Skip to main content

जिल्‍हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची 28 जुलै रोजी आरक्षण सोडत




नांदेड  दि. 27 :- राज्‍य निवडणूक आयोगाकडील आरक्षण सोडत सुधारीत कार्यक्रमानुसार नांदेड जिल्‍हा परिषद सदस्‍य पदासाठी आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. ही सोडत गुरुवार 28 जुलै 2022 रोजी डॉ. शंकरराव चव्‍हाण नियोजन भव‍नाच्या प्रेक्षागृहात  जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्‍यक्षतेखाली  सकाळी 11 वा. काढण्‍यात येणार आहे.

जिल्ह्यातील पंचायत समिती सदस्‍य पदांसाठीच्‍या आरक्षणाची सोडत तालुकापातळीवर काढण्यात येत आहे.  गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. किनवट, हदगाव, नांदेड, भोकर, धर्माबाद, बिलोली, कंधार व देगलूर तालुका मुख्‍यालयी तर माहूर, हिमायतनगर, अर्धापूर, मुदखेड, उमरी, नायगाव (खै), लोहा व मुखेड या तालुक्यांसाठी 28 जुलै रोजीच दुपारी 4 वाजता संबधित तहसिलदार यांच्याकडून संबधीत उपविभागीय अधिकारी यांच्‍या नियंत्रणात पंचायत समिती सदस्‍य पदांसाठीच्‍या आरक्षणाची सोडत काढण्‍यात येणार आहे. जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या नागरिकांना या सभेस उपस्थित राहण्याची इच्छा आहे त्यांनी नमूद ठिकाणी व वेळी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.



हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी  :

नांदेड जिल्‍हा परिषद व जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करण्‍याचा दिनांक 29 जुलै 2022 आहे. तर आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्‍हा परिषद आरक्षण / संबंधित तहसिलदार यांच्याकडे पंचायत समिती आरक्षणाबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी  29 जुलै ते 2 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, 1961 मधील कलम 12 उपकलम (1), कलम 58 (1)(अ) प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम, 1996 नुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिलाकरीता राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत.  


सोडतीचे ठिकाण व वेळ:

जिल्‍हा परिषद / पंचायत समितीचे नाव सभेची वेळ व तारीख, सभेचे ठिकाण पुढीलप्रमाणे आहे. नांदेड जिल्‍हा परिषदेसाठी गुरुवार 28 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. शंकरराव चव्‍हाण नियोजन भव‍न जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे. माहूर पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. पंचायत समिती सभागृह माहूर येथे. किनवट पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. पंचायत समिती सभागृह किनवट येथे. हिमायतनगर पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. पंचायत समिती सभागृह हिमायतनगर येथे. हदगाव पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. पंचायत समिती सभागृह हदगाव येथे. अर्धापूर पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. तहसिल कार्यालय सभागृह अर्धापूर येथे. नांदेड पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. उपविभागीय अधिकारी कार्यालय बैठक हॉल नांदेड येथे. मुदखेड पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. तहसिल कार्यालय मुदखेड येथे. भोकर पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. पंचायत समिती सभागृह भोकर येथे. उमरी पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. पंचायत समिती सभागृह उमरी येथे. धर्माबाद पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. नगरपरिषद सभागृह धर्माबाद येथे. बिलोली पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. पंचायत समिती सभागृह बिलोली येथे. नायगाव खै. पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. कै. बळवंतराव चव्हाण पंचायत समिती सभागृह नायगाव खै. येथे. लोहा पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. सभागृह तहसिल कार्यालय लोहा येथे. कंधार पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. पंचायत समिती सभागृह कंधार येथे. मुखेड पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी दुपारी 4 वा. बैठक हॉल तहसिल कार्यालय मुखेड येथे. देगलूर पंचायत समितीची सभा गुरुवार 28 जुलै रोजी सकाळी 11 वा. शंकरराव चव्हाण सभागृह पंचायत समिती देगलूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...