Skip to main content

Posts

Showing posts from January, 2022

चेतन जाधव यांचे सामाजिक कार्य विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

 ता.किनवट चेतन जाधव यांचे सेट परीक्षेत यश ,किनवट पोलीस स्टेशन येथील रमेश जाधव (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ) यांचे चिरंजीव श्री.चेतन रमेश जाधव यांनी 26 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या सेट परीक्षेत सामाजिक कार्य विषयामध्ये यश संपादन केले.या यशाबद्दल किनवट पोलीस प्रशासन ,प्राध्यापक,लेक्चर तसेच वर्गमिञ यांनी अभिनंदन केले.

ना. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन शेख परवीन व जयश्री भरणे यांचा महिला कार्यकर्त्यासह काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश

किनवट श. प्रतिनिधी:  किनवट तालुक्यातील सामाजिक चळवळीतील धडाडीच्या कार्यकर्त्या व राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभाग प्रदेश सरचिटणीस शेख परवीन व राष्ट्रवादी युवती काँग्रेस पक्षाच्या जयश्री भरणे, भाजपा तालुका सरचिटणीस वंदना गादेकर यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते काँग्रेस पक्षामध्ये मुंबई येथे नुकताच प्रवेश केला आहे, यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रमिल नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती तर किनवट तालुक्यातील नुकत्याच झालेल्या काँग्रेस पक्षातील प्रवेशामुळे तालुक्यातील काँग्रेस पक्ष ना. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष बळकट होत असल्याचे चित्र दिसत आहे.

आदिवासी समाजाची कुलस्वामिनी माता जंगोरायताड चित्रपटचा उदघाटन सोहळा

 असिफाबाद: आदिवासी समाजाची कुलस्वामिनी माता जंगोरायताड, चित्रपटचा उदघाटन सोहळा  तेलंगाना राज्यातील कोटा परंदोली भीडवार गोंदी कुमराम भीम केरामिरी जिल्हा आसिफाबाद या ठिकाणी मोठया उत्साही वातावरणात पार पडला तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्यातून ट्रायबल सेवा न्युज चॅनल चे संपादक प्रणय कोवे होते .तर चित्रपटाचे उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाषजी कनाके यांच्या हास्ते करण्यात आले. ट्रायबल सेवा न्युज चॅनल चे स्वीय सहायक रमेश परचाके सर्व संगाजनाच्या च्या उपस्थितीत हा नयनरम्य उदघाटन सोहळा उत्साही वातावरणात पाडला.  चार हजार वर्षापूर्वीचा माता जंगोरायताड चा इतिहास प्रथमच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कुमराम भीम आर्ट्स या फाउंडेशन तर्फे या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. हा चित्रपट सलग अडीज तासाचा असणार आहे व हा चित्रपट तेलुगु, गोंडी, हिंदी  या तीन भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे  चित्रपटाच नाव आगीनधुड जंगोरायताड आहे.  या चित्रपटाचा निर्माता व्यंकटेश कुमरे, चित्रपट लेखिका हेमलता कुमरे, संगीतकार ,वेठ्ठी योदन, गायक केशव नैताम...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची उमरी तालुका कार्यकारिणी जाहीर

नांदेड, उमरी : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र या संघटनेची उमरी तालुक्याची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष उद्धव मामडे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली . प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी .टी.आंबेगावे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या आदेशानुसार, जिल्हाउपाध्यक्ष उद्धव मामडे रावधानोरकर यांच्या उपस्थितीत उमरी तालुक्याची नव्याने कार्यकारणी तयार करण्यात आली. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उमरी तालुकाध्यक्षपदी डी.जी. तुपसाखरे, तालुका उपाध्यक्ष प्रकाश कारलेकर, सचिव बळवंत पाटील थेटे, कोषाध्यक्ष राहुल सोनकांबळे सोमठाणकर, सहसचिव आनंदा राठोड, व्यवस्थापक पिराजी कराडे, सल्लागार आरीफ शेख, संघटक फेरोज पटेल, सदस्य हणमंत बेंद्रे, शंकर थेटे, कैलास सुर्यवंशी, शेळके यांच्यासह तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी सचिव बळवंत पाटील थेटे  म्हणाले की, वेळप्रसंगी पत्रकारावर हल्ला करणाऱ्याला माफ करणार नाही. या संघामध्ये सहभागी झालेल्या पत्रकारांना घ...

श्रीनिवास नेम्मानिवार यांच्या वाढदिवसानिमित्त समजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

 किनवट ता. प्र दि ३० भाजपा शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार यांच्या वाढदिवसा निमित्त किनवट शहरात समाजोपयोगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये भाजप च्या ज्येष्ठ पदाधिका-यांसह अनेक कार्यकर्त्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवुन कार्यक्रम यशस्वी केले. माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार यांच्या वाढदिवसा निमित्त प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपा तर्फे ई-सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली ज्या मध्ये नागरीकांना विविध दाखला सुविधा ना नफा ना तोटा या तत्वावर पुरवली जाणार असुन ज्याचे संचलन भाजपा कार्यकर्ता व विद्यार्थी परिषद चे विद्यार्थी करणार आहेत ज्यामध्ये सद्य स्थितीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी योजना असलेली ई-श्रम कार्य ची नोंदणी मुख्यत्वे केली जाणार आहे ज्यामध्ये भविष्यात आधार दुरुस्ती केंद्र, मतदान कार्ड नोंदणी केंद्र यांच्या सह विविध नागरी दाखल्यांच्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत. या निमित्त दिनांक २९ रोजी आयोजित कार्यक्रामाव्दारे बोलतांना भाजपाच्या ज्येष्ठ सदस्यांनी सांगितले कि भाजपा हा एक विचार आहे ज्यामध्ये लोककल्याण हा महत्वाचा भाग असुन भाजपा मध्...

वैधानिक विकास महामंडळाचे माजी सदस्य डॉ. अशोक बेलखोडे यांनी केले पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे अभिनंदन

  किनवट श.प्रतिनिधी :- किनवट तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण सेवेसाठी सिटी स्कॅन मशीन उपलब्ध होणार असल्याने व किनवट शहराच्या विकासासाठी जातीने लक्ष दिल्या बद्दल नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कॅबीनेट मंत्री अशोक चव्हाण यांचे  किनवटचे वैधानिक विकास महामंडळाचे  माजी सदस्य तथा साने गुरुजी रूग्णालय परिवाराचे प्रमुख डॉ. अशोक बेलखोडे यांनी एका पत्रकाद्वारे त्यांचे अभिनंदन केले आहे कारण किनवट हे आदीवासी  तसेच प्रगति च्या दिशेने वाटचाल करणारा तालुका आहे किनवटचा परिपुर्ण विकास व्हावा अशी अपेक्षा डॉ. बेलखोडे यांनी केली आहे तसेच किनवट शहराच्या विकासासाठी प्रलंबीत प्रकल्पाची आवश्यकता आहे या मध्ये  १) सत्र न्यायालयाची स्थापना २) मंजुर झालेले कृषी महाविद्यालय ३) मागा स्वर्गीय व इतर मागा स्वर्गीय विद्यार्थ्यासाठी १०० क्षमतेच ४वस्तीगृह ४) नर्सिंग स्कूल ५)सिंचन प्रकल्प ६) रोजगार निर्मिती करीता एम .आय. डी .सी. विकास प्रकल्प याची मागणी त्यांनी केली आहे व उपजिल्हा रुग्णालयास पुर्णवेळ भुलतज्ञ, स्त्रिरोग तज्ञ, सिझेरीयन, रक्त साठा केंद्र, अति दक्षता बाल विभाग, हृदय रुग्णा करीत...

देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई करावी अशी टिपु सुलतान ब्रिगेड ची मागणी

 धर्माबाद: राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनी देशाचे पहिले स्वातंत्र्यसैनिक शहीद टिपु सुलतान यांच्या विषयी अपशब्द वापरुन त्यांचा अपमान केला. यांबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी टिपू सुलतान ब्रिगेड धर्माबाद तर्फे उपविभागीय कार्यालय धर्माबाद येथे निवेदन देऊन करण्यात आली.         निवेदन मध्ये म्हटले आहे की, मुंबई येथील मालाड मध्ये बांधन्यात आलेल्या मैदानास टिपु सुलतान यांचे नाव देण्यात आले. खरेतर अगोदर पासुनच त्या मैदानाचे टिपु सुलतान हे नाव होते. परंतु भाजप व त्यांच्या सहयोगी संघटनांनी जाणून-बुजून देशाचे पहिले स्वातंत्र्य सैनिक व इंग्रजां विरोध लढता लढता वीरमरण पत्करणारे एकमेव राजा टिपू सुलतान यांच्या नावावरून वाद सुरू केला. टिपू सुलतान यांच्याबद्दल अवमानकारक भाषेचा वापर करण्यात आला.         राज्यघटनेमध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्या सोबतच टिपू सुलतान यांचा फोटो लावलेला आहे. महामहीम राष्ट्रपती रामनाथ गोविंद साहेबांनी कर्नाटक विधानसभेत टिपुसुलतान यांच्याबद्दल गौरवोद्गार काढ...

टिपु सुलतान यांच्या विषयी अपशब्द काढुन सामाजिक भावना दुखावल्या बद्दल फडणवीसवर कारवाई करा टिपु सुलतान ब्रिगेडची मुख्यमंञ्याकडे मागणी

  उमरी/ सय्यद नदीम. राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनी देशाचे पहिले स्वातंत्र्यसैनिक शहीद टिपू सुलतान यांच्या विषयी अपशब्द वापरून त्यांचा अपमान केला.या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी टिपु सुलतान ब्रिगेडच्या वतीने तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .  मुंबई येथील मालाडमध्ये बांधण्यात आलेल्या मैदानास टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले.  खरेतर अगोदरपासूनच त्या मैदानाचे टिपू सुलतान हे नाव होते. परंतु भाजप व त्याच्या सहयोगी संघटनांनी जाणून बुजून देशाचे पहिले स्वातंत्र्य सैनिक व इंग्रजा विरोध लढता-लढता वीर मरण पत्करणारे एकमेव राजा टिपू सुलतान यांच्या नावावरून वाद सुरू केला.  टिपू सुलतान यांच्या बद्दल अवमानकारक भाषेचा वापर करण्यात आला. राज्यघटनेमध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबतच टिपू सुलतान यांचा फोटो लावलेला आहे. महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद साहेबांनी कर्नाटक विधानसभेत टिपू सुलतान यांच्या बद्दल गौरवोद्गार काढले आहेत. या सर्वांचा देवेंद्र फडणवीस, भाजप व त्याच्या सहय...

सेवा क्लीनिक सेंटरचे" उद्घाटन किनवट चे माजी नगराध्यक्ष हाजी ईसाखान सरदार खान यांच्या हस्ते संपन्न

  किनवट/सय्यद नदीम  आज दिनांक 28 जानेवारी 2022 रोजी किनवट येथील धनराज टॉकीज जवळ "सेवा क्लीनिक सेंटरचे" उद्घाटन किनवट चे माजी नगराध्यक्ष हाजी ईसाखान सरदार खान यांच्या हस्ते संपन्न झाले. गेल्या दोन वर्षापूर्वी कोरोना व्हायरस ने  हाहाकार माजला असताना किनवट शहरांमध्ये डॉक्टरची कमतरता भासू लागली यात नव्यानेच डॉक्टर की च्या या व्यवसायात पदार्पण केले डॉक्टर शेख राहील यांच्या दवाखान्याचे आज उद्घाटन करण्यात आले.   या प्रसंगी पत्रकार शकील बडगुजर, हबीब चव्हाण, शेख शेख चाँद रतन जी, गब्बर काजी, पत्रकार आशिष शेळके, आनंद भालेराव,  गंगाधर कदम,सय्यद नदीम आणि उर्दू स्कूलचे शिक्षक वर्ग, डॉक्टर्स, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  याप्रसंगी डॉक्टर राहील म्हणाले की, किनवट सारख्या दुर्गम भागांमध्ये डॉक्टरची गरज असून माझे ही जन्मभूमी आहे. या परिसरात मला सेवा करण्यासाठी ची संधी या ठिकाणच्या नागरिकांनी दिली त्याबद्दल नागरिकांचे ही त्यांनी आभार मानले.

स्वा. सै.टिपु सुलतान यांच्या बाबत अपशब्द वापरल्या बद्दल देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई करावी.... अन्यथा आंदोलन टिपु सुलतान ब्रिगेडचा इशारा

  ✍🏽 राजेश पाटील प्रतिनिधी: किनवट : राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनी देशाचे पहिले स्वातंत्र्यसैनिक शहीद टिपु सुलतान यांच्या विषयी अपशब्द वापरुन त्यांचा अपमान केला. यांबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी टिपू सुलतान ब्रिगेड किनवट तर्फे उपविभागीय कार्यालय किनवट येथे निवेदन देऊन करण्यात आली.         निवेदन मध्ये म्हटले आहे की, मुंबई येथील मालाड मध्ये बांधन्यात आलेल्या मैदानास टिपु सुलतान यांचे नाव देण्यात आले. खरेतर अगोदर पासुनच त्या मैदानाचे टिपु सुलतान हे नाव होते. परंतु भाजप व त्यांच्या सहयोगी संघटनांनी जाणून-बुजून देशाचे पहिले स्वातंत्र्य सैनिक व इंग्रजां विरोध लढता लढता वीरमरण पत्करणारे एकमेव राजा टिपू सुलतान यांच्या नावावरून वाद सुरू केला. टिपू सुलतान यांच्याबद्दल अवमानकारक भाषेचा वापर करण्यात आला.         राज्यघटनेमध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्या सोबतच टिपू सुलतान यांचा फोटो लावलेला आहे. महामहीम राष्ट्रपती रामनाथ गोविंद साहेबांनी कर्...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने अनाथ आश्रमात प्रजासत्ताक दिन साजरा

   पुणे, पिंपरी चिंचवड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने अनाथ आश्रमात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. लहान मुले म्हणजे देशाचे भविष्य घडवणारी पिढी या अनुषंगाने प्रजासत्ताक दिनाचे महत्व जाणून बालगोपालांसमवेत आनंदाचे वातावरण निर्मिती करण्याच्या उद्देशाने हा प्रजासत्ताक दिन चिखली येथील विकास अनाथ आश्रमात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री राजन नायर, पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्षा सौ. मंदाताई बनसोडे, डॉ. संगीता उके, मंगला जैन, कु. बिना जैन, मनोज कुमार ठाकूर आणि प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडचे पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलांना प्रजासत्ताक दिनाची माहिती सांगण्यात आली. खेळीमेळीच्या वातावरणासह मुलांना बिस्किटे, फळ देऊन आश्रमातील मुलांबरोबर हा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुलांशी हितगुज करण्यात आले. यावेळी स्टार बुक ऑफ रेकॉर्ड म्युझीक मध्ये नोंद झालेली (दिव्यांग) बिना जैन हिने वाद्यवृंदावर (सिंथेसायझर) गाणी वाजवून वातावरण संगीतमय केले. त...

प्रा. डॉ. राजु मोतेराव यांच्या मातोश्री सुमनबाई श्रावण मोतेराव यांचे अल्पशा आजाराने निधन

  किनवट:- सरस्वती अध्यापक महाविद्यालय किनवटचे प्रा डॉ. राजू मोतेराव यांच्या मातोश्री कालवश सुमनबाई श्रावण मोतेराव यांचे अल्पशा आजाराने आज दुपारी 1:30 वाजता निधन झाले त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी 5:00 वाजता त्यांच्या गावी शिरपूर येथे होणार आहे. तीन मुले,सुना, नातवंडे असुन सरस्वती अध्यापक महाविद्यालय किनवट येथील प्रा. डॉ.राजू मोतेराव यांच्या त्या मातोश्री आहेत.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ हदगांवच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त गरजूना जीवनाशक किटचे वाटप

हदगांव,नांदेड :  नांदेड जिल्ह्यातील हदगाव शहरातील वाणवाडी नगर येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, हदगांवच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त अंध व अपंग परिवाराला दाळ, तांदुळ, साखर, तेल, आटा बॅग व इतर सर्व  जीवनाशक वस्तूचे वाटप करण्यात आले. ज्यामध्ये अपगं, अंध व्यक्ती नारायण मानसिग सळवणे, लक्ष्मीबाई सातेने व राम मानसिग सळवणे हे अतिशय गरीब असून त्यांची परिस्थिती खूप हलाखीची आहे याची जाण ठेवून जिल्हा परिषद सदस्य गजानन गंगासागर व होमगार्ड गणेश गीरबिड़े यांच्या सहकार्याने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ हदगाव  तर्फे या परिवाराला किट देण्यात आल्या. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बेघर, अंध,अपगं, विधवा आदी  गरजूंना जीवनाशक वस्तू देण्यास पुढाकार या संघटनेने घेतला असून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही हा उपक्रम घेण्यात येत असून तालुक्यातील व शहरातील नागरिकांच्या घरकुल, निराधार, श्रावण बाळ, आदी विविध योजनेसाठी समस्या सोडवण्याचे काम प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ हदगांव तालुक्याच्या वतीने करण्यात येत आहे जीवनाशक वस्तू वाटप प्रसंगी नांदेड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मामीडवार, जिल्ह...

गांधी नगर वासीयांचे शोध निवारा आदोंलनाने किनवट न. प. प्रशासन नरमले

  किनवट शहर प्रतिनिधी:- ॲड. आकांक्षा आळणे व विस्थापित गांधी नगर वासींयाकडुन ४ जानेवारी पासुन साखळी उपोषण सुरु आहे या उपोषणास आज २२ दिवस झाले त्याच आदोंलना अंतर्गत आज दिनांक २४ रोजी निवारा शोध आदोंलन करण्यात आले . ३० नोव्हेंबर२१ रोजी झालेल्या घरावर हातोडा पडला होता तेंव्हा पासुन गांधी नगरचे नागरिक निवारा शोधत आहे.  न.प. प्रशासनाने पिडितांना ६०० स्केअर फुट जागा देऊन त्वरीत घरे बांधुन द्यावी अशी मागणी आहे  या आदोंलनाचे नेतृत्व समाज सेविका तथा रॉ. कॉ. युवती तालुका अध्यक्ष ॲड. आकांक्षा आळणे करीत आहे या वेळी माजी नगराध्यक्ष अरुण आळणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जहीर खान, सुरेश मुनेश्वर, निखील वाघमारे, जीवन लाठे आदी उपस्थित होते यावेळी नगर परिषद किनवटचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी गांधी नगर वासीयांना लवकरच जागा उपलब्ध करून देऊ व घरे बांधुन देवु त्यासाठी आम्ही बांधील आहोत या करिता नगर परिषद प्रशासनास दोन महिन्याचा कालावधी द्या असे आश्वासन दिले . या आदोंलनात २६ कुंटुबासह गांधी नगरवासी महिला पुरुष, बालके  सहभागी होते. या वेळी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

गांधी नगर पुनर्वसनाची न्यायिक मागणी, निवाराशोध आंदोलन - एक दृष्टीक्षेप ॲड. सचिन दारवंडे यांचा विशेष लेख

गांधी नगर पुनर्वसनाची न्यायिक मागणी, निवाराशोध आंदोलन -  एक दृष्टीक्षेप  "The hottest place in Hell is reserved for those who remain neutral in times of great moral conflict.                         Dr. Martin Luther King, Jr. किनवट प्रशासनाने स्मशानाच्या भिंतीचे स्वरक्षण करून, तेथील मुडद्याना शांत झोपी देऊन, जिवंत हाड- मास असलेल्या गांधी नगर येथील माणसाच्या घरावर कडाक्याच्या थंडीत अन महामारीच्या काळात  बुलडोझर फिरवून किनवट प्रशासनाने त्यांना अन्यायकारकपणे बेघर केले आहे.  आज गांधी नगरच्या लोकांना बेघर करून दोन महिने होत आहेत. मागील दोन महिन्यात त्या लोकांचे काय हाल झालेत यांचा आढावा घेणे गरजेचे आहे. निसर्ग माणसांवर कोपतो हे सर्वज्ञात आहे,परंतु निसर्गाने मागील दोन महिने त्या लोकांचा छळ केला आहे. भर दिवसा नभात ढग आणि घराचे दरवाजे बंद करून अंथरून घेऊन बसावे अशी रक्त गोठवणारी थंडी. प्रश्न असे आहेत या लोकांनी दोन महिने कसे काढले असेल? घरात लाईट गेली तर रात्र भर मानस जागून काढतात ही लोक अंधारात कसे राहत असतील? T. ...

अटकपूर्व जामीन म्हणजे काय ?।। अटकपूर्व जामीन कसा मिळवतात?

   जामीन हा संविधानिक म्हणजे वैधानिक नियम आहे तसेच कारावास म्हणजे जेल अपवाद आहे.आपण बघतो की दररोज वृत्तमान पत्रामध्ये कोणाला ना कोणाला अटक झाल्याच्या बातम्या येत असतात. कुणीतरी कुणावर राजकीय कुरघोडी करण्यासाठी अटक करतात तर कोणीतरी कोणाची सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करतात. सरकारला आणि तपास यंत्रणांना नागरिकांना अटक करण्याचे अधिकार आहेत, परंतु नागरिकांना देखील दुसरीकडे भारतीय राज्यघटनेनुसार प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अटकपूर्व जामीन तसेच जामीन हा नियम फौजदारी प्रक्रिया संहिता मध्ये नमूद करण्यात आला आहे.  अटक करण्यासंबंधी तरतुदी घटनेशी संबंधित आहेत, परंतु तरीदेखील कुणालाही अनिर्बंधपणे अटक केल्यावर त्या माणसाची प्रतिष्ठा धुळीस मिळते आणि त्याला समाजामध्ये एक प्रकारचा कलंकित व्यक्ती म्हणून समजले जाते. आणि म्हणूनच नागरिकांची प्रतिष्ठा अबाधित राहण्यासाठी म्हणून सीआरपीसी मध्ये अटकपूर्व जामीनाची तरतूद केली गेली. त्यासंबंधित तरतूद केली गेली आणि सरकारने नागरिकांना विनाकारण अशा पद्धतीने व्यक्तीची प्रतिष्ठा धोक्यात येण्यासाठी कोणीही कोणाला अटक करू शकणार न...

विनापरवाना अवैधरित्या दारू विक्रेत्याला तीन वर्षे सश्रम कारावास व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा..

  किनवट (तालुका प्रतिनिधी) एखादा व्यवसाय करणे हे जसे सरकार थांबू शकत नाही म्हणजेच  दारू निर्मिती करणे ही बाब सरकार थांबवू शकत नाही. परंतु जनता व पोलीस एखादी गोष्ट जर बेकायदेशीर असेल तर निश्चितच थांबू शकतात हे आज माहूर येथील न्यायालयाने दिलेल्या निकाला वरून निश्चित झाले आहे. अवैधरित्या देशी दारूची पानटपरीवर दारू विकनाऱ्या इसमाला माहूर न्यायालयाने तीन वर्ष सश्रम कारावास व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा दिनांक 12 /10/ 2019 रोजी अंदाजे 18;20 वाजता पान टपरीवर अंजनखेड तालुका माहूर येथे 15 बॉटल विनापरवाना विक्रीच्या उद्देशाने ताब्यात ठेवल्याने तसे सरकार पक्षातर्फे  सरकारी विधिज्ञ श्री डी एस भारती यांनी सिद्ध केल्याने व विद्वत्तापूर्ण युक्तिवाद सादर केल्याने तसेच आरोपीचे वकील श्री एस.एस.राठोड यांचे युक्तिवाद ऐकून घेऊन आरोपी श्री प्रभाकर गंगाराम पडलवार यांना माहू न्यायदंडाधिकारी साहेबांनी तीन वर्ष सश्रम कारावास व 25 हजार रुपये दंडाची तसेच सदर दंड न भरल्यास साध्या सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा दिनांक 21/1/20220 रोजी सुनावली त्यामुळे किनवट/ माहूर विधानसभेतील अवैद्य दारू विक्रेत्या...

स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बळीराम पाटील महाविद्यालयतर्फे राष्ट्रीय चर्चासत्र

 ता. प्र. किनवट:- साहित्यिक हा संवेदनशील असतो.आपल्या प्रतिमा सामर्थ्याने उत्तम साहित्य निर्माण करतो. साहित्यातून सामाजिक वास्तव मांडणी करीत असतो. साहित्य हे मंनोरजनासाठी नसते तर ते वैचारिक, बोध  देणारे असते. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि बळीराम पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने, स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठी विभागाच्या वतीने आयोजित 'समकालीन मराठी साहित्य :स्वरूप आणि प्रेरणा ' या विषयावर एकदिवसीय आभासी राष्ट्रीय चर्चासत्राच्या उदघाटन प्रसंगी जोगेंद्रसिंह बिसेन - प्र. कुलगुरु स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड यांनी  व्यक्त केले. प्रारंभी थोर स्वतंत्र सेनानी, पूज्य वंदनीय स्वामी रामानंद तीर्थ, थोर समाजसुधारक,गोरबंजाराकार, स्मृतीशेष बळीराम पाटील, स्मृतीशेष उत्तमराव राठोड यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले.शब्द सुमनाने व सांस्कृतिक विभागाच्या वतीने स्वागतगीत सादर करुन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.पुढे बोलतांना डॉ. जोगेंद्रसिह बिसेन सर म्हणाले कि, समकालीन मराठी साहित...

रामस्वरूप मडावी यांचा 'काहूर' काव्यसंग्रह आदिवासी चळवळीचा ऐतिहासिक दस्तावेज ठरणार -प्रसिद्ध गझलकार मधु बावलकर

  किनवट : आदिवासी समाजाला गौरवशाली इतिहास आहे. अभ्यासून तो आपल्या  पिढी समोर आपण आणल पाहिजे. तसेच आपलं दुःख , वेदना व  समस्या साहित्यातून समाजासमोर आल्या पाहिजेत . म्हणूनच रामस्वरूप मडावी यांचा 'काहूर ' हा काव्यसंग्रह आदिवासी चळवळीचा ऐतिहासिक दस्तावेज ठरणार आहे. असे प्रतिपादन तेलंगणातील प्रसिद्ध गझलकार मधु बावलकर यांनी केले.            येथील जिल्हा परिषद (मुलांचे) हायस्कूल मधील संत तुकाराम महाराज सभागृहात रामस्वरूप लक्ष्‍मण मडावी यांच्या ' काहूर' या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध साहित्यिक , नामांतर शहीद पुत्र तथा महावितरण नाशिकचे उप कार्यकारी अभियंता डॉ. अभियंता विवेक मवाडे, महात्मा कबीर समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ऍड. मुकुंदराज पाटील, मुख्याध्यापक मोहन जाधव, निवृत्त पोस्ट मास्तर दौलतराव कोवे व कवि रामस्वरूप मडावी, पुष्पा मडावी हे  मंचावर उपस्थित होते.        ...

कायदा हे सामाजिक बदल घडवून आणण्याचे साधन आहे सा. न्या. वि. स. विभाग बार्टी आयोजित संविधान साक्षरता अभियाना प्रसंगी ॲड.सचिन भीमराव दारवंडे यांचे प्रतिपादन..*

  नांदेड प्रतिनिधी:-   सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ),पुणे समतादूत प्रकल्पच्या वतीने संविधान साक्षरता अभियान अंर्तगत  अस्पृश्यता निवारण - अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची गरज या विषयावर नांदेड जिल्ह्यातील  समतादूत  दिपाली हाडोळे यांनी ऑनलाईन झुम एप द्वारे प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.          या कार्यक्रमचे प्रमुख व्याख्याता मा. ॲड.सचिन  भीमराव दारवंडे यांनी आपले मत व्यक्त करताना असे म्हटले की , कायदा हे सामाजिक बदल घडवून आणण्याचे साधन आहे. कायाद्यामुळेच समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा जसे बाल विवाह, सती प्रथा, यांचे प्रमाण खूप कमी झाले आहे  समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी  भारतीय   संविधानातील अनेक कलमाचा अगदी थोडक्यात व समजले असे आपल्या व्याख्यांनातून उतबोधीत केले .    समाजात समता प्रस्थापित  करण्यासाठी अनुसूचित जाती जमाती कायद्याची अंमलबजावणी कायद्याने कडक करने किती गरजेचे आहे. युवकांनी जातीयतेच्या भींती...

'बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने एक दिवसीय आभासी राष्ट्रीय चर्चासत्र '

ता. प्र. किनवट:-   स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड व बळीराम पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठी विभागाच्या वतीने 'समकालीन मराठी साहित्य :स्वरूप आणि प्रेरणा 'या विषयावर एकदिवसीय आभासी राष्ट्रीय चर्चासत्र दिनांक 20 जानेवारी 2022रोजी सकाळी ठीक अकरा वाजता आयोजित करण्यात आले आहे. या राष्ट्रीय चर्चासत्राचे अध्यक्ष तथा किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड,उदघाटक जोगेंद्रसिंह बिसेन प्र-कुलगुरु स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड बीजभाषण प्रसिद्ध विचारवंत डॉ. केदार काळवणे, कळंब, प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर, भाषा वाडमय व संस्कृती अभ्यास संकुल तथा सदस्य मराठी भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र शासन, प्रसिद्ध विचारवंत डॉ.प्रल्हाद लुलेकर, ,प्रसिद्ध नाट्यलेखक प्रकाश त्रिभुवन,डाॅ.गणेश चंदनशिवे,प्रमुख,लोककला विभाग, मुंबई विद्यापीठ मुंबई , प्रा. डॉ.विनोंद कुमरे, डॉ. उर्मिला चाकूरकर, डॉ. गणेश मोहिते, डॉ. अरुण कुलकर्णी, डॉ. शंकर विभुते डॉ. संतोष हंकारे,हे 'समकालीन मराठी साहित्य...

किनवट येथील सुप्रसिध्द डॉक्टर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. उत्तम बी मोरे यांचे दु:खद निधन आज दुपारी २ वाजता घोटी येथे अंत्य संस्कार

  ता. प्र. किनवट:- किनवट येथील सुप्रसिद्ध डॉक्टर तथा  स्त्री रोग तज्ज्ञ,  सेवा निवृत  उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी  यांचे आज दिनांक१८. जाने.२०२२ रोजी सुमारे पहाटे ५:३० च्या दरम्यान हृदय विकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले त्यांचा अंत्यविधी दुपारी घोटी रोडवरील शेता मध्ये होणार आहे अशी माहिती परीवारा कडुन मिळाली त्यांनी मोरे नर्सींग होम या इस्पीतळाच्या माध्यमातुन अनेकांना आरोग्य सेवा दिली तसेच त्यांनी दोन वेळा जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे स्वागत अध्यक्ष पद देखील भुषवीले  ते किनवट मध्ये सर्वांना सुपरीचीत होते त्यांच्या जाण्याने किनवट तालुक्यात शोककळा पसरली आहे त्यांचे अंतिम दर्शन घेण्यास ग्रामीण भागातून लोक व परीसररातुन  येत आहे त्यांच्या पश्चात पत्नी,२मुली ,२ जावई, सुना नातवंडे असा परिवार , कुंटुबीयांना या दुखातुन सावरण्याची तथागत शक्ति देवो हिच प्रार्थना .

मांडवी येथे अवैध धंदे विरुद्ध धडक कारवाई

 इंद्रपाल कांबळे प्रतिनिधी मांडवी:-   दी.13/01/022 रोजी अन्न व औषध प्रशासन विभाग नांदेड यांच्या  कार्यालय द्वारे गुप्त माहितीच्या आधारे मांडवी येथील पवन गणेश राठोड यांच्या दुकानात रेडटाकून केलेल्या कारवाई मधे मुद्देमालासह  आरोपीसअटक करण्यात आली आहे.  महाराष्ट्र शासनास प्रतिबंधित केलेल्या अन्नपदार्थ पानमसाला सुगंधित तंबाखू गुटखा एकूण रुपये 38,600 चा मुद्देमाल जप्त केला. सदर दुकान पुढील आदेशापर्यंत शील करण्यात आले आहे याप्रकरणी विक्रेता पवन गणेश राठोड राहणार मांडवी .  शमी  अल्ला खान. साजित अल्हाखान, अस्लम खान  ,व अक्रम भटी सर्व राहणार आदिलाबाद यांच्याविरुद्ध भादवि कलम मांडवी येथे 188 .272. 273. 328 व अन्न सुरक्षा अधिकारी सतीश हाके यांच्या फिर्यादीवरून  गुन्हे दाखल करण्यात आली आहे.  सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी सतीश हाके,अन्न सुरक्षा अधिकारी श्री ऋषिकेश मरेवार यांनी प्रभारी सहाय्यक आयुक्त श्री रमेश कावळे यांच्या मार्गदर्शन केले.  मांडवी परिसरात अनेक खेडेगावांमध्ये गुटखा घरपोच बाईकवरून पुरवठा केला जातो हा लाखोचा गुटका व्यवसाय किराणा ...

नामांतर लढा आणि आम्ही पँथर.....

  किनवट : दलित पँथरची स्थापना जरी १९७२ ची असली तरी आम्हच्या  किनवटला  पोंहचली ती १९७४ साली.शहरातील हनुमान मंदिराला लागुनच आम्हची गल्ली आहे.जी पुर्वी "ईनकर गल्ली",म्हणून ओळखल्या जायायची गावातील सर्वजन आम्हाला "ईनकरोलू",म्हणायचे.नंतरच्या काळात भीमजयंती आम्हच्या गल्लीत साजरी करण्यात येऊ लागली.त्यानंतर मात्र आम्हची गल्ली "बौद्ध वाडा", म्हणून ओळखल्या जाऊ लागली.किनवटला रेल्वे कर्मचारी असलेले बळखंडे हे रेल्वे कर्मचाऱ्यांना एकत्र करून भीमजयंती साजरी करत असत.यामुळे त्यांच्या प्ररणेने आम्हच्या गल्लीत ही छोट्या प्रमाणात का होईना भीम जयंती साजरी होऊ लागली.माझ्या आठवणीप्रमाणे तो काळही १९७० नंतरचाच.त्या काळात आम्हच्या वार्डाचे नगरसेवक होते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पुंडलिक कावळे त्यांना मेंबर कुंडलिक म्हणूनच सर्व जन ओळखायचे.दुसरे एक कम्युनिस्ट पक्षाचे कट्टर कार्यकर्ते होते गंगाराम दगडू भरणे.त्यानंतर पुंडलिक कावळे यांचे छोटे भाऊ वामन कावळे हे ही सुरवातीच्या काळात कार्यकर्ते च होते.त्यांच्या पुढाकाराने गल्लीत भीमजयंतीची सुरुवात झाली.     १९७४ - ७५ साली बळीराम पाटील महाविद...

डॉ. अशोक बेलखोडे यांना मातृशोक , बेलखोडे परीवारानी केला देहदानाचा संकल्प जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय सावंगी मेघे वर्धा यांना देह सुपुर्द

  किनवट,ता.१२(बातमीदार) : बसस्थानका समोरील परिसरातील जेष्ठ नागरिक  शांताबाई वामनराव बेलखोडे(वय९१) यांचे काल(ता.११) रात्री साडे अकराच्या सुमारास वाजता  प्रदीर्घ आजाराने निधन झाले.    त्यांच्या पश्चात मुरलीधर, डॉ. अशोक, रिद्धिश्र्वर, केशव बेलखोडे आणि मुलगी सुरेखा बेलखोडे (आंबटकर) नातू डॉ. विक्रम बेलखोडे, अक्षय बेलखोडे, संकेत आंबटकर नात डॉ. भाग्यश्री बेलखोडे (वरटकर), युगा बेलखोडे (अगळे) डॉ. शिवाणी बेलखोडे असा मोठा परिवार आहे.     त्यांचे पार्थिव साने गुरुजी रुग्णालयात बुधवारी (ता.१२) सकाळी १० वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर वाहणाद्वारे त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र  मुरलीधर बेलखोडे , वर्धा यांच्या निवास स्थानी नेण्यात आले. बेलखोडे परिवाराच्या संकल्पा नुसार पार्थिव शरिर देहदान करण्यासाठीची सर्व कार्यवाही पूर्ण करून दुपारी ३ वाजता जवाहरलाल नेहरु वैद्यकीय महाविद्यालयाचे आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय,सावंगी(मेघे) वर्धा च्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. त्या साने गुरुजी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अशोक बेलखोडे यांच्या आई होत. #मिलि...

तळा ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सापडलेली सोन्याची चैन केली परत सरोश गोठेकरचे सर्वत्र कौतुक

तळा,रायगड : तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ तृप्ती थोरात यांची दीड तोळा सोन्याची चैन महाविद्यालयाच्या आवारात हरवली होती. कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेला सरोश गोठेकर या विद्यार्थ्यांस ती चैन सापडली असता त्यांनी प्राध्यापिका तृप्ती थोरात यांना प्रामाणिकपणे परत केल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे, सचिव मंगेशशेठ देशमुख, उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्री श्रीराम कजबजे, गो. म. वेदक विद्यालयाचे चेअरमन श्री महेंद्रशेठ कजबजे, प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री किरणशेठ देशमुख, तळा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री गोविंद ओमासे, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य धुमाळ सर, सर्व, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व तळेवासीयांनी सरोश गोठेकर यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले आहे. तर प्राध्यापिका तृप्ती थोरात यांनी सदर विद्यार्थ्यांस १००० रुपये रोख व पेढ्याचा बॉक्स बक्षीस देऊन आभार व्यक्त केले.

किनवट नगर परिषदेने विस्थापित केलेल्या दिव्यांग कुटुंबाचे पुनर्वसन करावे

  किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर) किनवट नगरपरिषद हद्दीतील विस्थापित झालेल्या कुटुंबापैकी एक कुटुंब किनवट सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. अखिल भारतीय अपंग कामगार संघटनेचे शहराध्यक्ष सलाम अब्दुल रहमान हे स्वतः दोन्ही पायाने दिव्यांग असून विस्थापित झालेल्या कुटुंबासह त्यांनी आजपर्यंत न्याय मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न सामूहिक रीत्या केले होते परंतु विस्थापित झालेल्या कुटुंबामध्ये एक मत नसल्याने शहराध्यक्ष सलाम अब्दुल रहमान यांनी संघटनेचे सचिव राज माहुरकर यांच्याकडे न्याय मिळून देण्याबाबत विनंती केल्यानुसार सदर निवेदन देऊन उपोषणास बसणार आहे गांधीनगर येथील 25 कुटुंबांना अतिक्रमित घोषित करून नगरपरिषदेने कोणताच सक्षम आदेश नसताना बळाचा वापर करून गांधिनगर वासियांना विस्थापित केले असल्याचे चर्चा शहरात जोर धरत आहे विस्थापित झालेले कुटुंब योग्य पद्धतीने शासन प्रशासनाकडे आंदोलन करत नसल्याने सलाम अब्दुल रहमान यांनी संघटनेच्यावतीने न्याय मिळवण्यासाठी 10/01/2022 रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्याकडे निवेदन सादर करून निवेद...

बळीराम पाटील महाविद्यालयात आयटी क्षेत्रातील संधी विषयावर व्याख्यान*

किनवट :- बळीराम पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वाणिज्य विभागाच्या वतीने आयटी क्षेत्रातील संधी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. के.बेंबरेकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जाधव सेवा संगणकांचे संचालक, विठ्ठल राठोड, मीनाक्षी पदमावार, संस्था समन्वयक प्रा. राजकुमार नेम्मानीवार, मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. पंजाब शेरे, वाणिज्य विभागाच्या प्रा. डॉ. शुंभागी दिवे विचारमंचावर उपस्थित होते. जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले, आयटी क्षेत्रात वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. आयटी क्षेत्रातील प्रगतीशील उपक्रम कसे आहेत. याक्षेत्रातील प्रगतीसाठी करावे लागणारे कार्य प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अॅबकसच्या विविध पध्दतीने समजावून सांगितले.विषयज्ञानाचे महत्त्व पटवून दिले.    कार्यक्रमाचे  प्रास्ताविक प्रा.डाॅ.शुभांगी दिवे, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. आम्रपाली हटकर यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्...

बळीराम पाटील महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकी जपली संपावर असलेल्या एसटी महामंडळाच्या कुटुंबीयाना अन्नधान्याचे किट केले वाटप

(शहर प्रतिनिधी किनवट:) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून संपावर असल्याने त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून किनवट शिक्षण संस्था व बळीराम पाटील महाविद्यालयाच्या वतीने त्यांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले  शिक्षण संस्था किनवटचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड , नारायण सिडाम ,संध्याताई राठोड , सचिव अजय चाडावार, जसवंतसिंग सोखी,प्राचार्य डॉ. शिवराज बेंबरेकर,संतोष चनमनवार, चंद्रकांत नेमानीवार, भावना दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अन्नधान्याचा किट वाटप करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये समाविष्ट करण्यात यावे महागाई भत्ता, घरभाडे, पगार वाढ आदी मागण्या घेऊन एसटी महामंडळाचे कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून संपावर असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आर्थिक संकटामुळे अनेक कर्मचारी आत्महत्या केले त्या अनुषंगाने सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून किनवट शिक्षण संस्थेच्या वतीने अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रा. राजकुमार नेमानीवार,उपप्रा...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नांदेडच्या वतीने समाजसेविका श्रीमती विजयाताई काचावार यांचा नागरी सत्कार

  नांदेड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य महिला संपर्क प्रमुखपदी श्रीमती विजयाताई काचावार यांची निवड झाल्याबद्दल  त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा दि. ८ जानेवारी, २०२२ रोजी सिडको नांदेड येथे पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनाथांची आई ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या प्रेरणेने संघांचे राज्य उपाध्यक्ष शेख मौला शेख उस्मान व नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघांचे नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड तर प्रमुख अतिथी म्हणून शेख मौला शेख उस्मान यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी नांदेड जिल्हा उपाध्यक्ष कामाजी अटकोरे, सरचिटणीस हर्जिंदर सिंघ संधू, सहसचिव गंगाधर सुर्यवंशी, अर्धापूर तालुकाध्यक्ष अनिलकुमार थोरात, नांदेड शहर अध्यक्ष शिवराज कांबळे, श्रावण गायकवाड, नितीन नंदकिशोर पाटील, सुरेश फुलारी मुदखेडकर, दिनेश ठाकूर, नितेश पाटील, विक्रम खांडेकर, शिवाजी...