Skip to main content

राष्ट्रपतीपदी द्रोपदी मुर्मू यांची निवड झाल्या मुळे व स्वराज्य संस्थेत ओबीसी आरक्षण बहाली बद्दल भाजप तर्फे जल्लोष




 किनवट ता. प्र दि २१ सुप्रिम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसी आरक्षण बहाल केले व राष्ट्रपती पदी पहिल्या आदिवासी महिला विजयी झाल्याचा उत्सव किनवट भाजपा तर्फे शहरात भव्य रॅली, आतिषबाजी, ढोलताशासह लाडु वाटप करुन साजरा करण्यात आला. किनवट भाजपा तर्फे आमदार भिमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही आनंदी घटनां आनंदाने साज-या करण्यात आल्या. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथिल प्रतिमेला अभिवादन करत मुख्य रस्त्यावरुन रॅली काढण्यात आली होती. तर जिजामाता चौक व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या रॅली मध्ये मोठ्या प्रमाणात लाडु वाटप करण्यात आले.

यावेळी बोलतांना भाजपाचे तालुका अध्यक्ष संदिप केंद्रे यांनी देशाच्या राष्ट्रपती पदी आदिवासी महिलेला विराजमान केल्या बद्दल भाजपाच्या वरिष्ठ नेतृवाचे आभार व्यक्त केले, तर राज्यातील नविन स्थापन झालेल्या युती शासनाच्या प्रयत्नातुन ओबीसी समाजाला सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण बहाल केल्या बद्दल हि शासनाचे आभार व्यक्त केले. 

शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार यांनी यावेळी बोलतांना सांगितले कि भाजपा ने आपले घोषवाक्य सबका साथ सबका विकास हे पुन्हा एकदा सिध्द केले असुन यापुर्वी मुस्लिम समाजाचे शास्त्रज्ञ ए.पी.जे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती पदी बसवले त्या नंतर दलित समाजाचे रामनाथ कोविंद यांना संधी दिली तर यावेळी आदिवासी समाजाच्या महिला दौपदी मुर्मु यांना संधी दिल्याने भाजपा बोले तैसा चाले असेच राजकारण करते यामुळे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.

यावेळी तालुका अध्यक्ष संदिप केंद्रे, ज्येष्ठ नेते सुधाकर भोयर ,माजी नगराध्यक्ष दिनकर चाडावार, किसान मोर्चाचे सुधाकर,  ज्येष्ठ नेते अनिल तिरमनवार, शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, युवा मोर्चाचे उमाकांत क-हाळे, माजी उपनगराध्यक्ष अजय चाडावार, नगरसेवक शिवा आंधळे,  सभापती दत्ता आडे, कपिल करेवाड, बाळकृष्ण कदम, संजय रेड्डी, शिवा क्यातमवार, नरेश सिरमनवार, विश्वास कोल्हारीकर, ओबीसी आघाडीचे शेखर चिंचोळकर, जय वर्मा, सतिष बिराजदार, परमेश्वर मुराडवार, बालाजी धोत्रे, जितेंद्र कुलसंगे, अशोक नैताम, सुनिल मच्छेवार, अंकुश साबळे, राहुल दारगुलवार, सुनिल चव्हाण, बालाजी चव्हाण, सुरेश साकपेल्लीवार, यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...