहावीपर्यंत माध्यमिक शाळा कार्यरत असून सदर शाळेवर मुख्याध्यापकासह 14 कर्मचारी कार्यरत आहेत दिनांक 29/06/2022 रोजी गावकऱ्यांच्या सांगण्यावरून काही पत्रकारांनी प्रत्यक्ष शाळेवर भेट दिली असता संस्था चालकाचे भाऊ माधव माणिकराव बसवदे हे शिक्षक पदावर कार्यरत आहेत परंतु सदर शिक्षक अनेक महिन्यापासून आजारी असल्याचे शाळेवरील कर्मचाऱ्यांनी सांगितले सदर शिक्षक महिन्यातून दोन वेळा पंधरा दिवसाला एकदा शाळेवर येऊन स्वाक्षरी करतात व फक्त नावाला रजेचा अर्ज शाळेवर ठेवतात यांच्या अशा बेजबाबदारपणाच्या वागण्यामुळे त्याचा परिणाम शाळेवर होत असून सर्व वर्गाची विद्यार्थी पटसंख्या फक्त 220 असल्याचे शाळेवरील कर्मचाऱ्याकडून कळाले. संबंधित शिक्षकास त्यावेळी मोबाईल वरून संपर्क केला असता माधव बसवदे सर असे म्हणाले होते की मी बरेच दिवसापासून विविध आजाराने ग्रस्त असल्याकारणाने मी नियमित शाळेवर हजर राहू शकत नाही. शाळेवरील मुख्याध्यापक श्री तीगोटे यांच्याशी पत्रकारांनी मोबाईल वरून संपर्क केला असता त्यांनी सदर बाबतीत मौन बाळगळ्याने एक प्रकारे सदर बाब सत्य असल्याचेच उघडकीस होते.दि.14 नोव्हेंबर रोजी देै.नांदेड चाैफेर चे तालुका प्रतीनीधी हे अचानक शाळेवर गेले असता संबंधीत शिक्षक व ईतर एक दोन जण शाळेत हजर नसल्याचे दिसुन आले त्यांना मोबाईलवर संपर्क केला असता मी दुपारीच नंदीग्रामने निघालोय आणि मी आज शाळेवर आलो होतो असे सांगीतले उद्या येणार का विचारल्यावर माझी रजा आहे अस बोलले लगेच शाळेच्या मुख्याध्यापकास याबाबतीत रजा आहे का किंवा,ते कसे परत गेले विचारले असता नेहमीप्रमाणेच माैन बाळगुन राहीले रजा दाखवाच म्हटल्यावर चला चहाघेऊ अस म्हणत काढता पाय घेतला.या बाबतीत शिक्षण विभागाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा गावकऱ्यांच्या वतीने शिक्षण विभागाकडे तक्रारी अर्ज देणार असल्याचे सुद्धा गावकऱ्यांनी बोलून दाखविले

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...