Skip to main content

Posts

Showing posts from July, 2022

महावितरणचा भोंगळ कारभार, दोन दिवसापासुन मांडवी कोठारी सिंद. गाव अंधारात

  किनवट/ मांडवी प्रतिनिधी:- ता.30   मांडवी जिल्हा परिषद गटाअंतर्गत कोठरी सिंध या गावात मागील काही दिवसापासून वीज ही वारंवार खंडित होत होती.पण दोन दिवसापूर्वी गावात वीज बिल थकीत आहे व गावातील ग्रामपंचायतीची वीज बिल ही मागिल काही महिन्या पासुन थकीत आहे कारण ओला दुष्काळ  आहे शेतकरी त्रस्त आहे त्यामुळे गावातील विज बिल भरले जात नाही या कारणाने दिनांक 29/7/2022शुक्रवार या दिवशी सकाळ पासुन वीज पुरवठा खंडित केला आहे तो गावातील वीज बिल पूर्णपणे वसूल केल्यावर ती वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. अशा तुलघी  कारभरामुळे कोठारीवासी हवालदील झाले आहे.  मांडवी परिसरात मागील काही  दिवसापासून  अतिवृष्टी असून शेतामध्ये पूर्ण पाणी साचले असून शेतकरी वर्ग पूर्णपणे घरी बसलेला असून काही मजुरांना मजुरी लागत नसल्यामुळे अशा परिस्थिती वीज बिल भरणे शेतकरी व मोल मजुरी करणारे गावकरी यांनाअशक्य आहे. ग्रामपंचायतीत प्रशासकीय कारभार असल्याने बिल काडण्यास वेळ लागत आहे कारण ग्रामपंचायीकडे या पूर्वी  कोणतीही नोटिस किंवा  पत्र देण्यात आले नाही पुर्व सुचना न देताच विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला व गावकऱ्यांना वीज वापरताना मीटर ब

-मैत्री...मानवी संवेदनांचं नंदनवन मिता नानवटकर यांचा मैत्रीच महत्व सांगणारा लेख नक्की वाचुया

शीर्षक-मैत्री...मानवी संवेदनांचं नंदनवन मैत्री दोन जीवाचं एक अनोखंच नातं...भावभावनांनी,जाणिवांनी,विचारांनी गजबजलेलं सुंदर असं गाव.वय,लिंग,देश,भाषा या सर्व मर्यादेपलीकडे संवेदनांनी सजलेलं,सामंजस्याने बहरलेलं,शब्दांच्या एका चौकटीत पूर्णपणे व्यक्त न होणारं हे नातं..... एका अद्भुत अनुभूतीने जेंव्हा हेच नातं तनामनात अलवार स्पर्शून जातं तेव्हा अंतर्मनी उसळणारी ती जाणीव खरंच विलोभनीय असते. दोन मनांचे प्रतिबिंब डोळ्यांत स्पष्ट पाहता येईल... हृदयाच्या सुप्त जाणीवा अबोल ओठांतून शब्दांविनाही ऐकू येईल.. अंतर्बाह्य उमळणारा स्पर्श सहज अनुभवता येईल... इतकी जवळीकता आणि समर्पकता या मर्मबंधनात सहज जाणवते.. थरथरणाऱ्या बोटांतून... आंतरिक वेदना ओळखल्या की खोट्या हास्यामागे दडलेला.. पापणकाठी गोठलेला आसवांचा बर्फ क्षणातच वितळून गालावर ओघळतो आणि हृदयनभी उठलेलं वादळ शांत होवून भावनांना पायवाट लाभते...आनंद 'माझा' उरत नाही 'आपला' होतो.एकमेकांच्या सहवासात अंतरातला 'मी' सहजगत्या व्यक्त होतो.का.. कसे...ही औपचारीकता गौण ठरते.जे मनात तेच ओठांवर निर्भयपणे येवून अभिव्यक्त

"आयुष्यातल्या मैत्रीचा प्रवास" सुप्रसिध्द लेखीका रुचीरा बेटकर यांचा मैत्रीदिना निमित्त विशेष लेख

  ज्या व्यक्तीच्या डोक्यात मैत्रीदिनाची कल्पना प्रथम आली त्याचे आपल्या सगळ्यांवरच अनंत उपकार आहेत. खर म्हणजे, मैत्रीला एका विशिष्ट दिवशी साजरा करण्याचे कारणच नाही. पण तरीही या दिवसाच्या निमित्ताने तसे होत असेल तर त्यात वाईटही काही नाही. मैत्रीची' सहज अशी व्याख्या कधीच कोणाला करता येणार नाही. ज्याप्रकारे प्रेम ठरवून करता येत नाही तशी मैत्री ही ठरवून करता येत नाही. आयुष्यात जे काही जिवलग मित्र आणि मैत्रिणी भेटत गेले. त्यांच्या सोबत राहून मैत्रीची व्याख्या उलगडत गेली.   काही स्वतःच्या अनुभवाने तर काही दुसर्यानी जगलेल्या अनुभवा वरून, हे सारे अनुभव मैत्री या शब्दात बंदिस्त केले जाते.   मैत्रीचे अनेक दाखले आजवर प्रत्येकजण देत आलेय.   श्री कृष्णा- सुधमाच्या मैत्री पासून शिवबा-बाजीप्रभु, कर्ण-दुर्योधन, पार्थ-माधवा पर्यंत सगळ्यांची मैत्री अगाध आहे. दृढ विश्वासावर अवलंबलेली आहे त्याची खोली ही तितकिच व्याप्त आहे . पुस्तकातल्या पानासारखे आपण जवळ येतो हसतो , बोलता आणि यातून कळत ही नाही की आपसात  कधी मैत्री जुळून येते.   खरच मैत्री कधी कुणाशी कशी होईल काही सांगता येत नाही.  शाळेत गेल्यावर आपल्या

अंतर मनाचा प्रकट हुंकार- शिवशाहीर अण्णाभाऊ साठे

  अण्णाभाऊ साठे हे एक समाजसुधारक तर होतेच याचसोबत ते एक साहित्यिक,लेखक,कांदंबरीकार,देखील होते. ज्या जमातीवर ब्रिटीश राजवटीच्या काळात अपराधी म्हणुन शिक्का मारण्यात आला होता अशा घराण्यात अण्णाभाऊंचा जन्म झाला. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 आँगस्ट रोजी सांगली जिल्हयामधील वाळवा नावाच्या तालुक्यात असलेल्या वाटेगाव ह्या छोटयाशा गावी एका आदीवासी मांग कुटुंबात झाला. अण्णाभाऊंचे पुर्ण नाव हे तुकाराम भाऊराव साठे असे आहे. यांच्या आईचे नाव वालुबाई अणि वडिलांचे नाव भाऊराव असे होते.अण्णाभाऊ साठे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव कोंडाबाई अणि तिच्या निधनांनंतर त्यांनी जयवंता हिचेशी विवाह केला. अण्णाभाऊ साठे यांच्या मुलाचे मधुकर असे नाव होते आणि मुलींचे नाव शांता तसेच शकुंतला असे होते. अण्णाभाऊ साठे जेव्हा त्यांच्या वडिलांसमवेत लहान असताना मुंबई मध्ये गेले तेव्हा तिथे त्यांनी गिरणीत झाडु मारणे कोळसे वेचणे असे मिळेल ते काम केले. त्यांनी छ.शिवाजी महाराज यांच्यावर अनेक पोवाडे रचले म्हणुन त्यांना शिवशाहीर असे देखील म्हटले जाते. अण्णाभाऊ साठे यांना आर्थिक परिस्थितिमुळे त्यांचे शालेय शिक्षण पुर्ण करता आले नव्हते.तरी

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूर जिल्ह्याच्या वतीने कारगिल विजय दिन साजरा

  लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा शाखा लातूरच्या वतीने कारगिल विजय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय सेना २६ जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करत आहे.जम्मू काश्मीर मधील कारगिल जिल्ह्याच्या उंच पहाडी इलाख्यामध्ये हे युद्ध लढले गेले. पहाडी इलाख्यामध्ये पाकिस्तानी पाच हजार घुसखोरानी कारगिल जिल्ह्याचा काही भाग व्यापला होता त्यांची ही हरकत थांबत नसल्याने भारतीय सैनिकांनी ३ मे, १९९९ ला चढाई केली व युद्धाची ठिणगी पडली. हे युद्ध साठ दिवस चालले असून या युद्धात भारतचे ७५ जवान शहीद झाले. मात्र पाच हजार घुसखोरांना नेस्तनाबूत करून आपल्या विजयाची पताका २६ जुलै १९९९ ला सैनिकानी कारगिलच्या उंच पहाडीवर रोवली आणि ही पताका आजही मोठया डौलाने फडकत आहे. याचे स्मरण म्हणून भारतीय सेना कारगिल विजय दिन म्हणून साजरा करत असते. याचाच भाग म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा शाखा लातूरच्या वतीने कारगिल विजय दिन रीमजिमत्या पावसात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष लहूकुमार शिंदे, उपाध्यक्ष महादेव पोलदासे, संघटक संजय राजोळ

किनवट येथील क्रिडा संकुलाची बिकट अवस्था , क्रिडा अधिकारी कायमस्वरूपी पाहीजे क्रिडा प्रेमींची मागणी

(किनवट शहर प्रतिनिधी):-    शहरांमधील युवक व नागरिकांना मॉर्निंग वॉक, व्यायाम व बॅडमिंटन खेळण्याकरिता क्रीडा संकुलन असून या संकुलनची दयनीय अवस्था बनत चालली आहे . बॅडमिंटन इंनडोअर हॉलमधील दोन उडणकोट असून पूर्णपणे  निकामी झाले असल्याकारणाने आदिवासी दुर्गम भागातील युवक नागरिकांना खेळण्याकरीता उडनकोट किंवा पर्यायीकोट तयार करून देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन तालुकाक्रीडा संकुलन अधिकारी यांच्या मार्फत क्रीडा संकुलन सचिव तहसीलदार यांना न .पा. चे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक अभय महाजन यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी दिले आहे .         याबाबत सविस्तर वृत्त असे की, किनवट शहरात सहायक जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या कार्यकाळात क्रीडा संकुलन उभारणी करण्यात आली होती . या क्रीडा संकुलांचा उपयोग अनेक नागरिक व व्यायाम करण्याकरीता युवक वर्ग घेत होते. बॅडमिंटन खेळण्याकरिता अनेक खेळाडू व कर्मचारी वर्ग इंन डोअर बॅडमिंटन कोट चा फायदा घेतात. परंतु आज या दोन्ही कोट ची दयनीय अवस्था झाली आहे. तर लाईटची सुविधा नाही. सर्व रिपर निघाल्यामुळे खेळताना त्यांचे पायस गंभीर दुखापत होण्याची भीती निर्माण झाली आहे. वार

ग्रामीण भागात पाच लाख घरांवर तिरंगा फडकणार

  ▪️जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने जोरदार तयारी ▪️नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा ठाकूर घुगे यांचा सरपंचांशी महासंवाद (नांदेड ) दि. 27:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा उपक्रमाबाबत नांदेड जिल्‍हयातील ग्रामीण भागातून  पाच लाख घरांवर तिरंगा फडकवणार  असून किमान 75 हजार महिला आपल्या घरावर स्वतः राष्ट्रध्वज लावून राष्ट्राला अनोखी सलामी देणार असल्याची माहिती  नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे. भारतीय स्‍वातंत्र्याला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांच्‍या मनात स्‍वातंत्र्याच्‍या आठवणी उजळून निघाव्‍यात तसेच स्‍वातंत्र्य लढयाच्‍या स्‍मृमी तेवत राहाव्‍यात यासाठी हर घर तिरंगा मोहीम राबविण्‍यात येत आहे. या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यानिमित्‍त आज झूम मिटिंगव्‍दारे जिल्‍हाधिकारी विपीन इटनकर व मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सरपंच व ग्रामसेवकांशी संवा

जिल्‍हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची 28 जुलै रोजी आरक्षण सोडत

नांदेड  दि. 27 :- राज्‍य निवडणूक आयोगाकडील आरक्षण सोडत सुधारीत कार्यक्रमानुसार नांदेड जिल्‍हा परिषद सदस्‍य पदासाठी आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. ही सोडत गुरुवार 28 जुलै 2022 रोजी डॉ. शंकरराव चव्‍हाण नियोजन भव‍नाच्या प्रेक्षागृहात  जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्‍यक्षतेखाली  सकाळी 11 वा. काढण्‍यात येणार आहे. जिल्ह्यातील पंचायत समिती सदस्‍य पदांसाठीच्‍या आरक्षणाची सोडत तालुकापातळीवर काढण्यात येत आहे.  गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. किनवट, हदगाव, नांदेड, भोकर, धर्माबाद, बिलोली, कंधार व देगलूर तालुका मुख्‍यालयी तर माहूर, हिमायतनगर, अर्धापूर, मुदखेड, उमरी, नायगाव (खै), लोहा व मुखेड या तालुक्यांसाठी 28 जुलै रोजीच दुपारी 4 वाजता संबधित तहसिलदार यांच्याकडून संबधीत उपविभागीय अधिकारी यांच्‍या नियंत्रणात पंचायत समिती सदस्‍य पदांसाठीच्‍या आरक्षणाची सोडत काढण्‍यात येणार आहे. जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या नागरिकांना या सभेस उपस्थित राहण्याची इच्छा आहे त्यांनी नमूद ठिकाणी व वेळी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. हरकती व सूचना सादर करण्

पैनगंगा नदी काठावरील अतिवृष्टी बाधित गावांना तात्काळ मदत देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकारी यांना आदेश

किनवट ता.२३ :  हिंगोली लोकसभा मतदार संघातील पैनगंगा नदीपात्रांच्या काठावर वसलेल्या हदगाव , किनवट, उमरखेड व वसमत विधानसभा मतदार संघातील अनेक गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे शेतीपिकांसह जनावरे दगवाली आहेत. सध्या या गावातील नागरीकांचे प्रचंड हाल सुरु आहेत. अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना प्रशासनाकडुन तातडीची मदत द्यावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड, हिंगोली व यवतमाळच्या जिल्हाधिकारी यांना आदेश  दिले असल्याची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली                खासदार हेमंत पाटील यांनी शुक्रवारी (ता.२३) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन हिंगोली लोकसभा मतदार संघातील पैनगंगा नदीच्या काठावरील नागरीकांना प्रशासनाकडुन वेळेवर मदत दिली जात नसल्याची माहिती दिली. त्यानंतर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हिंगोली, नांदेड व यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना भ्रमनध्वनी वरुन संपर्क साधत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याच्या सुचना दिल्या आहेत. काही दिवसापासून हिंगोली लोकसभा मतदार संघात संततधार पाऊस झाल्याने या पावसाचा शेतकऱ्

अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी- संभाजी ब्रिगेड

  किनवट :- तालुक्यातील अतिवृष्टी शेतकऱ्याच्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी असे निवेदन तहसीलदार यांना मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड कडून देण्यात आले मागील आठवडा भरापासून तालुक्यामध्ये व परिसरामध्ये चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या पंधरा दिवसापासून सूर्यदर्शन झाले नाही सततच्या पावसामुळे अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे एक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे शेतकऱ्यावर दुपार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे कोसळलेल्या नैसर्गिक संकटामुळे आर्थिक नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपयाची तात्काळ मदत द्यावी अशा मागणीची निवेदन मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड तर्फे देण्यात आले या निवेदनावर संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष अजय कदम पाटील शहराध्यक्ष रणजीत चव्हाण शहर कोषाध्यक्ष अतुल खरे तालुका उपाध्यक्ष सुरेश जाधव सचिव सुरज चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

काँग्रेस कमिटी किनवट कडून ओबीसी आरक्षण निकालाचा आनंदोत्सव साजरा.

  किनवट प्रतिनिधी:- ता.२२ राज्यातील ओबीसी घटकांना सर्वच क्षेत्रात आरक्षण संदर्भात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने इम्पेरिकल डाटासह आवश्यक त्या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून बांठीयासमितीचा अहवाल न्यायालयाने स्वीकारून ओबीसी घटकांना 27 टक्के आरक्षण जाहीर केल्याने किनवट काँग्रेस कमिटी यांनी आज दिनांक 22 .7 . 2022 रोजी शहराच्या मध्यवर्ती चौकातील छत्रपती शिवाजी राजे यांच्या पुतळ्याजवळ , आणि राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या पुतळ्याजवळ फटाक्याची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा केला. याप्रसंगी किनवट शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, तथा माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेमानेवार, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष नवीन भाऊ राठोड, माजी नगराध्यक्ष के मूर्ती, प्रकाश गेडाम, गिरीश नेमानी वार, दिलीप पाटील, स्वामी नूतने पिल्लेवार, बाभुळकर, नवीन जाधव, परविन बेगम, खेडकर माधव, चव्हाण फारुख, के स्वामी, जवाब आलम,अन्वर भाई, शादुल्ला आहेमद, किशोर पवार, कदम ताई, बापूसाहेब पाटील, सत्तार खिच्ची,संतोष अडकिने पाटील,फारुख बाबा,भगत, आधी पदाधिकाऱ्यासह इतरही कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

राष्ट्रपतीपदी द्रोपदी मुर्मू यांची निवड झाल्या मुळे व स्वराज्य संस्थेत ओबीसी आरक्षण बहाली बद्दल भाजप तर्फे जल्लोष

 किनवट ता. प्र दि २१ सुप्रिम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसी आरक्षण बहाल केले व राष्ट्रपती पदी पहिल्या आदिवासी महिला विजयी झाल्याचा उत्सव किनवट भाजपा तर्फे शहरात भव्य रॅली, आतिषबाजी, ढोलताशासह लाडु वाटप करुन साजरा करण्यात आला. किनवट भाजपा तर्फे आमदार भिमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही आनंदी घटनां आनंदाने साज-या करण्यात आल्या. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथिल प्रतिमेला अभिवादन करत मुख्य रस्त्यावरुन रॅली काढण्यात आली होती. तर जिजामाता चौक व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या रॅली मध्ये मोठ्या प्रमाणात लाडु वाटप करण्यात आले. यावेळी बोलतांना भाजपाचे तालुका अध्यक्ष संदिप केंद्रे यांनी देशाच्या राष्ट्रपती पदी आदिवासी महिलेला विराजमान केल्या बद्दल भाजपाच्या वरिष्ठ नेतृवाचे आभार व्यक्त केले, तर राज्यातील नविन स्थापन झालेल्या युती शासनाच्या प्रयत्नातुन ओबीसी समाजाला सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण बहाल केल्या बद्दल हि शासनाचे आभार व्यक्त केले.  शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार यांनी यावेळी बोलतांना सां

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांचा वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तू भेट देऊन वाढदिवस साजरा

  पिंपरी चिंचवड शहर पदाधिकाऱ्यांनी जपली माणुसकी.... पिंपरी चिंचवड : व्यस्त जीवनशैलीतून थोडासा  वेळ काढून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने तसेच वयोवृद्धांच्या सहवासात काही वेळ घालवून त्यांच्या समस्या जाणून  घेण्याच्या उद्देशाने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक श्रीनिवास माने, पिंपरी चिंचवडच्या महिला उपाध्यक्षा उषा लोखंडे या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील महिलांना जीवनावश्यक वस्तू व फळं भेट देवून साजरा करण्यात आला.   सदर वाढदिवस बिजलीनगर (चिंचवड) येथील मातृसेवा संस्थेला  भेट देऊन साजरा करण्यात आला. यावेळी तेथील वृद्ध स्त्रियांशी संवाद साधून त्यांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवड यांच्या वतीने जिवनावश्यक भेटवस्तू, बिस्कीट व फळं देऊन साजरा करण्यात आला.   यावेळी आबाल वृद्धांशी संपर्क साधून त्यांच्याशी हितगुज करण्यात आले. काही महीलांनी लव यु म्हणत स्वागत केले तर काहींनी गाणे गाऊन पत्रकारांना चांगला प्रतिसाद दिला. काहींना स्मृतीभ्रंष झाल्याचे आढळले, यावेळी जिवनातील शेवटच्या टप्प्यांच्या कंगोर्याचे वास्तव दर्शनही येथे झाले. अशा वेळी अ

अभ्यासू विद्यार्थ्यांच्या पाठिवर गोदावरी अर्बनची कौतुकाची थाप -डॉ. राम भोसले, यांच्या हस्ते सीए ज्ञानोबा चव्हाण यांचा सत्कार

वसमत, ता. २०  – सर्व सामान्य कुटुंबातील मुलांमध्ये देखील शिक्षणाप्रती जिद्द असते. त्यांच्या प्रचंड मेहनतीच्या जोरावर असे विद्यार्थी जिवघेण्या स्पर्धेत उतरतात मात्र त्यांची आर्थिक बाजू कमजोर असल्यानेच ते पुढे या स्पर्धेत टिकुन राहावित यासाठी त्यांना गोदावरी अर्बन संस्था सामाजिक बांधिलकिच्या माध्यमातून अभ्यासू, हुशार विद्यार्थ्यांच्या पाठिवर कौतुकाची थाप देत आहे हे कौतुकास्पद असल्याचे वक्तव्य डॉ. राम भोसले यांनी येथे केले.               गोदावरी अर्बनचे संस्थापक तथा खासदार हेमंत पाटील, गोदावरी समुहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत येथील गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को. आप. सोसायटी लिमिटेड शाखा वसमतच्या वतीने शेतकरी ज्ञानोबा व सुनीता चव्हाण या शेतमजूर दांपत्याने रोजमजुरी करून हलकीचे जीवन जगत मुलगा विष्णुला उच्चशिक्षण देऊन सीए पर्यंत पोहचविल्यानंतर गोदावरी अर्बन म. क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नांदेड शाखा वसमत शाखेच्या वतीने डॉ.. राम भोसले त्यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी गोपीनाथ भोसले, शाखा अधिकारी अशोक चोपड

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या १४ व्या वर्धापण दिना निमित्त वृक्षारोपण समारोह

  (किनवट तालुका बातमीदार) ता.२० बुधवार महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या १४ व्या वर्धापण दिना निमित्त  बळीराम पाटील कला वाणीज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने किनवट येथे वृक्षारोपण समारोह घेण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक रुपेश दलाल यांनी केली होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मा.कीर्तीकिरण एच. पूजार हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख अतिथींचे सत्कार करण्यात आले यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण एच. पूजार यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या चौदाव्या वर्धापन दिनाच्या गौरवशाली वाटचालीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या व वृक्षारोपण उपक्रमा बद्दल कौतुकही केले आणि आजादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा यांची माहिती दिली. तर रुपेश दलाल यांनी बँकेच्या कारकीर्दी बद्दल माहीती सांगीतली त्यांनी म्हटले सोळा जिल्ह्यात एम जी बी शाखा कार्यरत आहे या बँकेद्वारे गृहकर्ज,शैक्षणिक कर्ज,व्यवसायिक कर्ज ,विमा योजना या दिल्या जातात. यानंतर महाविद्यालयीन परिसरात  मा.पूजार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने लोह्यात अण्णा भाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी

  लोहा, नांदेड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी.आंबेगावे, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त लोहा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने शासकीय विश्रामगृह लोहा येथे दिनांक १८ जुलै २०२२ रोजी दुपारी तीन वाजता अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी लोहा नगरपालिकेचे गटनेते करीम भाई शेख, नगरसेवक नबीभाई शेख, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सतिश भाऊ आनेराव, रिपब्लिकन सेना मराठवाडा सदस्य अनिल दादा गायकवाड, स्वाभिमानी भीमसेनेचे लोहा विधानसभा अध्यक्ष विलास सावळे, सामाजिक कार्यकर्ते तथा मातंग समाजाचे नेते बाबुराव टोम्पे आदी मान्यवर प्रमुख अतिथीच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. सर्व प्रमुख मान्यवरांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश झोत टाकला. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव सोनकांबळे, तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार, पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष

बोधड़ी येथे बँक शाखा कार्यरत होण्याच्या आशा पल्लवित

  किनवट (शहर प्रतिनिधी) - केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी भाजपा तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे यांच्या निवेदनाची दखल घेत मौजे बोधडी येथे भारतीय स्टेट बँक शाखा मंजूर करण्याकरिता सकारात्मकता दर्शवली असून त्या अनुषंगाने केंद्रे यांनी १७ जून रोजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री मंत्री भागवत कराड यांना त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी निवेदन दिले होते त्या निवेदनाला प्रतिसाद देत दिनांक ६ जुलै रोजी चे केंद्रीय अर्थराज्यमंत्री कराड यांचे पत्र प्राप्त झाले असून सदर प्रस्ताव हा आर्थिक सेवा विभागाकडे सुपूर्द करण्यातआला असल्याचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी प्रस्तुत पत्रावदारे कळवले आहे. तरी येत्या काही दिवसांत मौजे बोधडी येथे बँक शाखा कार्यरत होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यासंदर्भात तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की खा. प्रताप पाटील चिखलीकर व आ. भीमराव केराम यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सदैव नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून हीच शिकवण आमच्या नेत्यांनी आम्हाला दिलेली आहे.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

  करमाळा तालुका शाखेच्या वतीने आयोजन करमाळा, सोलापूर :  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र राज्य या संघाच्या करमाळा तालुका शाखेच्या वतीने १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा शनिवार दि.२३ जुलै, २०२२ रोजी पंचायत समिती सभागृह, करमाळा, जिल्हा सोलापूर येथे दुपारी १२.३५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.  सदर सन्मान सोहळा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या प्रेरणेने, सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा आशाताई चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. हा सन्मान सोहळा करमाळाचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून करमाळा तालुक्याचे तहसीलदार समीर माने, पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, बालविकास प्रकल्प अधिकारी व्ही. एन. माने, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश (भाऊ ) करे -पाटील, ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष ॲड. डॉ. बाबुराव हिरडे उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, मराठवाडा संपर्क प्

प्रा.डॉ. जहीरूद्दीन पठान यांची हिंदी विषयाच्या प्राध्यापकपदी पदोन्नती

  किनवट प्रतिनिधी:- टिपू सुलतान ब्रिगेड या सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र  प्रदेशाध्यक्ष व कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालय,  उमरी येथील हिंदी विभागात कार्यरत असलेले प्रा. डॉ.  ज़हीरुद्दिन पठान यांची हिंदी विषयाच्या प्राध्यापकपदी पदोन्नती  झाल्याबद्दल टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हाध्यक्ष सय्यद  नदीम , तालुका अध्यक्ष,तालुका सचिव शब्बीर खान,तालुका  उपाध्यक्ष जुबेर शेख,आमेर खान,मुनवर खान,शेख  साहिल,शहबाज खान,गजेंद्र शेखावत,दत्ता पवार,चांद भाई व  किनवट टिपू सुलतान ब्रिगेड शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी  त्यांचेअभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने पत्रकार व आयुक्तांचा सन्मान गुरुपौर्णिमा निमित्त पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने केले होते आयोजन

  पिंपरी चिंचवड : गुरुपौर्णिमा निमित्त ज्येष्ठ पत्रकार पंढरी प्रहर साप्ताहीकाचे संपादक माधव सहस्त्रबुद्धे, ज्येष्ठ पत्रकार मदन जोशी, पत्रकारीतेतील युवा नेतृत्व सुरज कसबे, वृत्तपत्र क्षेत्रात अनेक वर्ष योगदान दिलेले अनिल दळवी यांचा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, पिंपरी चिंचवडच्या वतीने सन्मान करण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील तसेच अतिरीक्त आयुक्त उल्लास जगताप यांचा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी-चिंचवडच्या वतीने गुरु पौर्णिमा निमित्त शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. आयुक्त राजेश पाटील यांनीआपल्या चिकाटीने अभ्यासू वृतीने कठोर परीश्रम घेत संघर्षमय जीवनावर मात करुन उच्च शिक्षण घेतले व प्रतीकुल परिस्थितवर मात केली, याचा प्रत्यय “ताई मी कलेक्टर ह्यनु “या पुस्तकातुन येतो. लहानपणापासुन कलेक्टर होईपर्यंतचा जीवनप्रवास पाहताना सद्याच्या युवकांना प्रेरणा मिळते. तसेच अतिरीक्त आयुक्त उल्लास जगताप यांचा जीवन प्रवासही खडतर आयुष्य, कठोर परिश्रम व चिकाटीने झाला. त्यांच्या या कर्तुत्वाची दखल घेऊन गुरुपौर्णिमा निमित्त प्रेस संपादक व पत्रकार

मुसळधार पावसाने बोधडी येथील् जनजीवन विस्कळीत , घर कोसळले सुदैवाने जिवीत हानी टळली

  किनवट/ बोधडी खु.:दि.१४/७/०२२ गेल्या सात ते आठ दिवसांपासून सतत संततधार सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बोधडी खुर्द येथील जन जिवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे.        सतत कोसळत्या मुसळधार पाऊसामुळे काल रात्री अंजनाबाई वावळे व बापुराव वावळे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात जिवीतहानी टळली,.'देव तारी त्याला कोण मारी',ह्य म्हणी प्रमाणे घरातील सर्व सदस्य दोन  लहान मुले, म्हातारी आई ही रात्रीच्या वेळी घरातच झोपलेले होते, अचानक घराची भिंत हि बाहेरच्या बाजूला धाडकन पडल्याने एक मोठा आवाज झाला, शेजारच्या लोकांनी हे आवाज ऐकून धावत आले, व घरातील मुले म्हातारी यांना घराबाहेर काढण्यासाठी मदत केली.ह्या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात जिवीतहानी टळली. भिंत कोसळून घरातील सर्व संसार उपयोगी समान नुकसान झाले असून दारातच उभी असलेलीMH26Bs1504 हि मोटारसायकल भिंत कोसळल्यामुळे अक्षरशः चुराडा झाली आहे.बोधडी खुर्द येथील पोलिस पाटील श्री बालाजी गिरी यांना बोलावून सदरील घटनेची माहिती  तलाठी साहेब, व ग्रामसेवक साहेब, यांना फोन वरून माहिती देण्यात आली. सतत कोसळणाऱ्या पाऊसामुळे अनेक सखल भ

किनवट येथील पैनगंगा नदीच्या पुलावरून पाणी जात असल्याने मराठवाडा- विदर्भाचा संपर्क तुटला

  ✍🏿राजेश पाटील/ किनवट ता. प्रतिनिधी:- किनवट तालुक्यासह अनेक ग्रामिण भागात पाचव्या दिवशीही मुसळधार पाऊस पडत असल्याने पुर परीस्थीती निर्माण झाली आहे विदर्भ- मराठवाड्याला जोडणारा पैनगंगा नदीवरुन पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुराचे पाणी साई मंदीर, गजानन मंदीर, व गंगानगर वस्तीत घुसले  व तेथील कृष्णप्रिय गोशाळेतील गायींना स्वंयसेवकांनी पुरातुन बाहेर काढत आहे. अनेक लोक घरातील पसारा घेऊन जात काही जण कॉस्मापॉलिटन विद्यालय व बाबासाहेब मुखरे विद्यालय येथे आसरा घेतला आहे तर पुलावरून पाणी जातानां वाहन चालवीणे घातक असल्यांने पोलीस प्रशासनांने चोख बंदोबस्त ठेवला आहे. घोटी पुल, बसस्थानक जवळील पुल, कोठारी पुल, हिमायतनगर , गांजेगाव, यासह अनेक गावांना पाण्याने वेढले आहे. नदी काठच्या घरांना उपविभागिय कार्यालय ,तहसिल प्रशासन, न.प. प्रशासन यांनी सतर्कतेचा आदेश दिला आहे . पुर परीस्थीती पाहण्यासाठी किनवट- माहुरचे आमदार भिमराव केराम यांनी परीस्थीतीचा आढावा घेतला आहे.

प्रा. डॉ.राजू मोतेराव यांना राज्यस्तरीय गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान-

किनवट:-सरस्वती अध्यापक महाविद्यालय किनवट येथील प्रा.डॉ. राजू मोतेराव यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे 2021 चा राज्यस्तरीय गुरगौरव शिक्षक रत्न पुरस्काराने नाशिक येथे सन्मानित करण्यात आले आहे. सन्मानात सन्मानचिन्ह, गौरव पदक, मानपत्र, महावस्त्र, मानाचा फेटा देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेमानीवार,  सचिव कृष्ण कुमार नेमानीवार, एड. जी.एस. रायबोळे, एड. मिलिंद सरपे, प्राचार्या अनुजा पाटील मॅडम, प्राचार्य आनंद भंडारे, प्राचार्य किरण पाईकराव, डॉ. सुनील व्यवहारे, डॉ. मार्तंड कुलकर्णी, डॉ. पंजाब शेरे, प्रा. प्रदीप एडके, प्रा. रुपेश कांबळे, प्रा. रमेश शिंदे, प्रा. श्वेता राठोड, सागर नेमानीवार, महेंद्र एडके, कामराज जाधव, सुरेश सावंगेकर,रमेश सुरेशवार, रवी सावंगेकर, गजू भुरे, सतीश सामावार, प्रा. सुभाष मोहरले, विजय जाधव,  चंद्रकांत वंजारे,मोहन कोवे, गणेश एरकाडे,  सुधाकर पवार, मिलिंद एंगडे, निलेश चहांदे,सागर पाटील,  अजय साळवे आदिने त्याचे अभिनंदन केलेले आहे.

मराठवाड्यासह किनवट तालुक्यात मुसळधार पाऊस

सौजन्य- सम्यक सर्पे किनवट,दि.(प्रतिनीधी) :  तालुक्यात  रविवारी (दि.10) सकाळपर्यंतच्या 24 तासांत खर्‍या अर्थाने मान्सून सक्रिय झाल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तालुक्यातील एकूण नऊ मंडळात दमदार पाऊस बरसला असून, शिवणी मंडळात सर्वात जास्त मुसळधार पाऊस कोसळल्याने तिथे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तालुक्यातील नऊ मंडळातील एकूण पाऊस 449.80 मि.मी.झाला असून, त्याची सरासरी 49.98 अर्थात 50 मिलिमीटर आहे.  पैनगंगा दुथडी भरून वहात असल्यामुळे, काठालगतच्या शेतात पाणी शिरून पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे कळते. पूर परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून असून सर्व विभाग सतर्क झाले आहेत. रविवारी सकाळी संपलेल्या गत 24 तासात किनवट तालुक्यातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे असून,  कंसात 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय एकूण पावसाची नोंद दिलेली आहे.  किनवट- 58.3 (327.4 मि.मी.); बोधडी- 58.3(403.3 मि.मी.); इस्लापूर- 50.0(490.0 मि.मी.); जलधरा- 48.0 (417.1 मि.मी.); शिवणी- 102.5 (475.9 मि.मी.); मांडवी- 24.8(252.6 मि.मी.);  दहेली- 24.8 (251.0 मि.मी.), सिंदगी मो. 58.3 (253.4 मि.मी.); उमरी बाजार 24.8 (280.4 मि.मी.).तालुक्यात

आषाढी एकादशी जल्लोषात साजरी... टाळ, मृदुंग वाद्यवृंदाने परिसर दुमदुमून गेला

नांदेड:-  आषाढातली ही एकादशी आणि तिची वारी हे वारकर्‍याचं व्रत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक लोकजीवनाचे वैभव आहे. याचेच अनूकरण करत सॅटेलाईट डिजीटल पब्लिक स्कूल गणेश नगर रोड,नांदेड येथिल शाळेमध्ये कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधी नंतर नियमित प्रमाणे यावर्षी आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले. चिमुकल्या विद्यार्थीनीं वारकरी वेशभूषा करून दिंडीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी घेतला. गळ्यात तुळशीच्या माळा, कपाळाला गंध, डोक्यावर तुळस, हातात भगव्या पताका घेऊन विठ्ठलाच्या नामघोषाच्या गजरात पालखी सोहळा संपन्न केला. टाळ, मृदुंग वाद्यवृंदाने परिसर दुमदुमून गेला. याचबरोबर अभंग आणि भजन गात विद्यार्थ्यांनी रिंगण तसेच फुगडीचा आनंद लुटला. शाळेचे मुख्याध्यापक नितीन सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी सौ.अर्चना गायकवाड,सौ.सुनंदा वाघमारे  आणि सौ.आम्रपाली वाघमारे यांनी परिश्रम घेतले.अशी माहिती पत्रकारस देण्यात आले.

''टाळी वाजवून, ताल धरावा अन चालावी वाट ती पंढरीची''. आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन .... विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभुषा करून लोकांचे लक्ष वेधले

पिंपरखेड/ नांदेड प्रतिनिधी:-  आषाढी एकादशीचा मोहोत्सव  ''टाळी वाजवून, ताल धरावा  अन्   चालावी वाट ती पंढरीची'' पंढरीची वारी, मग ती आषाढीची असो वा कार्तिकीची, या दोन वाऱ्या म्हणजे वारकऱ्यांचा मोक्षमार्ग.  पावसाळा सुरु झाला की आषाढातील पालख्यांचे वेध लागतात. आषाढातली ही एकादशी आणि तिची वारी हे वारकर्‍याचं व्रत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक लोकजीवनाचे वैभव आहे. याचेच अनूकरण करत भारती इंग्लिश स्कूल, पिंपरखेड या.हदगाव जि.नांदेड येथिल शाळेमध्ये कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधी नंतर नियमित प्रमाणे यावर्षी आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले.इयत्ता नर्सरी ते पाचवीच्या वर्गातील चिमुकल्या विद्यार्थीनीं वारकरी वेशभूषा करून दिंडीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी घेतला. गळ्यात तुळशीच्या माळा, कपाळाला गंध, डोक्यावर तुळस, हातात भगव्या पताका घेऊन विठ्ठलाच्या नामघोषाच्या गजरात पालखी सोहळा संपन्न केला. टाळ, मृदुंग वाद्यवृंदाने परिसर दुमदुमून गेला. याचबरोबर अभंग आणि भजन गात विद्यार्थ्यांनी रिंगण तसे

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा राज्यस्तरीय गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार प्रा. डॉ.राजू मोतेराव यांना प्रदान

 ✍🏻राजेश पाटील  किनवट:- सरस्वती अध्यापक महाविद्यालय किनवट येथील प्रा.डॉ. राजू मोतेराव यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे 2021 चा राज्यस्तरीय गुरगौरव शिक्षक रत्न पुरस्काराने नाशिक येथे सन्मानित करण्यात आले आहे. सन्मानात सन्मानचिन्ह, गौरव पदक, मानपत्र, महावस्त्र, मानाचा फेटा देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेमानीवार,  सचिव कृष्ण कुमार नेमानीवार, एड. जी.एस. रायबोळे, एड. मिलिंद सरपे, प्राचार्या अनुजा पाटील मॅडम, प्राचार्य आनंद भंडारे, प्राचार्य किरण पाईकराव, डॉ. सुनील व्यवहारे, डॉ. मार्तंड कुलकर्णी, डॉ. पंजाब शेरे, प्रा. प्रदीप एडके, प्रा. रुपेश कांबळे, प्रा. रमेश शिंदे, प्रा. श्वेता राठोड, सागर नेमानीवार, महेंद्र एडके, कामराज जाधव, सुरेश सावंगेकर,रमेश सुरेशवार, रवी सावंगेकर, गजू भुरे, सतीश सामावार, प्रा. सुभाष मोहरले, विजय जाधव,  चंद्रकांत वंजारे,मोहन कोवे, गणेश एरकाडे,  सुधाकर पवार, मिलिंद एंगडे, निलेश चहांदे,सागर पाटील,  अजय साळवे ,राजेश पाटील आदिनीं त्याचे अभिनंदन केलेले आहे.

कुरुंदा गाव कायमस्वरूपी पुरमुक्त करणार खासदार हेमंत पाटील ; पुरग्रस्त कुटुंबीयांना अन्नधान्य किटचे वितरण

हिंगोली /नांदेड : थोडासा पाऊस झाला की कुरुंदा गावात नेहमी पुराचे पाणी शिरते त्यामुळे नागरीकांचे हाल होतात.  कुरुंदा येथील पूर प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गावाला संरक्षण भिंत उभारण्यात येईल व पुढील चार ते पाच महिन्यांत हि संरक्षण भिंत उभारून कुरुंदा गाव कायमस्वरूपी पुरमुक्त करण्यात येणार आहे. असा विश्वास हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केला.      मागील तीन  दिवसापासून होणाऱ्या संततधार पावसामुळे  हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा व किन्होळा या दोन गावात पुराचे पाणी शिरल्याने गावासह शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पुरग्रस्त कुटुंबीयांना खासदार हेमंत पाटील यांनी रविवारी ता. १० रोजी भेट दिली व त्याना अन्नधान्य किटचे वितरण पूर परिस्थितीची पाहणी केली . तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला व गावातील पुरपरस्थितीने गावाचे झालेल्या नुकसानीची माहिती दिली.त्यानंतर जिल्हा प्रशासनाला सूचना देत  व पुरग्रस्त कुटुंबीयांना कुठल्याही अत्यावश्यक वस्तू व संसार उपयोगी साहित्य कमी पडू देऊ नयेत  सुचना दिल्या. सोबतच

आषाढी एकादशी निमित्त लेख माझ्यातला 'मी' पण गळून जाण्याचा सोहळाः पंढरीची वारी

माझ्यातला 'मी' पण गळून जाण्याचा सोहळाः पंढरीची वारी..... ''टाळी वाजवून, ताल धरावा  अन्   चालावी वाट ती पंढरीची'' पंढरीची वारी, मग ती आषाढीची असो वा कार्तिकीची, या दोन वाऱ्या म्हणजे वारकऱ्यांचा मोक्षमार्ग.  पावसाळा सुरु झाला की आषाढातील पालख्यांचे वेध लागतात. आषाढातली ही एकादशी आणि तिची वारी हे वारकर्‍याचं व्रत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक लोकजीवनाचे वैभव आहे. ज्ञानोबा - तुकारामचा जयघोष करीत कोणीही या आनंदयात्रेत सहभागी होऊ शकतो, नाचू शकतो, गाऊ शकतो.   साक्षात माऊली ज्ञानेश्वर महाराज, भक्तराज नामदेव महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज, सोपानकाका, मुक्ताई, निवृत्तीनाथ महाराज, गोरोबा काका, सेना महाराज, संत जनाबाई, संत सावता माळी,निळोबाराय, संत चोखोबा अशा अभंगरूपाने अजरामर झालेल्या संतांच्या सान्निध्यात तब्बल पंधरवडा चालण्याचे भाग्य या काळात लाभते.  महाराष्ट्रातील विविध जिल्हे , तालुके, गाव,खेड, पाडे, तांड्यातुन, दिंडया येतात. अगदी कर्नाटकातून, गोव्यातूनही दिंडया येतात. नदीला अनंत अडचणी