Skip to main content

"आयुष्यातल्या मैत्रीचा प्रवास" सुप्रसिध्द लेखीका रुचीरा बेटकर यांचा मैत्रीदिना निमित्त विशेष लेख

 


ज्या व्यक्तीच्या डोक्यात मैत्रीदिनाची कल्पना प्रथम आली त्याचे आपल्या सगळ्यांवरच अनंत उपकार आहेत. खर म्हणजे, मैत्रीला एका विशिष्ट दिवशी साजरा करण्याचे कारणच नाही. पण तरीही या दिवसाच्या निमित्ताने तसे होत असेल तर त्यात वाईटही काही नाही.

मैत्रीची' सहज अशी व्याख्या कधीच कोणाला करता येणार नाही. ज्याप्रकारे प्रेम ठरवून करता येत नाही तशी मैत्री ही ठरवून करता येत नाही. आयुष्यात जे काही जिवलग मित्र आणि मैत्रिणी भेटत गेले. त्यांच्या सोबत राहून मैत्रीची व्याख्या उलगडत गेली.

  काही स्वतःच्या अनुभवाने तर काही दुसर्यानी जगलेल्या अनुभवा वरून, हे सारे अनुभव मैत्री या शब्दात बंदिस्त केले जाते. 

 मैत्रीचे अनेक दाखले आजवर प्रत्येकजण देत आलेय.  

श्री कृष्णा- सुधमाच्या मैत्री पासून शिवबा-बाजीप्रभु, कर्ण-दुर्योधन, पार्थ-माधवा पर्यंत सगळ्यांची मैत्री अगाध आहे. दृढ विश्वासावर अवलंबलेली आहे त्याची खोली ही तितकिच व्याप्त आहे . पुस्तकातल्या पानासारखे आपण जवळ येतो हसतो , बोलता आणि यातून कळत ही नाही की आपसात  कधी मैत्री जुळून येते.  

खरच मैत्री कधी कुणाशी कशी होईल काही सांगता येत नाही.  शाळेत गेल्यावर आपल्याला पहिल्यांदाच  बाहेरच्या जगाशी ओळ्ख  होते.  शालेय जीवनापासून ह्या निरागस प्रवासाला सुरुवात होते त्यामुळे सगळी नाती समजायला आणि नवीन नाती आत्मसात करायला शिकवते.  

    पण जसजसा वय वाढत  जाते  आपणही समाजाच्या दृष्टीकोनातून विचार करायला लागतो.  समोरच्या माणसाच्या स्वभावतील विविध कंगोरे जाणून घ्यायला लागतो.   तिथेच ओळख  होते आपल्याला ती खर्या मैत्रीची... तोपर्यंत शालेय जीवन मागे टाकून मनावर आपण सज्ञान झाल्याच बिंबवीत कॉलेज जीवनात प्रवेश केलेला असतो.

 सगळयंशीच ओळख असूनही तिथे प्रत्यकाचे गट पडत जातात मग तो कितीही जणाचा असो  दोन, चार, सहा, दहा, पंधरा, बस्स ह्याची जग मग ही तेवड्यापुरत्यच मर्यादित होते.

  आपले नातेवाईक जन्मानेच  आपल्याला मिळालेले असतात पण आपले मित्र मैत्रिणी तरी आपण निवडू शकतो हे देवाची कृपाच म्हणायला हवी. 

अनेक वेळेला रक्ताच्या नात्या पेक्षा स्नेहाचे नाते अधिक जवळचे होऊन जाते.  सखी बहिण भाऊ आपल्याला समजून घेउ शकत नाही पण एखादी जीवाभावाची मैत्रिण मित्र आपले मन अधिक ओळखतात त्याच्याशी आपण मोकळे हितगुज करू शकतो पण अशी मैत्री जीवापाड जपावी लागते. हेवा, मत्सर, असूया, स्पर्धा, गैरसमज या सर्व गोष्टी एक चांगली मैत्री संपुष्टात आणू शकते.  सगळ्यांची मैत्री आपल्याला चांगल्या मार्गाला नेईल असे ही नाही. काहीशी मैत्री करून बरेच जण वाईट व्यसनाकडे, वाईट प्रवृत्तीकडे वळतात.  अशी मैत्री आपल्याला आयुष्यातून उठवते, निरर्थक  बनवते.  

 बर्याच जनाची मैत्री ही अतूट असते अगदी चिरकाल टिकते पण अनेकजण शालेय, कॉलेज जीवण संपल की मैत्री पण संपते. समाजात वावरताना स्वतवरच्या जबाबदारीची जाणीव झाली  की मैत्रीच्या संबधापासून दुरावत जातात मग कधीतरी रस्त्यात भेट झाली  की नाही तर आपण अनुभवलेल्या अतूट नात्याची आठवण  झाली च तर फोनवर विचारपूस करतात. आजच्या काळात फोन, मोबाइल, इंटेरनेट यामुळे जग जवळ आले असेले तरी माणसे  एकमेकांशी दूर जाऊ लागली आहेत.  

पुर्वी लोक पत्र व्यवहार करून-मैत्री टिकवत असे,

आता मात्र इंटेरनेटचा उपयोग करून मैत्री करू लागलेत 

ना ओळखणारी, एकमेकाना न भेटलेली, न बघितलेली माणस ही इंटेरनेट मुळे मैत्री करू लागली आहेत पण त्याच्यातील मैत्री भावनिक दृष्ट्या उच्च पातळी गाठू  शकते का ? उपकरणाद्वारा  एकमेकाबदल काळजी, आस्था , प्रेम वाटू शकते का? या प्रश्नांना जन्म देत आहे.

आपण जसेजसे  मोठे होत जातो तसेतशे मैत्रीची व्याख्या बदलत जाते शालेय जीवनात तारुण्यातील गमती-जमती शेयर करायला मित्र – मैत्रीणी ची साथ हवी असते त्यापुढे  जीवनात येणार्या अनेकविध अडचणीतून मार्ग काढण्यासाठी योग्य ते मार्गदर्शक म्हणून मित्र-मैत्रीणी हवे असतात. पुढे  वृद्धापकाळात  एकाकी, समाजापासून दुर्लक्षित झाल्यामुळे   जीवनाची अंतिम वाटचाल सुखाची व्हावी म्हणून मित्र -मैत्रिणी हवे असतात.

आजकाल स्त्रीपुरुष मैत्री समजाला नवीन राहिलेली नाही, दोन मैत्रीणी वा मित्रापेक्षा एक मित्र व एक मैत्रिण याची मैत्री निर्मळ असू शकत नाही.यावर शंकाच केली जाते पण ते ही चुकीचे आहे.

 पण बर्याचवेळेला समाजाच्या दृष्टीकोनातून पाहताना त्यावेर टीका केली जाते आणि त्याकारणामुळेच

एका चांगल्या मैत्रीचा अंत केला जातो. 

 आई वडीलानी मुलांचे  मित्र व्हावे अस म्हणतात,  पण असे किती आईवडिल आहेत जे खरच आपल्या मुलाचे चांगले मित्र -मैत्रिणी होतात, कित्येक जण आपल्या सख्या भावाकडे, नातेवाईकाकडे वर्षातून एखाद वेळेस त्यच्याबरोबर एकदी सहल आयोजित करतात, त्यचाशी बोलतात, नाहीतेर् महिन्यातून एकदा तरी मित्र परिवारातील एकाद्याच्या घरी जमवून मैत्रीला उजाळा देण्याचा प्रयत्न करतात, पण नातेवाईक़बाबत असे कुणी करताना दिसत नाही.  बर्याच वेळेला मित्र परिवार वेळेप्रसंगी धावून येतो मग त्याच्यामधे वर्षभर बोलण झाल नाही तरी चालेल पण वेळ पडली तर स्वतचे प्राणही पणाला लावतील, पण आपल्यासाठी , आपल्या जीवाची, आपल्या प्राणाची बाजी लावणार्या आपल्या सैनिक मित्रासाठी  आपण काय करतो.  आपल्या नातलगापासून, मित्रपरिवारपासून दूर असणार्या या सैनिक मित्राकारिता किती जणाच्या मनात प्रेम, आपुलकी मैत्रेची भावना असते त्याचाशी मैत्री करायला मुद्दाम कुणी सीमारेषेवेर गेल्याच ऐकिवात नाही आपण आपली वृती बदलायला हवी.

अनेकांची मैत्री करण्याची पद्धत वेगळी, बहुतेकजण पुस्तकासोबत आपली मैत्री करतात.  काही जण निसर्गाला आपण मित्र मानतात तर काही जण मुक्या प्राण्यांमधे  आपले मित्र -मैत्रिणी शोधू पाहतात, कधी कधी अशी मैत्रीही आपल्याला निर्मळ आनंद देते.  आजकाल वर्तमानपत्रात वाचायला मिळते की दोन राष्ट्रामधील संबंध सुधारण्यासटी या दोन राष्ट्रात मैत्रीपूर्ण करार करण्यात आला, ऐकल्यावर थोड विचित्र वाटते ना.  मैत्री मध्ये करार करता येतो मैत्री ही करारावर अवलंबलेली  असू शकते मैत्री कशी पूर्णपणे जगता आली पाहिजे.  आपल्या मैत्रीमुळे आपण कुणाला आनंद देऊ शकलो नाही तरी  दुख ही देवू नये.  मैत्रीही दोन्ही बाजूनी परिपूर्ण हवी.  एखादा मनापासून दुसर्यशी मैत्री करू पाहतो पण समोरच्याला त्याची मैत्री मान्य नसते.  ज्याला मैत्री करायची त्याच्या भावना तो  समजूच शकत नाही. मैत्री मधे रुसवे, फुगवे, भांडण-तंटा, मान, आदर  सगळे कस भरबरून असायला हव.  झाल्यागेल्याचा हिशोब सखी मांडू नये कधी हृदीयात  तुझ्या फुलते ते अनुभवले मीही.  मैत्री आपुली अखंड राहो कधी ना होवो अंत तुज्या नि माज्या मैत्रीचे लिहू या एक नवे पर्व.

वर्षणुवर्ष मैत्रीचे नाते हे असेच चालू राहील, पिढ्या बदलल्या, माणस बदलली, नवीन शोध  लागले, जग बदलेले तरीही मैत्री हे अस नात आहे जे कधीच बदलणार नाही ते बदलूच शकत नाही म्हणूनच मैत्रिच् नात जपायला हव, एकमेकांमधे द्वेषभाव विसरून सगळ्यानी मैत्रीच्या नात्याने एकत्र आल पाहिजे. सगळ्यांमधे मित्रता नांदली पाहिजे.


✍🏻सौ.रूचिरा बेटकर, नांदेड

9970774211



Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला