Skip to main content

मराठवाड्यासह किनवट तालुक्यात मुसळधार पाऊस


सौजन्य- सम्यक सर्पे

किनवट,दि.(प्रतिनीधी) :  तालुक्यात  रविवारी (दि.10) सकाळपर्यंतच्या 24 तासांत खर्‍या अर्थाने मान्सून सक्रिय झाल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तालुक्यातील एकूण नऊ मंडळात दमदार पाऊस बरसला असून, शिवणी मंडळात सर्वात जास्त मुसळधार पाऊस कोसळल्याने तिथे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तालुक्यातील नऊ मंडळातील एकूण पाऊस 449.80 मि.मी.झाला असून, त्याची सरासरी 49.98 अर्थात 50 मिलिमीटर आहे.  पैनगंगा दुथडी भरून वहात असल्यामुळे, काठालगतच्या शेतात पाणी शिरून पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे कळते. पूर परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून असून सर्व विभाग सतर्क झाले आहेत.


रविवारी सकाळी संपलेल्या गत 24 तासात किनवट तालुक्यातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे असून,  कंसात 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय एकूण पावसाची नोंद दिलेली आहे.  किनवट- 58.3 (327.4 मि.मी.); बोधडी- 58.3(403.3 मि.मी.); इस्लापूर- 50.0(490.0 मि.मी.); जलधरा- 48.0 (417.1 मि.मी.); शिवणी- 102.5 (475.9 मि.मी.); मांडवी- 24.8(252.6 मि.मी.);  दहेली- 24.8 (251.0 मि.मी.), सिंदगी मो. 58.3 (253.4 मि.मी.); उमरी बाजार 24.8 (280.4 मि.मी.).तालुक्यात जुलैच्या पहिल्या दिवसापासूनच दररोज हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यात काही भागात दमदार कोसळलेल्या पावसामुळे पहिली अतिवृष्टी जलधरा मंडळात, दुसरी इस्लापूर मंडळात तर आजच्या नोंदीनुसार तिसरी अतिवृष्टी शिवणी मंडळात झालेली आहे. तालुका सध्यातरी पाणीदार झाला असून, अतिवृष्टीमुळे कुठे जिवित हानी झाल्याची बातमी सध्यातरी नाही. मात्र, किनवट पासूनच जवळच असलेल्या कोठारी नाला पावसामुळे तीन दिवसापासून दुथडी भरून वहात असल्यामुळे वाहतूक तीन दिवसापासून बंद असून, त्या भागातील  शनिवारपेठ, मदनापूर,भुलजा,पार्डी बु, येंदा-पेंदा एकूण बारा गावाशी गेल्या तीन  दिवसापासून संपर्क तुटला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तालुक्यात एक जूनपासून नऊ मंडळात मिळून आजपर्यंतचा पडलेला एकूण पाऊस 3,151.1  मि.मी.असून, त्याची सरासरी 350.12 मि.मी.येते.  आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक पाऊस इस्लापूर मंडळात झाला असून, सर्वात कमी दहेली मंडळात झालेला आहे. तालुक्यात रविवार 10जुलै पर्यंत पडणारा अपेक्षित सरासरी पाऊस  285.4  मि.मी.असून, त्या तुलनेत 122.68 टक्के पाऊस पडलेला आहे. जो की,  समाधानकारक आहे.


     01जून ते 30 सप्टेंबर या चार महिन्यादरम्यान तालुक्यात पडणारा वार्षिक पाऊस 951.90  मि.मी. असून, या तुलनेत आतापर्यंत तालुक्यात 36.78 टक्के पाऊस पडलेला आहे. तसेच 01 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान किनवट तालुक्यात पडणारा वार्षिक पाऊस 1026.58 मि.मी.असून, या तुलनेत आतापर्यंत तालुक्यात 34.10 टक्के पाऊस पडलेला आहे. मागील वर्षी आजच्या दिवसापर्यंत पडलेला पाऊस  375.90 मि.मी.पडला होता.  30 सप्टेंबर पर्यंतच्या वार्षिक पावसाच्या तुलनेत  त्याची टक्केवारी 131.71 होती.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...