Skip to main content

अंतर मनाचा प्रकट हुंकार- शिवशाहीर अण्णाभाऊ साठे

 


अण्णाभाऊ साठे हे एक समाजसुधारक तर होतेच याचसोबत ते एक साहित्यिक,लेखक,कांदंबरीकार,देखील होते.

ज्या जमातीवर ब्रिटीश राजवटीच्या काळात अपराधी म्हणुन शिक्का मारण्यात आला होता अशा घराण्यात अण्णाभाऊंचा जन्म झाला.

अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 आँगस्ट रोजी सांगली जिल्हयामधील वाळवा नावाच्या तालुक्यात असलेल्या वाटेगाव ह्या छोटयाशा गावी एका आदीवासी मांग कुटुंबात झाला.

अण्णाभाऊंचे पुर्ण नाव हे तुकाराम भाऊराव साठे असे आहे. यांच्या आईचे नाव वालुबाई अणि वडिलांचे नाव भाऊराव असे होते.अण्णाभाऊ साठे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव कोंडाबाई अणि तिच्या निधनांनंतर त्यांनी जयवंता हिचेशी विवाह केला.

अण्णाभाऊ साठे यांच्या मुलाचे मधुकर असे नाव होते आणि मुलींचे नाव शांता तसेच शकुंतला असे होते.

अण्णाभाऊ साठे जेव्हा त्यांच्या वडिलांसमवेत लहान असताना मुंबई मध्ये गेले तेव्हा तिथे त्यांनी गिरणीत झाडु मारणे कोळसे वेचणे असे मिळेल ते काम केले.

त्यांनी छ.शिवाजी महाराज यांच्यावर अनेक पोवाडे रचले म्हणुन त्यांना शिवशाहीर असे देखील म्हटले जाते.

अण्णाभाऊ साठे यांना आर्थिक परिस्थितिमुळे त्यांचे शालेय शिक्षण पुर्ण करता आले नव्हते.तरी देखील त्यांना अक्षराची ओळख होती.

“माझी  मैना गावाकड ऱ्हांयली , माझ्या जीवाची होतीया काह्यली" या सारख्या ठसकेबाज लावण्या आणि ‘फकीरा','वारणेचा वाघ',' माकडी ची माळ','मास्तर ‘

 'आबी' आणि ' वैजयंता' यांसारख्या त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या समाज मनाचा ठाव घेणार्या आहेत. त्यांच्या अंतर मनाचा तो प्रकट हुंकार आहे. समाज परिवर्तनाचा विचार मांडणारा हा साहित्यिक स्वातंत्र चळवळी च्या जनसागरात गुंतलेला लढाऊ माणूस अण्णांनी आपल्या लेखणीतून उभा केला. ग्रामीण, पददलित, आणि लाचारीचे जिने जगणारी माणसे त्यांनी आपल्या खास शैलीत उभी केली.

 कादंबर्या, नाटके,  लोकनाट्ये, कथा संग्रह आणि सात चित्रपट कथा लिहिणार्या अण्णाभाऊंनी फक्कड लावण्याही लिहिल्या. शाहीर गवानकरांच्या ‘ लालबावटा ‘ कलापथकां द्वारा अनेक तमाशेही केले.जगण्यासाठी लढणार्या माणसांचे चित्रण करणार्या अन्नाभाउंनी “मुंबई नगरी बडीबांका,जशी रावणाची लंका वाजतोय डंका चौहुमुलुखी”अश्या शब्दात मुंबईचे चित्र रेखाटले.

"फकिरा" ही त्यांची विशेष गाजलेली कादंबरी ज्यात त्यांनी मांग समाजाचे जीवन चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे.

या कादंबरीचा मुख्य नायक फकिरा हा मांग समाजातील शुर व्यक्ती असतो जो दुष्काळात ब्रिटीश राज्यकर्त्यांना लुटतो अणि तीच लुटलेली संपत्ती चोरलेले अन्न गरीबांना वाटुन देतो.

त्यांच्या ह्या कांदबरीस राज्य शासनाकडुन सर्वोत्कृष मराठी कादंबरी म्हणुन गौरविण्यात तसेच सम्मानित करण्यात आले होते.

"माझा रशियाचा प्रवास" हे प्रवासवर्णन देखील अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले आहे.याचसोबत त्यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर चरित्रलेखन देखील केले.ज्याचे पुढे जाऊन त्यांनी रशियन भाषेमध्ये देखील रूपांतरण केले.

अण्णाभाऊंनी  निर्माण केलेल्या प्रत्येक साहित्य प्रकारातुन सामाजिक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

त्यांनी त्यांच्या रचलेल्या सर्व लावणी,पोवाडया मार्फत कष्टकरी जनतेच्या जीवनात सुधारणा घडवून त्यांना प्रेरीत करण्याचा प्रयत्न केला.म्हणून जगाने त्यांना लोकशाहीर ही उपाधी दिली.

स्वातंत्र्याच्या आधी तसेच स्वातंत्र्यानंतर देखील अण्णाभाऊ साठेंनी अनेक महत्वाच्या राजकीय प्रश्नांच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये जनजागृती देखील केली.

अण्णाभाऊ साठे यांनी तमाशा ह्या लोककलेस लोकनाट्य असा दर्जा प्राप्त करून दिला.

भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कार्यात अण्णाभाऊ साठे यांचे देखील विशेष योगदान होते.त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतुन तसेच गोवा मुक्ती संग्रामामध्ये त्यांचा विशेष सहभाग होता.

अण्णा भाऊ साठे यांची " वैजयंती " ह्या कादंबरीतून ज्या स्त्रिया तमाशामध्ये पहिल्यांदा काम करतात त्यांचे लोकांकडुन कसे शोषण करण्यात येते हे चित्रित केले आहे.

 "माकडाची माळ" ह्या कादंबरीतुन भटक्या विमुक्त जातीच्या  जीवनाचे चित्रण केले आहे.

शेवटी, अण्णाभाऊ ह्या थोर समाजसुधारकाचा,लोकशाहीर तसेच साहित्यिकाचा अखेरीस 1969 मध्ये 18 जुलै रोजी प्राणज्योत मावळली.



लेखीका :रूचिरा बेटकर नांदेड

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.