Skip to main content

ग्रामीण भागात पाच लाख घरांवर तिरंगा फडकणार

 


▪️जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने जोरदार तयारी

▪️नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा ठाकूर घुगे यांचा सरपंचांशी महासंवाद


(नांदेड ) दि. 27:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा उपक्रमाबाबत नांदेड जिल्‍हयातील ग्रामीण भागातून  पाच लाख घरांवर तिरंगा फडकवणार  असून किमान 75 हजार महिला आपल्या घरावर स्वतः राष्ट्रध्वज लावून राष्ट्राला अनोखी सलामी देणार असल्याची माहिती  नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.



भारतीय स्‍वातंत्र्याला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांच्‍या मनात स्‍वातंत्र्याच्‍या आठवणी उजळून निघाव्‍यात तसेच स्‍वातंत्र्य लढयाच्‍या स्‍मृमी तेवत राहाव्‍यात यासाठी हर घर तिरंगा मोहीम राबविण्‍यात येत आहे. या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यानिमित्‍त आज झूम मिटिंगव्‍दारे जिल्‍हाधिकारी विपीन इटनकर व मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सरपंच व ग्रामसेवकांशी संवाद साधला. यावेळी अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष तुबाकले, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे यांची उपस्थिती होती.


तिरंगा फडकवताना  तिरंग्याचा कुठेही अपमान होऊ नये याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे. राष्ट्रीय ध्वज हा  हाताने कातलेला, विणलेला अथवा मशीनव्‍दारे तयार केलेला  कापडी, खादी, पॉलिस्टर किंवा लोकरीपासून तयार केलेला असावा. प्लास्टिक किंवा कागदी झेंडा फडकवू नये. तिरंग्याचा आकार हा 3:2 या प्रमाणात राहील असा असावा. तिरंग्याचा केशरी रंग हा वरच्या बाजूला आणि हिरवा रंग हा खालच्या बाजूला असावा. राष्ट्रध्वज स्तंभाच्या वरच्या टोकाला लावावा. त्या ध्वजावर इतर कोणताही ध्वज सोबत लावू नये. राष्ट्रध्वज लावताना इतर सजावटी वस्तू लावू नये. राष्ट्रध्वजावर कोणतेही अक्षर किंवा चिन्ह लिहू नये तसेच स्तंभाच्या वर आणि आजूबाजूला काहीही लावू नये. राष्ट्रध्वज कुठल्याही प्रकारे फाटलेला मळलेला अथवा चुरगळलेला असू नये. तसेच राष्ट्रध्वजाचा कुठल्याही प्रकारे तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून वापर करू नये. ध्वज फाटणार नाही याची काळजी घ्यावी. राष्ट्रध्वज उतरताना पूर्ण सन्मानाने आणि सावधतेने उतरवावा. राष्ट्रध्वज उतरल्यानंतर त्याची व्यवस्थित घडी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. आपला राष्ट्रध्वज तिरंगा हा आपला अभिमान आणि अस्मिता असल्‍याचेही  वर्षा ठाकूर-घुगे म्‍हणाल्‍या. 


*चौकट*

*तिरंगा झेंडा खरेदी बाबत नियोजन करावे- जिल्‍हाधिकारी विपीन इटनकर*


जिल्ह्यातील आवश्यक घरांची संख्या लक्षात घेऊन त्या दृष्टीने स्थानिक विक्रेते व पुरवठादार यांच्याशी संपर्क करून तिरंगा झेंडा खरेदी बाबत सरपंच व ग्रामसेवकांनी नियोजन करावे असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी विपीन इटनकर यांनी केले. ते म्‍हणाले, जिल्ह्यातील महिला बचत गटांना सुद्धा याबाबत प्रशिक्षण देऊन तिरंगा झेंडा निर्मिती करण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्‍यात. ग्रामसभा घेवून ग्रामस्‍थांना हर घर झेंडा उपक्रमाची माहिती द्यावी असेही त्‍यांनी सांगितले.


*चौकट*

*4 लाख 94 हजार घरांवर तिरंगा*

हर घर तिरंगा उपक्रमासाठी ग्रामीण भागात 4 लाख 94 हजार घरांवर तिरंगा फडकवण्याचा संकल्प असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. यासाठी शाळा महाविद्यालयांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शाळा व महाविद्यालय स्तरावर हर घर तिरंगा उपक्रमाबाबत चर्चासत्र, स्पर्धा, शिबिरे घेऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी दिली.


*चौकट-* हर घर तिरंगा उपक्रम चांगल्‍या प्रकारे साजरा करुन प्रत्‍येकांना तिरंगा झेंडा देण्‍यासाठी ग्रामपंचायत नियोजन करत असल्‍योच पेनुर येथील सरपंच ज्ञानेश्‍वर गवते यांनी सांगीतले. बरबडा येथील सरपंच माधव कोलगणे यांनी तिरंगा झेंड्यासाठी निधी संकलन करण्‍यात येत असल्‍याचे सांगीतेल. सरपंच सुनंदा गाडेकर यांनी हर घर तिरंगा उपक्रमात प्रत्‍येक घरावर महिलांच्‍या हस्‍ते तिरंगा लावणार असल्‍याचे सांगीतले.


Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...