Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने लोह्यात अण्णा भाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी

 


लोहा, नांदेड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी.आंबेगावे, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त लोहा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने शासकीय विश्रामगृह लोहा येथे दिनांक १८ जुलै २०२२ रोजी दुपारी तीन वाजता अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी लोहा नगरपालिकेचे गटनेते करीम भाई शेख, नगरसेवक नबीभाई शेख, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सतिश भाऊ आनेराव, रिपब्लिकन सेना मराठवाडा सदस्य अनिल दादा गायकवाड, स्वाभिमानी भीमसेनेचे लोहा विधानसभा अध्यक्ष विलास सावळे, सामाजिक कार्यकर्ते तथा मातंग समाजाचे नेते बाबुराव टोम्पे आदी मान्यवर प्रमुख अतिथीच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. सर्व प्रमुख मान्यवरांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश झोत टाकला. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव सोनकांबळे, तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार, पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष मोहन पाटील पवार, तालुका उपाध्यक्ष संजय कहाळेकर, सचिव मारुती पाटील चव्हाण, कोषाध्यक्ष रमेश पाटील पवार, सहकोषाध्यक्ष संतोष तोंडारे, प्रसिद्धी प्रमुख तथा आयोजक शिवराज दाढेल, पत्रकार विनोद महाबळे, सह पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विलास सावळे यांनी तर आभार तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

सेवा फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

  अदिलाबाद:- सेवा फाऊंडेशन यांच्या तर्फे ता.१ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक सिराज भाई आदिलाबाद कर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सय्यद नदीम आसिफ भाई लाईफ सेल क्लिनिकल लॅब किनवट यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सेवा फाऊंडेशन आदिलाबाद जिल्हा टीमनी उत्कृष्ट असे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजन केले यावेळी 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी  जिल्हाध्यक्ष सय्यद नदिम यांनी स्वतः रक्तदान केले व युवकांना प्रोत्साहन दिले यावेळी  रिम्स डायरेक्टर डॉक्टर जयसिंग राठोड,डॉक्टर नरेंद्र राठोड ऍडिशनल डी एम एच ओ डॉक्टर गजानंद लॅब,मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारसनाथ सेवा फाऊंडेशन प्रेसिडेंट खाजा सिराजुद्दीन ,शफिक अहमद ,अथेर इमरान , असलम खान शेख इस्माईल ,तबरेज खान , अहमद हाफिज समीर मोहम्मद नावेद रिजवान खॉन, मो. समीर खॉन मोहमद सलीम, खान मोहमद, असीफ इच्चोडा, सामाजिक कार्यकर्ता इकबाल पटेल, अबु तल्हा, शेख मशीर, शेख मेहबूब तसेच सेवा फाऊंडेशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते