किनवट:-सरस्वती अध्यापक महाविद्यालय किनवट येथील प्रा.डॉ. राजू मोतेराव यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे 2021 चा राज्यस्तरीय गुरगौरव शिक्षक रत्न पुरस्काराने नाशिक येथे सन्मानित करण्यात आले आहे. सन्मानात सन्मानचिन्ह, गौरव पदक, मानपत्र, महावस्त्र, मानाचा फेटा देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेमानीवार, सचिव कृष्ण कुमार नेमानीवार, एड. जी.एस. रायबोळे, एड. मिलिंद सरपे, प्राचार्या अनुजा पाटील मॅडम, प्राचार्य आनंद भंडारे, प्राचार्य किरण पाईकराव, डॉ. सुनील व्यवहारे, डॉ. मार्तंड कुलकर्णी, डॉ. पंजाब शेरे, प्रा. प्रदीप एडके, प्रा. रुपेश कांबळे, प्रा. रमेश शिंदे, प्रा. श्वेता राठोड, सागर नेमानीवार, महेंद्र एडके, कामराज जाधव, सुरेश सावंगेकर,रमेश सुरेशवार, रवी सावंगेकर, गजू भुरे, सतीश सामावार, प्रा. सुभाष मोहरले, विजय जाधव, चंद्रकांत वंजारे,मोहन कोवे, गणेश एरकाडे, सुधाकर पवार, मिलिंद एंगडे, निलेश चहांदे,सागर पाटील, अजय साळवे आदिने त्याचे अभिनंदन केलेले आहे.
किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील प्रगल्भ व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...


Comments
Post a Comment