Skip to main content

किनवट येथील क्रिडा संकुलाची बिकट अवस्था , क्रिडा अधिकारी कायमस्वरूपी पाहीजे क्रिडा प्रेमींची मागणी


(किनवट शहर प्रतिनिधी):-

   शहरांमधील युवक व नागरिकांना मॉर्निंग वॉक, व्यायाम व बॅडमिंटन खेळण्याकरिता क्रीडा संकुलन असून या संकुलनची दयनीय अवस्था बनत चालली आहे . बॅडमिंटन इंनडोअर हॉलमधील दोन उडणकोट असून पूर्णपणे  निकामी झाले असल्याकारणाने आदिवासी दुर्गम भागातील युवक नागरिकांना खेळण्याकरीता उडनकोट किंवा पर्यायीकोट तयार करून देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन तालुकाक्रीडा संकुलन अधिकारी यांच्या मार्फत क्रीडा संकुलन सचिव तहसीलदार यांना न .पा. चे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक अभय महाजन यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी दिले आहे .
        याबाबत सविस्तर वृत्त असे की, किनवट शहरात सहायक जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या कार्यकाळात क्रीडा संकुलन उभारणी करण्यात आली होती . या क्रीडा संकुलांचा उपयोग अनेक नागरिक व व्यायाम करण्याकरीता युवक वर्ग घेत होते. बॅडमिंटन खेळण्याकरिता अनेक खेळाडू व कर्मचारी वर्ग इंन डोअर बॅडमिंटन कोट चा फायदा घेतात. परंतु आज या दोन्ही कोट ची दयनीय अवस्था झाली आहे. तर लाईटची सुविधा नाही. सर्व रिपर निघाल्यामुळे खेळताना त्यांचे पायस गंभीर दुखापत होण्याची भीती निर्माण झाली आहे. वारंवार या दोन्ही कोटची दुरुस्ती करण्याची मागणी करूनही यावर दुर्लक्ष केल्या जात आहे. येथे निकामी झालेल्या कोटवर बॅडमिंटनच्या अनेक स्पर्धा घेतल्या जातात. या क्रीडा संकुलन करिता क्रिडाधिकारी नियुक्ती असूनही त्यांची भेटत दुर्मिळ असल्याची जोरदार चर्चा होत आहे.
       क्रिडा संकुलन समितीचे अध्यक्ष आमदार तर  सचिव तहसीलदार यांची नियुक्ती असल्याने बॅडमिंटन खेळणाऱ्या खेळाडूंनी तहसीलदार यांना सीएनटी किंवा कोबाकोट तयार करून मिळणे बाबतचे लेखी निवेदन तालुका क्रीडा संकुलन अधिकारी यांना दिले आहे. बॅडमिंटन इंडोअर कोटची तात्काळ दुरुस्ती व लाईट लावून द्यावे अशी मागणी खेळाडूंमधून जोर धरत आहे. या निवेदनावर अभय महाजन, शिवाजी जाधव, प्रशांत कोरडवार, अनिल राठोड, संजय नेम्मानीवार, राजेश ठोंबरे, प्रमोद पोहरकर, शादाब शेख, सिडाम सर, चंदनकर, एडके, भोसले, बंडू राठोड, चंद्रशेखर व्यवहारे, दत्ता गिराम या खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...